इतरांनी कसं वागावं, हे ठरवून चालणाऱ्या लोकांपासून कायमच स्वतःला दूर ठेवा.
मयुरी महेंद्र महाजन
जेव्हा कि विषय वागणुकीचा आहे, तर सर्वप्रथम आपण आपल्या वागणुकीचे टप्पे बघूया की, ज्यामुळे आपली वागणूक ठरत जाते, आपण लहानाचे मोठे होत असतो, त्यावेळेस आपल्याला काय चुकीचे काय बरोबर हे कळत नसते, हीच ती वेळ असते ज्या वेळेस आपले आई-वडील आपल्याला संस्काराच्या माध्यमातून ती बीज आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न करतात ,वेळप्रसंगी आपल्याला दमदाटीही करतात, परंतु आपण योग्य मार्गावरती चालावे यासाठीचं, आपण आपल्या आई-वडिलांचे घरातील अन्य मंडळींचे अनुकरण करत असतो, आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो,
परंतु ज्या वेळेस आपल्याला सर्व समजायला लागतं, आपण कळते होतो, त्यावेळेस आपण आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित करतो, जे अन्य कुणा पेक्षाही नेहमीच वेगळं असतं, पण ज्या ठिकाणी आपण वावरतो ,त्या ठिकाणी प्रत्येक घटक आपल्या वागणुकीला अनुकूल असेलचं असं मात्र नसते, कारण बरीचं जणं अशी असतात की त्यांना असं वाटत असते, की सर्वांनी आपल्या म्हणण्यानुसारचं वागावं, आपण जे काही सांगतो त्याला महत्त्व द्यावं, आपण सांगणार तीच पूर्वदिशा अशी विचारधारा ठेवून जगणारी माणसं इतरांवरती आपली हुकुमत असावी आणि आपल्या सांगण्यानुसार सर्वांचे वागणे असावे, हा त्यांचा स्वतःसाठीचा ऐक स्वार्थी हेतू असतो,
येथे प्रत्येकाला आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे, आणि ते जीवन ती व्यक्ती आपल्या पद्धतीनुसार जगू शकते, इतरांनी कसं वागावं हे ठरवून चालणाऱ्या लोकांपासून कायमच दूर राहायला हवं, कारण आपल्या प्रत्येकाचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे ,आणि त्या आपल्या अस्तित्वाची जोड म्हणजेच आपली वागणूक ज्या वागणुकीला आपण इतरांच्या चालीवरती नाही खेळवू शकतं, कारण की कुणाला तरी वाटतं की मी असं करायला हवं ,कुणीतरी सांगतं की मी असंच वागायला हवं तर मग आपला आणि आपल्या बुद्धीचा उपयोग काय?? आपण आपल्या बुद्धीला चालना कधी देणार ??
आपली वागणूक ही प्रत्येक वेळेस बरोबर असेलचं असे नाही, त्या वेळी जर कोणी वडीलकीच्या नात्याने आपल्याला आपल्या चुकीच्या वागणुकी विषयी बोलत असेलं, तर ती गोष्ट वेगळी, कारण की आपल्या जवळच्या व्यक्तींनी जर आपल्या वागणुकीवरती बंधने लावलेली असतील ,तर ते आपल्या भल्यासाठीच असतात, हे सुद्धा आपण जाणले पाहिजे, प्रत्येकालाच असं वाटतं माझं वागणं बरोबरच आहे ,म्हणून काही आपण प्रत्येक वेळेस खरोखरच बरोबर असत नाही, कळत नकळत आपल्या वागणुकीला बाहेरचे वारे लागलेले असतातच .
परंतु आपली माणसं सोडून इतर जर आपल्याला कंट्रोल करू इच्छित असतीलं, आपण कसं वागावं, आपली वागणूक कशी असावी, हे ठरवत असतील तर मात्र अशा व्यक्तींना कुठलेही प्रतिउत्तर न येता त्यांच्यापासून दूरच राहिलेले बरे, कारण अशी लोक बनावटी चेहरा परिधान केलेली असतात, त्यांना स्वतःच्या वागणुकीचा आणि स्वतः करत असलेल्या कुठल्याही कामकाजाचा थांगपत्ता नसतो, आणि इतरांवर मात्र आपली हुकूमत गाजवण्यात फार रस असतो,
अशी लोक कधीच आपल्या वागणुकीला चांगले वळण देऊ शकत नाही ,उलट आपल्या चांगल्या वागण्याचा येथे फायदा घेतला जाऊ शकतो, आणि आपल्याला ते महागात देखील पडू शकते, अशी लोकं त्यांच्या स्वार्थाला साध्य करण्यासाठी आपल्या वागणुकीला एकंदरीत आपल्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वापरू पाहतात, त्यासाठी आपण आपले चांगले वागणे कधीही सोडू नये, आणि त्याचा कोणी फायदा येईलं, इतकेही कुणाचे ऐकू नये ,कारण आपलं वागणचं, आपलं जगणं सुंदर करत असते, योग्य त्या ठिकाणी आपण अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवण्यातच आपले शहाणपण असतं,
आपल्यालाही काही इच्छा आहेत, आपल्यालाही काही स्वप्न आहेत, जी आपण आपल्यासाठी पाहिलेली असतात, त्यामुळे आपल्या वागणुकीचे सूत्रधार आपणच असायला हवं ,आयुष्यात गुरु म्हणून मार्गदर्शन करणारी माणसे वेगळी कारण सच्चा गुरु आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे लक्षात घेऊनच आपल्या वागणुकीला वळण देण्याचा प्रयत्न करतो, लादत नाही ,कारण जिथे लादले जाते, तेथे हुकुमत असते ,आणि स्वतः चा स्वार्थ पूर्ण करण्याचा उद्देश्यही असतो, त्यामुळे आपणच आपल्या वागणुकीला योग्य ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करूया.
चांगले वागा ,चांगले जगा, जे जे चांगले आहे ,उत्तम आहे, ते शिका कुणामुळेही आपले चांगले वागणे सोडू नका, कारण शेवटी विजय सत्याचाच होतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
