एखादी महिला रात्री १२ नंतर online असेल तर मनात हे ७ गैरसमज येतातच!
टीम आपलं मानसशास्त्र
स्त्री म्हणले की तिच्यावर संस्कार आणि तिने मर्यादा या पाळल्या पाहिजेत. स्त्री वर सगळ्यांचीच बारीक नजर असते. घरातले , शेजार पाजार, नातेवाईक अगदी दुकानदार , कामवाल्या बायका सगळ्यांचे लक्ष महिला वर्गावर बारकाईने असते.
आता आजकाल मीडिया आणि सोशल मीडिया सहज उपलब्ध आहेत. खरे तर महिला वर्ग हा यावर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन असतो याची विविध कारणे आहेत. जसे जुने मित्र मैत्रिणी यांचे ग्रुप असतात. त्यावर दंगा मस्ती काही update येत असतात. त्यातून एकमेकांच्या विषयी माहिती ही समजते आणि दंगा मस्ती , चेष्टा मस्करी , कधी विनोद मनाला फ्रेश ठेवतात.
बऱ्याच महिला वर्गाचे भिशी ग्रुप असतात. मुले शाळेत असतील मुलांचे updates , शिक्षकांनी दिलेल्या सूचना , याव्यतिरिक्त अभ्यास त्याच्या pdf . अभ्यासा व्यतिरिक्त activity classes त्याचे वर्ग. त्याच्या activities हे किंवा क्लास मधले वेळेचे बदल हे सगळे व्हॉटसॲप , messenger यावरून समजत असते. किंवा ऑफिस चे updates येत असतात. त्यामुळे बरेचवेळा ऑनलाईन राहावे लागते.
बऱ्याच वेळा महिला या घरकाम , ऑफिस , किंवा बाहेरची कामे यात व्यस्त असतात. त्यातून त्यांना जेव्हा सगळी कामे संपतात. निवांत असतात .साधारण झोपण्यापूर्वी एकदा सोशल मीडिया वरचे सगळे updates बघतात. Reply करतात. साहजिक रात्री उशिरा पर्यंत या महिला ऑनलाईन दिसतात.
पण सगळ्यात महत्वाचे ती ऑनलाईन आहे हे तुम्हाला लगेच समजते म्हणजे तुम्ही ही तेव्हा ऑनलाईन च असता ना ?? पण ते चालते. मग तुम्ही स्वतः स्त्री किंवा पुरुष कोणी ही असा. तुम्ही दुसऱ्या स्त्री चे ऑनलाईन राहणे observe करून त्यावर टीका टिप्पणी ही करणारच.
एखादी महिला रात्री १२ नंतर online असेल तर मनात हे ७ गैरसमज येतातच!
१. काम काहीच नसते तिला : – उद्योग नाही.
एवढ्या रात्री पर्यंत किंवा ती सारखीच ऑनलाईन असते . म्हणजे ती रिकामटेकडी च आहे. काही काम करत नसावी ती . असे शिक्कामोर्तब करून , गैरसमज करून घेवून रिकामे होतात.
२. तिचे बाहेर कोणाबरोबर तरी काही तरी अफेअर असणार. वाईट चाली ची आहे. जी महिला बरेचवेळा किंवा रात्री अपरात्री ऑनलाईन असते म्हणजे तिचे काही तरी बाहेर अफेअर .लफडे आहे असेच विचार करतात. हा विचार कधी करत नाहीत की ती एखाद्या चांगल्या मित्र , मैत्रिणी , नातेवाईक यांच्या सोबत बोलत असेल किंवा महत्वाचे काम करत असेल.
खरेच असे होते ही बरेचवेळा इंटरनॅशनल client , patient किंवा ऑफिस चे काम करत असताना इकडे रात्र आणि तिकडे दिवस असतो तेव्हा कामासाठी जरी रात्री ऑनलाईन असल्या महिला तरी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेणारे आहेत.
३. खूपच बिनधास्त आहे. : कोणाचा धाक नाही: एखादी महिला उशिरापर्यंत ऑनलाईन असेल तर लोक विचार करतात की तिला कोणाचा धाक नाही. बिनधास्त आहे. कदाचित कोणाची पर्वा करत नसेल. Family bounding नसेल.
४. लग्न झालेली स्त्री उशिरा पर्यंत ऑनलाईन असेल तर एक नाही अनेक लोकांच्या सोबत संबंध असावेत असेही गैरसमज करून घेणारे असतात.
५. रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन आहे म्हणजे तिला निद्रानाश असेल. झोपेची तक्रार असेल. असेही गैरसमज करून घेतात.
६. संशय , अविश्वास ही मानसिकता असेल तिची हे विचार ही येतात.
एखाद्या महिलेचा नवरा परदेशी असेल किंवा बाहेर गावी गेला असेल आणि ती निवांत वेळेत त्याला मेसेज करत असेल. आणि reply ची वाट बघत असेल तरी ही लोक गैरसमज करून घेतात. तिच्यावर संशय किंवा अविश्वास दाखवतात.
तर कधी तिचा नवरा ही मेसेज करून झाल्यावर ही चुकून ती तशीच ऑनलाईन राहिली तरी मनात संशय घेतो की ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे का अजून कोणा सोबत काही सुरू आहे.
७. अशी काय महत्वाची कामे असतात की दिवसा होवू शकत नाहीत उगीच काही तरी कारणाने सारखा ऑनलाईन राहून टाईम पास करायचा. काही वेळेस रात्रीतून काही emergency असते. Accident , आजारपणे असतात. आता सगळ्यांनाच अनुभव आहे . कोरोना काळात प्रत्येकाचे रिपोर्ट्स हे रात्री अपरात्री च येत होते. ते डॉक्टर ना पाठविणे. Positive असतिल तर अनेक लोकांची कामे रखडली , पुढे ढकलावी लागली . बाहेर गावी जाणे , परदेशी उड्डाणे ही रद्द करावी लागली. त्या करता सगळी ऑफिस प्रोसेस पूर्ण करणे , सगळी कडे inform करणे , आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणाला पाठविणे शक्य असेल तर ती तजवीज करणे हे सगळे ऑनलाईन केले जाते.
पण लोक उगीच गैरसमज करुन नावे ठेवतात की तिला काय दिवसा काम करता येत नाही का ? रात्रीतून असे काय एव्हढे असते. उगीच time pass करत बसते.
एखादी महिला रात्री १२ नंतर online असेल तर
हेच नाही तर अनेक गैरसमज लोक करून घेतात. जसे एकटी असेल, तिला काही तरी दुःख , त्रास , जाच असेल, घरी पटत नाही. आई वडील असतील नवरा त्यांच्या सोबत पटत नाही. किंवा सासरी असे वाटत असते की रोज उशिरापर्यंत आपल्या विषयी माहेरी चुग्ल्या करत असेल. माहेरचे ही तिला काही तरी शिकवत असतील.
तर एकटी असेल म्हणून थोडे ऑनलाईन राहून मोकळेपणा किंवा रिलॅक्स होत असेल. पण एकटी कशात तरी मन रमवते म्हणून तिच्या एकटेपणाची कीव किंवा फायदे घेणारे ही असतात.
अर्थात काही प्रमाणात हे खरे आहे की कधी कधी त्याच कामातून बदल म्हणून थोडे नवीन किंवा कामात बदल , रिलॅक्स होण्यासाठी किंवा काही तरी updates मिळतात म्हणून ऑनलाईन असतात. पण याचा अर्थ असा नाही की ती कायम एकाकी आहे. तिचे बाहेर काही आहे. तिचे घरच्यांच्या सोबत पटत नाही, ती घरच्या जबाबदाऱ्या , कामे टाळते.आणि विनाकारण time pass करते. असे नसते.
आजकाल तरी बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. विचारसरणी बदलत आहे. कोणी कधी ऑनलाईन असावे त्याकडे दुर्लक्ष करणारे आहेत.
पण असेही घरचे , सासरचे आहेत की एखादा मित्र मैत्रिणी , नातेवाईक , ऑफिस काम याचे उशिरापर्यंत ऑनलाईन काम सुरू असेल, असे विचार करणारे ही आहेत. समजून घेणारी ही आहेत .. की असू दे सतत काम , स्ट्रेस यातून थोडे काही तरी रिलॅक्स होण्याची तिला ही गरज आहे.कामाचे , महत्वाचे काही असेल असे समजून घेणारी ही आहेत.पण गैरसमज करून घेणारे हे मात्र गैरसमजच करून घेत असतात.
समाजाची ही मानसिकता खराब असते. त्यातून स्त्री कडे , आपल्या च लोकांचे , घरातल्या , किंवा जवळच्या स्त्री बाबत बघण्याचे दृष्टिकोन बदलत असतात.
