Skip to content

आम्ही आमच्या शाळेतल्या जिवाभावाच्या मैत्रिणी गमावल्या!!

मी-ती आणि “ते”


संकेत कांचन हेगाणा


भातुकलीचा खेळ.. त्यात नवरा-बायको व्हायचो आम्ही… नंतर डॉक्टर-डॉक्टर खेळत आमचा हात एकमेकांच्या इनर वेअर पर्यंत पोचला..हे आमचं दररोजचं चालायचं…काय मज्जा यायची नाही माहिती पण घडायचं सगळं हे… तेच झालं.. सापडलो आम्ही एकदा तिच्या पप्पाला….. भरपूर बडवला दोघांना …माझ्या घरी सांगितलं तो खूप भांडतो आमच्या पिऊशी त्यामुळे त्याला नका पाठवू आमच्या घरी … नशीब माझ ‘तसलं’ काही नाही सांगितलं, नाहींतर माझ्या बापाने मला वळ उठू पर्यंत लोळूऊन मारला असता.. आता मी फक्त तिला लांबूनच बघायचो… तिला बघितलं की फक्त तेच आठवायच… माहिती नाही काय होत ते??

एकदा घरी कपाटात डब्ब्याखाली एक लाल रंगाच पाकीट सापडलं होत. त्यात रबरासारख काहितरी होत… त्यावेळी काय समजायचं आम्हाला.. ते काय होत हे शोधायच ठरवलं होतं मी… कारण त्यावर एक चित्र पण होत बिनकापड्याच्या मुलीचं….याआधी मला तसीच एक VCD पण लपवुन ठेवलेली बॅगमध्ये सापडली होती… पण समजत नव्हतं काहीच…घरी विचारून पण सोय नव्हती… आणि हे बघीतल्यापासून तर ‘ती’ च्या बरोबर पुन्हा डॉक्टर-डॉक्टर खेळू वाटत होतं.. पण ते शक्य नव्हतं।

शाळेत पण सारख तिच्याकडे बघायचो.. सारखा तिचा पाठलाग असायचा… पण फक्त मुलींच्या बाथरूमपर्यंत… तिथे आत काय चालायचं?? हा पण प्रश्न आता तयार झालेला..वाटायचं तिने माझ्यासमोरच करावं जे आत चालतं…

आमच्या बाथरूममध्ये तर कितीतरी चित्रे काढलेली असायची…. जशी त्या VCD कव्हरवर आणि त्या पाकीटावर होती… अगदी तशी … फोन नंबर पण होते तिथे.. ‘काजल..अमृता ….आय लव्ह यु’ अस काही काही लिहिलेलं होत.. कॉइन बॉक्स वरून एकदा केलेला त्या’ नंबर वर फोन आणि तिकडून माणसाचा आवाज आल्यानंतर मात्र परत कॉल लावायची हिम्मत नाही झाली माझी…

या सगळ्या गोंधळात अंकुश भेटला ‘लव्ह गुरू’ म्हणायचा स्वतःला…. तसले काही प्रॉब्लेम असतील तर साॅलव्ह करायचा. मी दोस्ती केली त्याच्याशी….. या सगळ्यासाठी..त्याला बोलालो तसं त्याने विचारलं 15 रुपये आहेत काय?? मी हो म्हणताच ताडकन उठला आणि म्हणाला”तर चल आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो”…मला नेट-कॅफेत घेउन गेला… आत्ता पर्यंत नेट-कॅफे हा प्रकार मी फक्त गेम खेळण्यासाठीच वापरलेला… त्याने ऐटीत बसून एक शब्द टाईप केला आणि सगळी हिस्टरी पुढे आली.. तेव्हापासून तो माझा गुरू बनला…एकत्र समोसा खायचो आम्ही शाळेबाहेरचा .मी माझ्या खर्चाने द्यायचो त्याला, गुरुदक्षिणा म्हणायचा तो त्याला … दररोज नवीन-नवीन फंडे शिकवायचा ..स्टँडवरच्या पेपर-स्टाॅलवर “तसली” पुस्तके मिळतात ही माहीतीसुद्धा त्यानेच दिलेली… पेपर पण मिळायचा तिथे “तसला” पण हिम्मत नाही व्हायची तो पेपर घ्यायचा… किती तर वेळ तिथेच घुटमळायचो ….

न राहवून एक दिवस अंकुशला सांगितलं त्याने शाळा सुटल्यावर VCD च्या दुकानात नेलं …..आणि “देवाच्या VCD” मागितल्या आणि चक्क एका दणक्यात त्या तसल्यावाल्या VCD मला मिळाल्या… किती सोपं होत हे सगळं…

आता “ती”च्याकडे बघितल्यावर तर हे असलचं जास्त सुचायला लागलं… नाही!!!नाही…. ती’च नाही तर सगळ्याच मुलींकडे बघितल्यावर असले धंदे सुचायचे….

पण हे सगळे चाळे लपून करायला लागायचे…. गल्लीतले आम्ही सगळे छोटे…. ठरलेला एक दिवस…. आणि त्यावेळी लपून त्या सगळ्या VCD बघायचो आम्ही..आणि हात आपोआप खाली जायचा …कसली तरी नशा होती त्यात..पण सगळे घाण का म्हणायचे त्याला काय माहिती?? ….. मला तर चांगलं वाटायचं।।।

आता तर “ती” समोरून चालली तरी तिच्या छातीवरून नजर हटायचीच नाही…हळू-हळू गुडघ्यापासून खाली बघायला लागलो…वर्गात बसलो की मांड्या बघायचो तिच्या…

एक दिवस तिला लक्षात आलं असावं…तिने माझ्याकडे बघायचचं सोडून दिलं…मी दिसलो की मान खाली घालायची.. शाळेला येताना स्कर्टवर साॅक्स पण घालून यायला सुरुवात केली….त्या दिवसापासून ती माझ्याशी बोलत पण नाहीये… अगदी समोर आली तरी..

आता आम्ही २० चे झालोय… आता ती समोर आली तर मला खुप गिल्टी वाटत.. “त्या”गोष्टीसाठी मी माझी चांगली “ती” गमावल्याचा पश्चाताप पण होतोय.

लवकरचं आम्ही नको त्या रंगात रंगायला चालू झालो होतो.. पिचकारी म्हणाल की आम्हाला कधी रंगपंचमी आठवलीच नाही….बॉक्स म्हणाल की आम्हाला कधी तो पॅकिंगवाला बॉक्स आठवलाचं नाही…लेफ्टी म्हणालं की डाव्या हाताने लिहिणारा पण कधी आठवलाचं नाही…

या सर्व गोष्टींचा शास्त्रीय अर्थ आम्हाला कधी कोणी शिकवलाच नाही. तो आम्हीच आमचा शोधत गेलो आणि अनेक चुकीच्या गोष्टी बरोबर म्हणून स्वीकारत गेलो, कारण त्यात परमोच्च आनंद वाटायचा. आम्ही फक्त वाहत होतो, ज्या दिशेने ही आकर्षकता आम्हाला खेचून नेईल.

पण या दरम्यान अनेक जिवाभावाच्या मैत्रिणी आम्ही गमावल्या ही जखम कायम मनात सलत राहील….

ही सबंध स्टोरी वाचून तुम्हाला काही सापडतंय का बघा…आणि plz किती घाणेरडं लिहिलंय असं बोलून निदान मुद्दे तरी दुर्लक्ष होऊ देऊ नका…



या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!