Skip to content

मला सारखे सारखे भास का होत आहेत? या जाणून घेऊया!

भ्रम आणि विभ्रम यांचं मानसशास्त्र


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आपण सर्वच कधीना कधी आणि कोणत्या ना कोणत्या ठिकाणी भ्रम किंवा भास अनुभवत असतो. भ्रम होणे ही मानवी स्वभावाची एक अवस्था आहे. अशी अवस्था जी आपल्याला काही काळ अस्तित्वापासून दूर सारते आणि वेगळ्याच भावविश्वात रमवते. भास झाला, भ्रम झाला हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्या घडलेल्या गोष्टीची तीव्रता ही सामान्य, पण जेव्हा होणारे भास हे भास नसून तर ते खरे असे जेव्हा आपण म्हणतो किंवा आपल्याला पटतं तेव्हा मात्र विषय अडचणीचा बनतो. कारण मी जे पाहिलं, ऐकलं, स्पर्शलं हे भास जेव्हा आपण सत्य म्हणून स्वीकारतो, मग माझ्या मित्राने जरी पाहिलं नसेल, तरी मला आलेला अनुभवच खरा, अशा सूचना जेव्हा आपल्या मेंदूकडून आपल्याला मिळतात किंबहुना आपण आपल्या मेंदूला देत असू, तर हळूहळू आपला अस्तित्वापासून असणारा संपर्क तुटतो.

आणि मग मानसिक समस्या आणि पुढे जाऊन आजार चिकटण्याची शक्यता ही दाट असते. म्हणून भ्रम आणि विभ्रम यांची शास्त्रीय माहिती जाणून घेणे खूपच आवश्यक.

चला जाणून घेऊया….

आपल्याला ५ ज्ञानेंद्रिये असतात. (नाक, डोळे, जीभ, त्वचा, कान) याद्वारे आपण जगाची माहिती एकवटत असतो आणि जीवन जगत असतो. भ्रम म्हणजे या पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला होणारी चुकीची जाणीव. उदा. तुम्ही घरी एकटे आहात, जीवाच्या आकांताने तुम्ही कोणाचीतरी वाट पाहत आहात. कालांतराने तुम्ही ज्याची वाट पाहत आहात, त्या व्यक्तीचा आवाज (कान) तुम्हाला यायला लागतो, तेव्हा तुम्ही ताडकन उठून लगेचच घराबाहेर त्या व्यक्तीला पाहायला जाता, पण बाहेर दुसरीच व्यक्ती कोणाशीतरी बोलत असते, याला #भ्रम म्हणतात. म्हणजेच आवाज ऐकू येत असतो, फक्त तो चुकीचा असतो, असेच बाकीच्या ज्ञानेंद्रियांबाबतीत होत असते.

आणि पाचही ज्ञानेद्रियांमध्ये न येऊन सुद्धा जेव्हा त्या गोष्टीचा, वस्तूचा, व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा आपण अनुभव घेतो तेव्हा त्याला #विभ्रम म्हणतात.

उदा. अशी कल्पना करा की तुम्ही अंधाऱ्या रात्री रस्त्याने एकटे चालत आहात, अचानक तुम्हाला तुमच्या मागे कोणाच्यातरी सावली असल्याची चाहूल लागते, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता (डोळे) तेव्हा कोणीच नसते, म्हणजेच ती गोष्ट नसून सुद्धा जेव्हा आपण तिचा अनुभव घेतो तेव्हा आपल्या बाबतीत विभ्रम घडून येते.

आपलं मानसशास्त्र म्हणतं, जी व्यक्ती भ्रम आणि विभ्रम या दोघांचा जास्तीत जास्त अनुभव घेते, ती व्यक्ती एकतर मानसिक आजाराने ग्रस्त होणारी असते किंवा ग्रस्त झालेली असते.

यावर उपाय म्हणजे पाचही ज्ञानेंन्द्रीयांची दरवाजे सताड उघडे ठेऊन त्यांची नाळ वस्तुस्थितीशी जोडणे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!