Skip to content

सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधरत नाही.

सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधरत नाही.


टीम आपलं मानसशास्त्र


आपले आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येकाला ते अजून सुंदर असावे , व्हावे असेच वाटते. तसे प्रत्येकाचे प्रयत्न ही असतात. पण प्रयत्न केले तसे तरी सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छे प्रमाणे आणि अपेक्षे प्रमाणे होतीलच असे नसते.

बरेचदा व्यवसाय करण्याची जिद्द पुढे घेवून जाते पण त्यात अपयश येते. व्यवसाय नीट चालत नाही. पैशाची गुंतवणुक , कर्ज असेल तर ते कसे फेडायचे , व्यवसायाचे पुढे काय करायचे असे असंख्य प्रश्न डोक्यात भुंगे घालू लागतात. आणि त्यातून तणाव वाढत जात असतो. टेन्शन वाढत जाते.

हेच असे नाही प्रेमभंग , प्रेमात व्यक्ती आपल्या इच्छे प्रमाणे वागली नाही. घरात मतभेद , ऑफिस मध्ये कामाचा ताण ,कधी आरोग्याच्या समस्या, थोडक्यात आर्थिक , मानसिक , सामाजिक , कौटुंबिक , आरोग्य याची स्थिरता नसेल , गोष्टी बिघडत असतील . तर व्यक्ती ला
आपण सगळ्या या नकारात्मक भावना निर्मिती करत असतो.

आणि खरे तर या टेन्शन चे परिणाम इतके वाईट होतात की निराशा , अस्वस्थता , दडपण , हायपर टेन्शन , b.p. डायबेटिस , मानसिक अस्वास्थ्य , शारीरिक अस्वास्थ्य , एकाग्रता न होणे , लक्ष न लागणे , विचलित होणे , उदासीनता, काही वेळेस तंद्री म्हणतो तसे वेगळ्याच विचारात असणे , सतत चिंता , ही लक्षणे आहेतच. पण जोडीदार त्याच्या सोबत ही काही वेळेस शारीरिक संबंधांमध्ये अडथळे , अलिप्तता येते, औदासीन्य येते. उत्साह नसणे. वैफल्य ही येते. तर काही न करण्याची इच्छा . आळस , झोप येणे . एकटे राहावे असे वाटते. काही वेळेस आत्महत्या करावी असे वाटते आणि तसे प्रयत्न ही केले जातात.

थोडक्यात काय, की टेन्शन हे आयुष्य नकारात्मक बनविते . कधी कधी उध्वस्त ही करते. सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधारत नाही.

कारण किती ही टेन्शन असेल तरी आपल्याला सुरुवातीला खूप आशा वाटत असते. आणि त्यामुळे सुरुवातीला आपण थोडे प्रयत्न करत असतो. वेगवेगळे प्लॅन्स करतो , समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग वापरतो , कधी इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा सगळे मार्ग संपतात तेव्हा आपण एकटे आहोत हीच भावना मनात येते.

आणि आधी टेन्शन मधून सुटका होण्याकरिता आपल्या जवळच्या लोकांसोबत चर्चा करत असतो. संवाद साधत असतो. पण मग जे आपले समजतो ते लोकही फार काळ साथ देवू शकत नाहीत. अर्थात त्यांना ही त्यांचे व्याप , उद्योग असतात. त्यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ही आपला ताण तणाव कमी करण्या करिता मदत होत नाही तर उलट निराशा मिळते. आणि खरेच म्हणजे ताण कमी करण्यासाठी किंवा समस्या सुटण्या करिता आता कोणतेच मार्ग नाहीत आसेच वाटू लागते.

किंवा स्वतः किती ही प्रयत्न ही त्यातून मार्ग मिळत नाहीत. समस्या सुटत नाहीत पण उलट ताण वाढतच जातो. आणि मग आपण सुधारण्याचा प्रयत्न ही करत नाही.

बरेचदा आपण हा ताण , तणाव , समस्या म्हणजे हाच शेवट असे गृहीत धरून जातो. मार्ग सापडत नाहीत किंवा त्यावेळी पाण्यात गटांगळ्या खात पाण्यात डुबक्या खाणाऱ्या व्यक्ती सारखी अवस्था होते. आणि आता सगळे संपले असे होते. हात पाय हलवायचे असतात हे विसरून जातो आपण . किंवा जी निराशा येते की नाही मी आता वाचणार च नाही. आणि मन थकते .शरीर ही साथ देणे सोडते. प्रयत्न थांबवितो अगदी हे माहिती असते की आपण हातपाय हलविणे बंद केले तर बुडणार च आहे. आपण मग खरेच बुडतो आणि मग काय तर जीवन च उध्वस्त होते.

अपयश आले. मग ते अभ्यासात असो , प्रेमात असो , नोकरी मध्ये , व्यवसायात , नात्यात असो . किंवा आयुष्यात असो. नापास झालो .मागे राहिलो. रेस हरलो , नुकसान झाले म्हणजे आता संपले सगळे ही निराशा , हे हताश होणे हा दृष्टिकोन वाढत जातो. परत प्रयत्न करून , practice करून आपण रेस जिंकू शकतो, नाती टिकवू शकतो , व्यवसाय परत उभा करू शकतो हा आशावाद कुठेच नसतो.

आयुष्य खूप सुंदर आहे . मृत्यू सोडल्यास कोणताच शेवट नसतो. किती ही बिकट परिस्थिती असो. किती ही अडचणी असोत . प्रत्येकवेळी सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधारत नाही. कारण ते आपल्या अनेकदा लक्षातच येत नाही. कारण आपण दूरदर्शी नसतो. दूरवरचा दृष्टिकोन नसतो.

केवळ आता या क्षणाला जी घटना घडते आहे ती आणि तीच सत्य आहे. आणि तीच अंतिम आहे हेच गृहीत धरून जातं असतो. आणि त्याचमुळे मनाने आणि शरीराने ही खचतो. आणि आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे लक्षात येतं असून ही काहीवेळेस तसे प्रयत्न ही केले जात नाहीत.

अनेकवेळा मेंटल ब्लॉक येतात आणि काहीच सुचत नाही. त्यामुळे नक्की कोणता मार्ग स्वीकारावा यात सतत confusion होत राहते. कॉन्फिडन्स कमी होत जातो. आत्मविश्वास परत लगेच वाढणे ही शक्य नसते. आलेले अनुभव अजून नकारात्मक बनवत जातात.

व. पु. काळे म्हणतात की , सगळेच प्रश्न सोडवायला घेतले म्हणजे सुटत नाहीत तर काही सोडून दिले म्हणजे सुटतात .

कारण वेळ हे सगळ्या समस्यांवरील रामबाण औषध आहे. वेळ गेली की परिस्थिती ही बदलत जाते. मानसिकता ही बदलत जाते. योग्य मार्ग सुचत जातात.

आयुष्य सुंदर आहे. सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधारत नाही. तर भुंगा जसा लाकूड हळूहळू भोक पाडून कमकुवत करत असतो.

कॅन्सर जसे हळूहळू आपल्या शरीरात spread होत असतो. आणि अचानक एव्हढे प्रमाण वाढते की डॉक्टर ही हतबल होतात . तसे हे टेन्शन हळूहळू आपल्यात इतके भिनत जाते की आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली तरी सुधारणा होत नाही. म्हणून वेळीच त्यावर मार्ग शोधणे गरजेचे.

या टेन्शन मधून मुक्त होण्याकरिता आवडत्या गोष्टी करा. छंद जोपासा , आपल्या क्षमता ओळखा आणि त्याच्या मर्यादा आखा. किंवा मर्यादा वाढविण्याकरिता क्षमता वाढविणे गरजेचे. Skills वाढविणे गरजेचे. सकारात्मक राहणे गरजेचे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि एक मार्ग बंद झाला तरी दुसरा असतो हे सकारात्मक विचार गरजेचे. आयुष्य एकदाच मिळते ते असे उध्वस्त होवू देवू नका. कायम आशावादी रहा.

Don’t expect and accept हे तत्त्व ठेवून आपण जगत नाही. आपण कायम expect करत असतो आणि accept करत नसतो. म्हणूनच आपण सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, माहिती असून आपण सुधारत नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “सर्वच टेंशनचा अंतिम परिणाम जर उध्वस्तच आहे, मग आपण का सुधरत नाही.”

  1. Good one but from few days one after one new problem has arise and iam confuse where should I can concentrate
    Regards
    Rahul
    M8976800766

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!