Skip to content

कधीतरी अचानक सर्वांपासून खूप दूर का जावंसं वाटतं ???

कधीतरी अचानक सर्वांपासून खूप दूर का जावंसं वाटतं ???


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


तुम्ही कितीही अगदी सहजच एकमेकात मिसळणाऱ्या स्वभावाचे असाल, तुमची पटकन एखाद्याशी चटकन मैत्री होत असेल, इतरांसाठी तुम्ही नेहमी हवेहवेसे असाल…

तुम्हाला माणसांमध्ये राहण्याचा छंद असेल.

तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक क्षण स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी त्या भावनांचा नेमका अर्थही समजत नसतो. कोठेतरी निवांत-एकांत या मानव जातीपासून कोसो दूर जावेसे वाटते.

पण कोठे माहित नाही!

पण ती भावना सतत आपल्या अस्तित्वाला खुणावत असते. कोठे अडकून पडलायस ? हे कसलं भौतिक आयुष्य जगतोय ?

आपले आई-बाबा, बायको, मुलं-बाळं सगळे मजेत असताना तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजा सुद्धा अतिशय छानपैकी भागत असताना मग नेमकं असले विचार मनाला का स्पर्श करून जातायत ??

किंबहुना या असल्या भावना ज्यांच्याकडे आपण भरभरून व्यक्त होतो त्याठिकाणी सुद्धा समाधानकारकपणे कधीच मांडता येत नाहीत.

कारण आपल्यालाच त्यांचा नेमका अर्थ कळलेला नसतो.

आणि असंही नाही कि अचानक येणाऱ्या त्या भावनांचा आपल्याला त्रास होतोय. फक्त आजूबाजूचं सगळं काही नश्वर वाटायला लागतं.

म्हणून कोणत्यातरी अर्थ असलेल्या जगात जावंसं वाटतं.

प्रत्येकाने आपल्या या भावनांचा नीट कानोसा घेणं आवश्यक आहे. कारण अशावेळी आपण एकटं राहण्यासाठी तसा निर्णय घेऊन मोकळे होतो. परंतु मेंदूतल्या या लहरी जेव्हा पुर्वव्रत होतात, तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा पच्छाताप सुद्धा होऊ शकतो.

अशा वेळी भावनांना पुर्वव्रत होण्यास वेळ देणे किंवा एक सूचक म्हणून आपण नेमकं योग्य दिशेने वाटचाल करतोय का याबद्दल विचार केल्यास अनेक भावनिक गुंते सुद्धा सुटू शकण्याचा अंदाज असतो.

पुन्हा अशा भावना जेव्हा दाटून येतील तेव्हा नक्की असा काहीतरी विचार करून बघा.

आणि त्या भावना नक्की येणार….

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

 

3 thoughts on “कधीतरी अचानक सर्वांपासून खूप दूर का जावंसं वाटतं ???”

  1. मनस्पर्शी आहे. असे बरेच वेळा वाटते.यापुढे‌ अशावेळी ‌असणार्‍या भावना/विचारांचा ‌कानोसा घेत जाईन.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!