Skip to content

या थंडीत स्वतःची काळजी कशी घ्याल???

हिवाळ्यात हवा आरोग्यदायी आहार


डॅा. सूर्यकांत मेटे , आयुर्वेद तज्ज्ञ

(9421491938)


थंडीचे दिवस म्हणजे आरोग्य कमावण्याचे दिवस असे म्हटले जाते. या दिवसात भाज्या, फळेही भरपूर आलेली असतात. आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. हिवाळ्यात आरोग्यदायी आहार कसा घ्यावा याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू या.

-हिवाळ्यात त्वचा रखरखीत होते. या दिवसात त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच स्निग्धताही कमी होते. थंडीच्या दिवसात त्वचेवर नखाने कोरले तर पांढरे ओरखडे पडतात. जुनी पिढी त्वचेवर अभ्यंग तेल लावण्याचा सल्ला देते. त्वचेवरील स्निग्धता जपायची असेल, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदाम व अक्रोडचे सेवन करणे. कमीत कमी दहा बदाम व दोन ते तीन अक्रोड दररोज खाणे चांगले. त्यातून शरीराला व्यवस्थित ओमेगा-३चे जीवनसत्व मिळते. बदाम व अक्रोड प्रत्येकालाच परवडत नाही. अशावेळेस मूठभर शेंगदाणे व वितभर सुक्या-खोबऱ्याचा तुकडा खावा. अर्थात एखाद्याला हृदयरोगाचा त्रास किंवा रक्तदाबाचा विकार नसल्यास हा उपाय स्वस्त व मस्त आहे.

-थंडीच्या दिवसात अतिशय गरम पाण्याने आंघोळ करू नका. त्यामुळे त्वचेला त्रास होतो. कोमट पाण्याने आंघोळ झाल्यावर शरीरावर हळूवारपणे क्रीम चोळा. आपल्याला बदामाचे तेल, तिळाचे तेल, खोबरेल तेल यांचे शरीराला केलेले मालिश फारच फायदेशीर ठरते.

-हिवाळ्यात पटकन सर्दी, खोकला व ताप येतो. वातावरणातील पटकन बदल अनेकांना आजारी करतो. शरीराचे तापमान आपण बदलू शकत नाही. म्हणून आपल्याला शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज लागते. आपण जर मासांहारी असाल तर खूप फायदा होतो. चिकन सूप, पाया सूप, घोळीच्या माशाच्या काट्याची करी, मोरीमासा तब्येतीला खूप छान असतो. शाकाहारी मंडळींनी केली, तर या दिवसात खूप चंगळ असते. डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तुपामुळे शरीरात स्निग्धता येते.

-थंडीत सुक्यामेव्याचे सेवन फायदेशीर ठरते. खजूर, मनुका, काळे मनुका, अंजीर यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे आपल्याला कमी खाऊनही शक्ती मिळते. त्यामुळे थंडीत आहार उत्तम ठेवला तर मनाने व शरीराने मजबूत राहाता येईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!