
आमच्या दोघांमधले शारीरिक संबंध!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
तिचं जेव्हा डोकं दुखतं, तेव्हा मी माझ्या हलक्या प्रेमळ हाताने तिच्या कपाळावर हात फिरवतो आणि कालांतराने डोकं दुखण्याचं जरी थांबलं नसलं तरी क्षणभर त्या डोकेदुखीचा तिला विसर पडलेला असतो…
मी जेव्हा ऑफिसवरून थकून-दमून येतो, माझे शूज काढतो आणि आल्हाद होण्यासाठी सोफ्यावर स्वतःला टेकवतो, तेव्हा नकळत केसांमध्ये तिचे दोन्ही हात शिरतात आणि माझा अख्खा स्ट्रेस रिलॅक्स करतात.
रात्री किचन काम आणि भांडीकुंडी आवरून जेव्हा ती पाय आपटत झोपी जाते..तेव्हा मी हळूच तिचे गुडघे, बोटे आणि टाचकडे वळून ते सर्व रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि तिची डोळेबंद स्माईलची झलक अनुभवतो.
अजूनही आम्ही एकमेकांना मस्करीत डोक्यावर टपली मारतो, नाक दाबतो, कमरेवर चिमट्या घेतो, केस ओढतो, पाठीवर धक्का मारतो, हलकीशी चापट मारतो आणि बरं का हे चोरून करण्याची जी मजा आहे ती वैवाहिक संबंध ज्या शिवाय अपूर्ण आहे असे म्हणणाऱ्या लैंगीक संबंधातही मुळीच नाही.
आम्ही मस्त बाहेर प्रवासात, समुद्र किनारी एकमेकांना हातात हात देऊन लहानग्यांसारखे टपटप पाऊले टाकत असतो. चालताना एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालतो. जाम मज्जा येते तेव्हा….
आमचे वरील हे शारीरिक संबंध उत्तम असल्याने आम्हांला अजूनही आमच्या लैंगिक संबंधात कधीच काही प्रॉब्लेम आला नाही आणि पुढेही तो येईल असे आम्हांला कधीच वाटत नाही…
आणि दुर्दैवाने जरी आला तरी आम्ही आमचे शारीरिक संबंध Enjoy करूच!
???
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

