आनंदी व्हायचंय हे जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही आनंदी होऊ शकत नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
एका माणसाकडे खूप घोडे होते. तबेलाच होता म्हणा ना. घोडे खूप रुबाबदार व देखणे होते. त्या माणसाचा व्याप खूप मोठा होता म्हणून त्याने दिमतीला माणसे ठेवली होती. ती माणसच घोड्यांच सर्व करायची. त्यांची देखभाल, त्यांना खायला घालणं, पाणी पाजयाला नेणं, फिरवण ही सगळी कामं त्यांच्यावर होती. एके दिवशी मालक अजून एक नवीन घोडा विकत घेऊन आला.
व्यापारासाठी जेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी गेला होता तेव्हा तिथे त्याला हा घोडा दिसला. त्याला पसंद पडल्याने तो घोडा घेऊन आला. आणल्यावर त्याने त्यांच्या सर्व माणसांना त्या घोड्याची नीट देखभाल करायला सांगतो. ही माणसं घोड्यांना पाणी पाजयाला एका नदीवर नेत असत. रोजच्याप्रमाणे ते सर्व घोड्यांना घेऊन चालले होते त्यात हा नवीन घोडा देखील होता. नदीजवळ आल्यानंतर त्यांनी सर्व घोड्यांना मोकळे सोडले व ते घोडे नदीकडे जाऊन पाणी पिऊ लागले.
पण तो नवीन आणलेला घोडा मात्र तिथे तसाच उभा राहिला. तो काही केल्या आत जाऊन पाणी पित नव्हता. गडीमाणसाला काही समजेना. कदाचित नवीन ठिकाण आहे म्हणून अस करत असेल असं वाटून त्याने घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला पुढे जायला लावलं. पण घोडा मात्र हलेना.
बाकी घोड्यांचे पाणी पिऊन झाले पण हा मात्र तिथे तसाच उभा राहिला. कंटाळून गडी सर्वांना घेऊन आला व त्याने मालकाच्या कानावर ही गोष्ट घातली. दुसऱ्या दिवशी मालक स्वतः त्याला घेऊन गेला व पाणी पाजायचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. म्हणून मालकाने शेवटी निर्णय घेऊन तो घोडा परत देऊन टाकला. यावरच एक म्हण प्रसिद्ध आहे ती म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत नेता पण पाणी पाजता येत नाही.याचा मतितार्थ हाच आहे की दुसऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी तो फक्त आपल्याला वाट दाखवू शकतो त्यावरून जाणं न जाणं आपल्या हातात आहे. तिथे कोणीही काही करू शकत नाही.
आनंदाचं ही असच आहे. जोपर्यंत आपण स्वतः आनंदी राहायचं ठरवत नाही तोपर्यंत कोणी कितीही प्रयत्न केला आपल्याला किती खूष ठेवल तरी आपण आनंदी होऊ शकत नाही. बऱ्याच लोकांकडे सर्व काही असतं. पैसा, गाडी, माणसं, करमणुकीची साधने तरी त्यांच्या चेहेऱ्यावर मात्र उदासीन भाव असतो आणि कित्येकदा गरीब असणारे ज्यांच्याकडे भलेही चार चार गाड्या नसतील, करमणूक व्हायला काही नसेल तरी ते प्रसन्न असतात. याच काय कारण असेल? याच कारण त्यांनी आनंदी राहणं निवडलेले असत. माणूस दुःखी लगेच होतो, त्यात त्याला जास्त वेळ लागत नाही.
परंतु आनंदी व्हायला मात्र स्वतःला खूप साऱ्या अटी घातलेल्या असतात. ज्यातून असमाधानी वृत्ती तयार होते आणि मग आजूबाजूला कितीही आनंदी वातावरण असेल, प्रसन्नता असली तरी आपण मात्र खिन्न राहतो. म्हणूनच जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही की मला आनंदी रहायचय,या जीवनातील सुखद क्षण अनुभवायचे आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणी प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही आणि आनंद ही गोष्ट अशी की जी आपल्यासमोर आपोआप येणार नाही तर ती आपल्याला निर्माण करावी लागते.
तशी दृष्टी तयार करावी लागते. ती कशी तर आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी राहण, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं, इतरांशी तुलना न करण. आपला आनंद हा बरेचदा इतरांवर, मोठ्या गोष्टीवर अवलंबून असतो. पण अस नाही. आपला आनंद हा आपल्या हातात असला पाहिजे. तो आपण निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी दर वेळी फार मोठ्या गोष्टी होण्याची काही गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेता येतो. फक्त तो आपण घेतला पाहिजे. आपलं मन तस केलं पाहिजे.
लहान मूल साधं फुलपाखरू समोर येऊन बसल तरी आनंदी होत. त्यांचं ते देखणेपण पाहून खुश होत. त्याला यावेळी इतरांनी खुश हो अस सांगायला लागत नाही. आपलं मनही तस असल पाहिजे. आपल्याला कोणी दुःखी हो, रागव, चीड म्हणून सांगायला येत का ? नाही ना! जसं या सर्व नकारात्मक गोष्टी आपण स्वतः ठरवत असू तर आनंद सारखे सकारात्मक गोष्ट हे आपल्या हातात असली पाहिजे. आयुष्य मुक्त हस्ताने सर्व उधळत असत आपण ते झेलेल पाहिजे. आपल्या आनंदाचे धनी आपण झालं पाहिजे. कारण,
छोट्या छोट्या गोष्टीत लगेच कसं दुःखी होता येत,
तसच छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी पण होता आलं पाहिजे
दुसऱ्यांनी आपल्यासोबत भेदभाव केलेला चालत नाही
मग आपण स्वतः सोबत असा भेदभाव केला तर चालेल का?
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

khup sunder vatatala pun print hot nahi ka