Skip to content

सतत वाद घालून आपण आपली इम्युनिटी पॉवर प्रचंड वाया घालवतोय.

सतत वाद घालून आपण आपली इम्युनिटी पॉवर प्रचंड वाया घालवतोय.


सोनाली जे.


गेल्या दोन वर्षात कोरोना काळात , सध्या सगळ्यांच्या कानावर येणारा immunity हा शब्द सर्व परिचित आहे.

Immunity याचा अर्थ काय ?

Immunity म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीराची डिफेन्स मेकॅनिझम आहे. कोणत्याही बॅक्टरिया , व्हायरस , इन्फेक्शन against जे काम करते ते.

सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्याकरिता आपले सैनिक कायम सज्ज असतात. सीमापार करण्याचा बाहेरील देशातून कोणी प्रयत्न केला तर आपले सैनिक त्यांच्या विरुद्ध हल्ला चढवीत असतात. आणि शत्रू सैन्याला नष्ट करत असतात.

तसेच आपल्या शरीराचे रक्षण सेल्स म्हणजे पेशी करत असतात. त्यात ही काही पेशी नॉन स्टॉप काम करत असतात. bacteria , virus दिसले तर त्यांना मारणार . तर त्यातच काही पेशी अशा असतात ज्या त्याचे वर्गीकरण करतात. ते व्हायरस , bacteria कोणते आहेत हे शोधून ते specific सेल्स कडे ती information पाठवितात. त्या information आधारे काही सेल्स हे specific काम करत असतात. जसे की antibodies तयार करणे. आणि antibodies म्हणजे काय तर एक प्रकारचे प्रोटीन .

काही वेळेस व्हायरस , bacteria यांचा एव्हढा सतत भडिमार होत असतो की आपल्या शरीरातल्या नॉर्मल पेशी त्याला प्रत्युत्तर देवू शकत नाहीत अशावेळी शरीरातल्या antibodies मदत करतात आणि शत्रूचा नायनाट करतात.

आणि आपली हीच immunity system बिघडली की काही वेळेस आपले सैन्य हे विरूद्ध सैन्याला ओळखू शकत नाही. त्यांना समजतच नाही आणि त्यांच्या सैन्यात सामील होवून आपल्याच सैन्या विरूद्ध लढा करतात. आणि त्यातून आपली immunity power कमकुवत होत जाते.

Immunity वाढविण्यासाठी खरे सांगायचे तर कोणते औषध नाही. Immunity ही आपल्या शरीरातल्या डिफेन्स मेकॅनिझम वर , natural process वर अवलंबुन असते , तुमच्या लाईफ स्टाईल वर आणि आपला आहार आपण योग्य घेतला तर नक्की आपली immunity वाढते.

आता जसा शरीराचा विषय तसाच मनाचा ही. सतत वाद घालून आपण आपली इम्युनिटी पॉवर प्रचंड वाया घालवतोय. खरेच तर आहे.

मानव हा एकमेव प्राणी आहे जो विचार करू शकतो. ज्याला मन आहे. भावना आहेत. इच्छा , अपेक्षा आहेत. एकमेकांनी आपल्या मता प्रमाणे वागावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि यात जेव्हा कोणी एक मनमानी करतो / करते. तेव्हा साहजिक दुसरी व्यक्ती दुखावली जाते. वादाची सुरुवात ही कुठून ना कुठून एक ठिणगी पडून होत असते. अपेक्षा आणि अपेक्षाभंग हे वादाचे सगळ्यात मूळ कारण आहे.

वादाची करणे

१.अविश्वास , family सभासद असेल , जोडीदार असेल , प्रियकर , प्रेयसी , असतील, मित्र मैत्रिणी , भावंडे , मुले मुली , किंवा बिझनेस पार्टनर जरी असतील तरी त्याने / तिने असे वागावे , असे करावे असे दुसऱ्याला वाटत असते . आणि तसे नाही वागले किंवा कधी एखादी गोष्ट मोकळेपणाने सांगितली नाही. विसरली तरी त्यातून मुद्दाम केले असे मनाची ठाम खात्री होते आणि समोरच्यावर अविश्वास दाखविला जातो.

त्यातून विनाकारण वाद होत असतात.

२. संशय : एखादी आपलीच जवळची व्यक्ती आपल्यापासून काही तरी लपविते आहे ही गोष्ट. हा संशय एकमेकांच्या मध्ये वाद घडवून आणतो.

एखाद्याचे मत असे असते की सगळे काय सांगत बसायचे . तर एखाद्याला वाटत असते त्याने सगळे सांगावे.
इथेही वादाचे कारण संशय जरी असेल तरी मुळात अपेक्षा ही कारणीभूत आहे.

३. Possesiveness: एखाद्यावर आपलाच हक्क असे वाटत असते.
उदाहरण देते लग्न झालेल्या स्त्रीला नवरा फक्त माझा एकतीचा असे वाटत असते. पण जसे नवरा त्याच्या आई वडिलांना, भावंडाना , नातेवाईक यांनाही जवळचा असतो.त्यांच्या सोबत ही तो तेवढाच मोकळेपणे वागत असतो.तेव्हा बायकोला सारखे माझा हक्क त्याच्यावर , इतरांसाठी त्याने काही करायचे नाही. अशी एक चुकीची अपेक्षा मनात निर्माण होते. त्या possesiveness भावनेमधून वाद होतात.

४. Insecurity : काही वेळेस जोडीदार आपल्याला बघत नाही , काळजी घेत नाही , कधी ही सोडेल याची insecurity मनात असते. तर कधी बिझनेस मध्ये पार्टनर आपल्याला साथ देणार नाही .सोडेल याची insecurity असते. आणि त्यातून ही बरेचवेळा वाद होतात.

५. Stress , निराशा स्वतः ची आणि परत्नरची Negative काही गोष्टी सुरू झाल्या की immunity गमावली जातेच.

अस्थैर्य नात्यात असो किंवा व्यवसायात असो ते वादाचे कारण बनते.

आपले हक्क , आपल्या गोष्टी , केवळ मी पुरते विचार केले की वाद हे वाढतच जातात.

आपल्या माणसा सोबत वाद घालताना त्याच्या बद्दल जेव्हा आपल्याला वाटणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी कमी होवून त्याची जागा ही negative गोष्टी घेवू लागतात. तेव्हा साहजिकच आपलेच सैनिक आपल्या विरूद्ध लढाई करतात असे होते. म्हणजे काय तर आपले विचार हे बाहेरच्या कोणी तरी काही सांगितले असेल , किंवा आपल्या चुकीच्या अपेक्षा मनात येत असतील , भावना मध्ये गडबड होत असेल.

या बाह्य विचार , भावना , स्वार्थ , अविश्वास , संशय , या गोष्टींचा मारा आपल्या सैन्यावर म्हणजे आपल्यातल्या विचार , भावना यावर होत असतो. आणि काही वेळेस मारा इतका फास्ट असतो ते वाद इतके विकोपाचे असतात. की आपल्यात positive विचार वाढवून त्याला फाईट देण्याऐवजी हेच positive विचार negative होतात. आणि आपल्याच विचारांच्या विरूद्ध वागू लागतात.

अगदी शेवटी आपल्या शरीरातल्या antibodies वाढविण्या करिता प्रयत्न करणे गरजेचे असते. म्हणजे काय तर मग स्वतः ला समजत नसते कोणा दुसऱ्याच्या मदतीने , कधी motivational videos बघून आपल्यात विचारांची positivity वाढविणे गरजच असते. योगा , meditation , एकाग्रता , ध्यान धारणा , या गोष्टी ही करणे जरुरी असते. ज्यातून तुमचे शरीर आणि मन दोन्ही ही शांत , स्थिर होत असतात.

सततच्या वादात आपली energy विनाकारण वाया जाते. चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होवून वाईट गोष्टीचं दिसू लागतात. मन कलुशित होते. तसे शरीरातील Toxins वाढत जातात. आणि आपली immunity सततच्या त्या भडीमाराला तोंड देण्याऐवजी तो वाद , स्ट्रेस , negative विचार हे आपल्या सैन्यात सामील होवून आपले सैन्य ही त्यांच्याप्रमाणे वागू लागते.

आणि specific सेल्स ही काही वेळेस याला प्रतिकार करू शकत नाहीत. Antibodies कमकुवत पडतात. आपण अगदी फुटकळ गोष्टीवरून वाद घालत असतो. त्याने / तिने फोन केला नाही , मला बोलावले नाही , मला सोडून इतरांच्या बरोबर मात्र चांगले बोलले , माझे , माझ्या हक्काचे , स्वतः ला वाटते ते बरोबर दुसरा बरोबर असला तरी चुकीचे यातून वाद वाढतात आणि आपली energy वाया जाते. त्यातून कार्यक्षमता आणि immunity म्हणजे रोग प्रतिकारशक्ती ही कमी होत जाते.

कारण आपले शरीर सगळे toxic विचारांनी भरून गेले असते. त्यातून आपल्या शरीराला आणि मनाला पोकळ करत जाते. जसे भुंगा लाकूड पोखरून त्याचे घर आत पोकळी मध्ये तयार करतो तसेच काहीसे.

सतत वाद घालून आपण आपली इम्युनिटी पॉवर प्रचंड वाया घालवतोय.

यापेक्षा आयुष्याकडे आपल्या लोकांकडे , त्यांच्या छोट्या मोठ्या चुकांकडे सकारात्मकतेने बघा. स्वतः मध्ये बदल घडवा.

आयुष्य खूप सुंदर आहे .योग्य आहार आणि योग्य विचार, मार्गदर्शन यातून तुम्ही नक्कीच immunity वाढवू जरी शकता. आणि वाढवू शकला नाही तरी कमी नक्कीच होणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!