पुरुषांनी त्यांच्या सासरी फार वेळा जाऊ नये, असं का म्हणतात?
प्रीती लांडगे
म्हणजे अगदी अस की, दूरून डोंगर साजरे असे म्हटले जाते तसे आहे हे, की पुरूषांनी सासरी फार वेळ जाऊ नये. कारण अजून तरी आपल्या भारतीय संस्कृती मधील काही रिती पाळल्या जातात. त्या अनुषंगाने ही की एक रित समजून जुनी पिडीतील लोक ही म्हणतात की, पुरुषांने सासरी जाऊ नये परंतु आता थोडे वेगळे वातावरण आहे. तरी असे का बरे हे विचार करण्यासारखे आहे. पुरूषांने त्याच्या सासरी जावे त्याची आवश्यकता असेल तेव्हा काही जबाबदारी पार पाडायची असेल तर ते काम करुन बाजूला व्हावे. आणि पुन्हा सारखे जाऊ नये, कारण बेचव जेवणाची रुची मिठानेच वाढते परंतु तेच मिठ जास्त झाले तर ते अन्न खाऊ शकत नाही. फेकून द्यावे लागते.
तसेच पुरूषांचे आहे आपल्या सासरी चवि पुरतेच जावे. मिठाचा खारटपणा किंवा मिठ दुधात पडले तर ते खराब होते, किंवा दुधात मिठ टाकू शकत नाही. कारण ते शरीराला बांधू शकते किंवा बाधते अगदी तसेच आहे हे. पुरूष फाळ वेळ सासरी गेला तर त्याला आणि सासरच्या मंडळीना बांधू शकते.
कारण त्याच्या दृष्टीने तो एक कणखर,भक्कम आधार असतो, त्याच्या मुलीसाठी त्यांच्यासाठी आणि आधार सारखा सारखा सासरी येत राहीला तर चांगले दिसणार नाही. राजाला प्रजेची काळजी असते सर्वांची देखभाल करतो. कधी तरी प्रजेच्या घरी जातो परंतु सारखे जातो का तर नाही. कारण तसे केले तर त्याची किंमत रहाणार नाही हेच वेळप्रसंगी योग्य वेळी योग्य तेवढेच गेला तर आपोआप त्याची किंमत वाढणार अगदी तसेच आहे. सासरी जावई मुलासारखा असतो,वाटतो. परंतु त्याचे रहाणे पसंत पडणार नाही.
कारण अजून तरी तेवढी विचार सरणी लोकांची पुढारलेली नाही. आणि तस त्यांना वाटणार नाही. त्याने त्याची कामे करावी त्याच्या घरी जास्त वेळ द्यावा असे वाटते. ही धारणा आहे आणि या धारणे मुळे होते पुरुषांनी सासरी जास्त वेळ राहू नये अस म्हणत असतील. जेवढी एक स्त्री सर्वात सामावून जाईल तेवढे पुरूष सामावून जाणार नाही असे वाटत असेल म्हणून असे म्हणत असतील. आणि हो जावई आणि मुलगी जेवढे उशीरा घरी येतील जास्त दिवसानी भेटतील तेवढे ते सुखात असतील अशी धारणा आहे.
आणि हे जर असे वारंवार घरी आलेले दिसले तर त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकते की घरी मुलीच.सर्व ठिक आहे असेल ना, जावयाचे काम निट सुरू असेल ना असे एकना अनेक प्रश्न मनात घोळवतात तर्हे तर्हेचे विचार मनात घर करून जातात म्हणून मग जावई सासरी जास्त आलेला बरा नाही असे ही वाटत असेल त्यांना म्हणून असे बोलत असतील.
आता जावई हा शब्द तुम्ही जर निट बघीतला तर हा शब्द सुध्दा काय सूचीत करत आहे लक्षात येईल तर बघूया (जा – जास्त, वेळ – वेळ,ई – जाईल.) इतके थांबू नका किंवा फार वेळ येथे घालवू नका. असेच दर्शवित आहे. आणि तसे ही बघायला गेले तर हा जावयचा रोल एखाद्या जावई रूपी कवर सारखे आहे.
जसे कवर हे बाहेरून असते फळाला किंवा पुस्तकाला ते असे आत जात नसते बाहेरूनच गोष्टींची रक्षा करत असते अगदी तसाच आहे हा रोल. आणि एखादी गोष्ट सारखी सारखी केली तिच गोष्ट सतत उगाळत बसलो तर ते फार आपल्याला आवडत नाही. आपण बाजूला जातो किंवा दूर लोटतो अगदी तसेच पुरूषांने सासरी फार वेळ रेंगाळत बसणे बरे वाटत नाही.
आणि अशाने त्यांची स्वतःची किंमत कमी होते एखाद्या गोष्टीला तेव्हाच किंमत असते. जेव्हा ती गोष्ट योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात असते. तेव्हाच तिची किंमत असते. आणि तसही फार पुर्वी पासूनची रित आहे. की जावयाने फार वेळ सासरी येणे ठिक नाही. या मागे त्यांचे कारण म्हणजे त्यांचा मान राखला जावा कधी अपमान होऊ नये अशी पण एक धारणा होती किंवा असते. आणि त्यात घरातील मंडळी किंवा महीला वर्ग तसेच सासू याच्यासाठी जावई म्हणजे फार महत्त्वाची व्यक्ती वा मानाची गोष्ट असते तिथे काही कमी जास्त नको व्हायला हा एक समज आणि घरात त्यांच्या समोर वावरताना ही त्यांना अवघडल्यासारखे वाटते म्हणून ही फार वेळ जावयाने असू नये असे असेल. अशाने त्याचे अवघडले पण वाढू शकते आणि योग्य प्रमाणात सहभाग घेतलेला चांगला.
थोडक्यातच गोडी राहते. तेच छान असते. परंतु आता काळ बदलला आहे. तरीही अजूनही खूप ठिकाणी या गोष्टी पाळतात करतात ति कधी चांगली पण आहे तर कधी कमी चांगली पण आहे. थोड्या फार फरकाने प्रत्येक गोष्टीचा नफा तोटा असतो. तो या गोष्टीचा ही आहे हव तर तीला वापरा नको तर नका वापरू किंवा समतोल राखून तिचा स्वीकार करून वापरा आणि तशी कृती ही दिसू दे. म्हणून हे सगळे असे असावे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अगदी बरोबर एकाच ठिकाणी सारख गेल्याने त्याच मानसन्मान, महत्व कमी होते
अगदी बरोबर आहे !
किंबहूना हि विचारसरणी अंगिकारणे गरजेचं आहे अन्यथा मुलाला आई – वडील दुरचे आणि सासू – सासरे जवळचे वाटू लागतात हि वस्तुस्थिति आहे. खुप जवळुन याचा अनुभव घेतला आहे !!
क्रुपया आपली मराठी वाक्यरचना आणि व्याकरण सुधारा…
अन्यथा ‘ध’ चा ‘म’ होऊ शकतो.
बाकि लेखिकेने अंदाजे जे काही विचार मांडले आहेत त्यातून हेच अधोरेखित होते कि सासरची मंडळी जावयाला परकं मानते, त्यांच्या कुटुंबाचा एक भाग नाही.मग मुलगा किंवा त्याच्या घरच्यांनीही तसे वागले पाहिजे. मग अशा परक्या मुलीला सामावून घेणारे मुलाचे कुटुंब किती थोर म्हणावे?
स्त्री-पुरुष समानता कुठे जाते अशा वेळी??
मागासलेला आणि म्हणूनच फालतू
बरोबर आहे जावई ने सासरी वारंवार जाऊ नये कारण मानसन्मान किंवा त्याचे महत्त्व कमी होते
बकवास, जर असा असेल तर मग सुनेने पण तिच्या सासरी कधीतरीच जावे म्हणजे तिची सासरी किंमत राहील 😂😂
सहमत आहे. सारखं एका ठिकाणी गेल्यावर इज्जत कमी होते.जशास तस रहा
Nice 👌 👌
Ek dam barober ahe mi matashi shamat ahe
WTF
Khup bursat vicharsarni Now a days evdha vichar karayla vel nasto mothe mansacha adhar khup important asto jyala aaivadil nahi tyala baykoche aaivadil aplech vatnar
Yogya gosht ahe hi..Javayane jase sasarche lok vagtil tsch vagl pahije..jr aaplyala man dila tr tyana man dila pahije..jr sasarche lok atishahane astil..tr ashyana fatyavr marl pahije..😻
Right.
बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे। मी अनुभव घेतलाय आणि त्याची फळं पण भोगतोय
Bakwas
Bhangaar
Nice 👍