Skip to content

प्रत्येक भावनिक चित्रपट पाहताना जर तुम्ही रडत असाल, तर त्याचा अर्थ काय?

प्रत्येक भावनिक चित्रपट पाहताना जर तुम्ही रडत असाल, तर त्याचा अर्थ काय?


टीम आपलं मानसशास्त्र


चित्रपट असेल जो आधी रेकॉर्ड करून मग चित्रपट गृहात , टीव्ही वर प्रदर्शित होतो तो असेल किंवा एखाद्याच्या आयुष्याचा चित्रपट. जो रोजच्या आयुष्यात आपण बघतो .आणि त्यातला एखादा मनाविरुद्ध चा सीन , किंवा रडका , त्रासदायक सीन , अपेक्षे पेक्षा ,कल्पना केली असते त्यापेक्षा काही तरी विपरीत घडते. त्यामुळे आपण रडतो. आणि बरेच वेळा आपल्याला ते सत्य घटनेवर आधारित आहे असे वाटते म्हणून आपण ते खरेच आहे समजून रडतो.

पण बरेचवेळा पुरुष हे तेवढे भावनिक नसतात. ते त्यात तेवढे गुंतून पडत नाहीत.किंवा ते मनाने आणि व्यवहारिक जगात मिळालेल्या अनुभवातून कणखर ,खंबीर झालेले असतात . त्यामुळे ते रडत नाहीत. मात्र स्त्री ही तशी खूप प्रॅक्टिकल नसते. भावनिक असते. संवेदनशील असते. Practical पेक्षा काल्पनिक , स्वप्न जग जास्त जगते. अनुभव नसतात. किंवा तशी जबाबदारी कधी पडलेली नसते त्यामुळे खंबीर होण्याचे अनुभव कमी असतात. काल्पनिक आणि सत्य यात गफलत होवून तेच सत्य मानणारी आणि परत भावनिक त्यामुळे ती भावनिक चित्रपट बघताना आपसूक रडते. मात्र जी स्त्री जगाचे टक्के टोणपे खाते ती खंबीर असते. ती फार रडत नाही. तर अशी ही स्त्री असते की जिने जगाचे खूप टक्के टोणपे खाल्ले आहेत त्यामुळे ती अती भावनिक आणि संवेदनशील बनली आहे ती मात्र असे भावनिक चित्रपट बघून नक्की रडते.

प्रत्येक भावनिक चित्रपट पाहताना जर तुम्ही रडत असाल, तर त्याचा अर्थ काय?

कसे आहे प्रत्येक चित्रपट हा पूर्णपणे भावनिक नसतो. तर त्यात काही प्रमाणात आनंदी गोष्टी असतात, प्रेम असते, स्ट्रगल असते, excitement असते, मारहाण असते, कधी कधी आईची व्यथा , बाबांचे त्रास , त्यांनी मुलांच्या करिता केलेले अतोनात कष्ट , कधी कधी प्रियकर प्रेयसी यांच्यात ताटातुट , कधी कोणाचे मृत्यू , कधी कोणावर कर्ज , जप्ती , आजारपणे , मारहाण , पैशावरून फसवाफसवी , कधी कधी एकमेकांवर प्रेम असून लग्न दुसरीकडे मग त्यात येणाऱ्या अडचणी, त्यावर मात , कधी जोडीदाराचा मृत्यू , कधी एखादा हलका फुलका सरळ छान चालू असलेला चित्रपट त्यात मध्येच ट्विस्ट , कधी येणारे अपयश असेल तर कधी आपली हतबलता या गोष्टी चित्रपटात दाखविताना त्यातल्या भावना , ते मांडलेले संवाद , आणि त्या भूमिका अप्रतिम रित्या वठवलेले , त्या भूमिकेला साजेसे काम करणारे , न्याय देणारे पात्र म्हणजे स्त्री किंवा पुरुष कलाकार . अभिनेता किंवा अभिनेत्री.

अतिशय भावनिक चित्रपट म्हणजे आनंद यात तर आनंद आनंद चा मृत्यू नक्की आहे पण तरी तो किती उत्साही , आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. कधी तरी भावनिक ही होतो. बाबूमोषाय जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही ”

असे म्हणून डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवून आनंदाने प्रत्येक दिवस घालवत असतो. आणि तेव्हा मात्र त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ते किती हतबल आहेत त्याला वाचविण्यासाठी , किंवा आनंद ला स्वतः ला रोगाची तीव्रता ही समजत नाही .तो असाच सहज त्याच्या रोगविषयी बोलतो जसे त्याला किरकोळ रोग आहे. डॉक्टरांची गंभीर आजाराविषयी सांगत असताना आपण स्वतः helpless आहोत. काही hopes नाहीत हे मनात ठेवून त्याला आधार देताना होणारी कुचंबणा यात आपणही भावनिकदृष्ट्या गुंतून पडतो. आणि रडू येतेच.

The persuit of happiness या चित्रपटात , जगण्यासाठी ची धडपड. मुलगा आणि बाप यांचे रोजचे स्ट्रगल , एक वेळ राहायला जागा , खायला काही मिळाले तर होणारा आनंद, या गोष्टी बघताना मन साहजिकच हळवे होते. वाईट वाटते. रडू येतेच.

हम आपके है कौन मध्ये अगदी हसत खेळत सुरू असलेल्या चित्रपटात अचानक रेणुका शहाणे ..जिजी ..ती जिन्यावरून पडते काय आणि तिचा मृत्यू . लहान बाळ त्याचे सांभाळ. नंतर बाळाच्या करिता हिरो हिरोईन चे प्रेम त्याग. हे सगळे खूप हृदयस्पर्शी.

तर काही चित्रपट हे सत्य घटनेवर आधारित. त्यातल्या हिंसक गोष्टी, हत्या , प्राणघातक हल्ले , या हृदयद्रावक गोष्टी मनाला हेलावून टाकतात.

एक दुजे के लिये , कयामत से कयामत तक यातली ट्रॅजेडी मन हलवून टाकते.

तर सदमा मध्ये अतिशय निरागस भावना , तिची घेतलेली काळजी असेल , तिने त्याला झिडकारले , विसरली या खूप संवेदनशील गोष्टी आणि त्यात ही नायक नायिका यांची जबरदस्त अक्टिंग , ते त्यांचे रोल त्या भूमिकेत उतरून त्यात पूर्ण involve होवून निभावत असतात. आपोआप आपल्याला ही ती भूमिका खरीच वाटून आपण ही त्यात गुंतून जातो आणि त्यातल्या भावना असतात तसे react करतो. जसे आनंदी सीन मध्ये आनंदी, दुःखी , रडक्या सीन मध्ये आपण ही दुःखी , निराश , रडक्या भावना या आपसूकच निर्माण होतात.

माझी बहिण अशी होती. चित्रपटात कोणताही भावनिक सीन आला की ही इकडे मुस्मुसून रडत बसायची. मग तिला समजावता समजावता आई बाबांची नाकिनऊ यायची.

मग आई बाबा तिला समजावून सांगायचे की या गोष्टी चित्रपटात घडल्या आहेत. त्या क्षणिक आहेत. पुढच्या क्षणी वेगळी घटना दिसेल तुला. तू रडू नको. प्रत्यक्षात असे काही झाले नाही. ती अभिनेत्री , तो अभिनेता अक्टिंग करत आहेत. ते जिवंत आहेत. त्यांना काही झाले नाही. हा चित्रपट रंगवून दाखवायचा , प्रेक्षकांना खिळवून ठेवून तो पूर्ण चित्रपट बघताना आता पुढे काय होणार याची उत्सुकता ताणून ठेवणे, excitement निर्माण करणे हा हेतू असतो. आणि नायक , नायिका, खलनायक हे त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय देत असतात. त्यांची अक्टिंग एवढी जबरदस्त होत असते की खरेच ते त्या पात्रात घुसतात. आणि ते त्यांचे काम बघून आपण ही खूप संवेदनशील होतो. आपले मन हळवे असते. आपल्या भावना या जिवंत आहेतं . हे यातून दिसते कारण दुसऱ्याचे दुःख , त्यांचा त्रास , त्यांच्यावर होणारे अन्याय , मारहाण , प्रेमभंग , आपल्याला बघवत नाहीत. कारण आपले मन खूप हळवे असते. संवेदनशील असते.

आणि सगळ्यात महत्वाचे त्याक्षणी आपण काल्पनिक गोष्टी ही वास्तव गोष्टी आहेत असे समजून त्यात involve होत असतो. मग या भावना त्या क्षणिक असू शकतात. किंवा तो चित्रपट बघून गेल्यावर ही दोन चार दिवस , वर्षानुवर्ष जर आपल्याला रडवत असतील तर आपण प्रचंड भावनिक आहोत. असा याचा अर्थ होतो.

कारण पहिल्यांदा तो चित्रपट बघत असताना ,बघताना आपल्याला काहीच माहिती नसते त्यामुळे आपल्या भावना या तीव्र असतात. परंतु हळूहळू त्या सौम्य होवू लागतात. पुढच्या वेळी तोच चित्रपट बघताना तेव्हा जशा आपल्या भावना तीव्र होत्या त्यापेक्षा नक्कीच त्या कमी तीव्र असणार. आणि जर तसे नसेल तर आपण मानसिक दृष्ट्या अती हळवे आणि संवेदनशील आहोत हे समजावे.

माझे आई बाबा पुढे ही बहिणीला समजून सांगत. काही प्रमाणात भावनिक जरूर असावे. संवेदनशील नक्की असावे.

मग काल्पनिक चित्रपट असो अथवा वास्तव आयुष्यात घडणाऱ्या घटना असोत. प्रमाणात संवेदनशील , हळवे असावे. कारण तुम्ही जसे आहात तसे सगळे जग नसते. ते खूप व्यवहारिक असते. आणि तुमच्या हळवेपणा चा एक तर फायदा घेणारे असते किंवा मग तुमच्यावर हसणारे किंवा तुमची कीव करणारे . किंवा तुम्हाला मूर्ख समजणारे असते.

त्यामुळे नात्यात असो , मैत्री मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी थोडे फार भावनिक असावे पण काल्पनिक जग आणि वास्तविक जग याचे तारतम्य जरूर बाळगावे.

माझी मैत्रीण मिहिका खूप हळवी. प्रेमात पडली .मिहिर त्याच्या सोबत प्रत्येक क्षण तिने जगलेला प्रत्येक क्षण तिच्या मनात , मेंदूत , लक्षात memory मध्ये नोंद झालेला. मग तो चांगला , सुखद असो अथवा दुःखद , वाद असोत अथवा चांगल्या भेटी सगळे तारीख वार , तपशीलवार तिच्याकडे registered होत असे. याचे कारण ती त्यात पूर्ण involve होती. अतिशय हळवी , नात्यात संवेदनशील होती. आणि प्रत्येक क्षण त्याच्या सोबतचा आपलेपणाने जगत होती. पण मिहिर ने मात्र कधीच कोणती गोष्ट लक्षात ठेवली नाही.

किंवा तसा प्रयत्न ही केला नाही. उलट तो तिला म्हणत असे की किती वेडेपणा आहे हा. किती त्याच घडून गेलेल्या गोष्टीत राहते. तो व्यवहारिक होता. येणाऱ्या नवीन गोष्टी मध्ये त्याला इंटरेस्ट असे. बरेचवेळा तो त्याच्या समवेत त्या क्षणी जे असेल त्यांच्या सोबत एन्जॉय करायचा. मीहिका चे विश्व मात्र संपूर्ण त्याच्या भोवती फिरत असे. त्याच्यात एवढी गुंतली होती की तो असा का वागला, त्याने असे का केले ,तो आपल्याला भेटला नाही, आपल्याशी बोलला नाही, इतरांना फोन केला, त्यांना भेटला याचे त्रास ही करून घेत असे कारण ती खूप हळवी होती. आणि सगळ्यात महत्वाचे तन आणि मन याने त्याच्यात पूर्ण involve झाली होती. पण मिहिर तसा संवेदनशील नव्हता त्यामुळे तो प्रॅक्टिकल आयुष्य जगत होता.

यातून मिहीका मात्र मानसिक त्रास करून घेत होती. रडणे , एकटे राहणे , दुःखी राहणे , अचानक भरून येणे, भावनिक होणे असे तिच्या बाबत घडत होते.

म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावे भावनिक असावे पण त्याला ही मर्यादा असाव्यात. हळवे असावे .पण इतके ही नसावे की त्याचा त्रास आपल्याला होईल. आणि इतरांना ही त्रास होईल . आपण सतत रडत राहणे, अती संवेदनशील वागणे , वर्तनात बिघाड होईल, मूड changes होत राहतील , असे भावनिक वागणे लोकांच्या दृष्टीने मानसिक आजाराचे लक्षण असते. एका ठराविक मर्यादपर्यंत लोक तुम्हाला समजून घेतात पण त्यानंतर त्यांच्या दृष्टीने तुम्ही वेडे च ठरता.

आयुष्य सुंदर आहे . कल्पना आणि वास्तव यातले जगणे समजून घेवून आयुष्य जगा . All d best.

जगणे समजून घेवून आयुष्य जगा . All d best.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!