Skip to content

व्यक्तीकडे काहीही करण्यासारखं नसेल तर ती स्वतःशी अतिप्रमाणात बोलायला लागते.

व्यक्तीकडे काहीही करण्यासारखं नसेल तर ती स्वतःशी अतिप्रमाणात बोलायला लागते.


गीतांजली जगदाळे


तुम्ही स्वतःशी बोलता का? म्हणजे असं मनातल्या मनात नाही बरं का, कारण तसं तर आपण सगळे नेहमीच मनातल्या मनात विचार करता-करता स्वतःशी बोलत ही असतो. पण अगदी आपण इतर लोकांशी बोलतो तसे मोठं-मोठ्याने आपण स्वतःशी देखील बोलतो का?

अशी सवय जरी तुम्हाला असेल तरी त्यात काळजी करण्यासारखं काही नाही. कारण तसं बघायला गेलं तर या सवयीचे तोटे कमी आणि फायदेच जास्त असतात. पण रिकामटेकडेपणामुळे अशी सवय लागली असल्यास मात्र तिकडे लक्ष देणं गरजेचं असू शकतं.

शक्यतो ज्या माणसांना ही सवय असते त्यांना ती लहान असतानाच लागलेली असते . स्वतःशी बोलण्याचे काही फायदे आहेत ते आपण पाहुयात –

स्वतःशी बोलल्याने आपले विचार आपल्यालाच अधिक clear होतात . कसल्याही गोंधळाशिवाय आपण आपले निर्णय किंवा विचार ठामपणे मांडू शकतो . स्वतःशी बोलल्याने खूप गोष्टी बोलता-बोलताच realize होत असतात. ज्याने काही problems ची उत्तरे मिळून जातात आणि नवे मार्ग ही सुचतात .

आपण जे स्वतःशी बोलतो मग ते कामांची लिस्ट , शॉपिंग लिस्ट किंवा रोजच्या घडामोडींबद्दल असो ते स्वतःशीच बोलल्याने आपल्या लक्षात ही खूप चांगल्याप्रकारे राहतं .

बऱ्याचदा टफ (अवघड) सिचवेशन मध्ये आपण फ्रस्ट्रेटेड होतो , मार्ग कसा काढावा सुचत नसतं आणि त्यामुळे खूप चिडचिड होत असते अशावेळी आपण आपल्या सवयी प्रमाणे या परिस्थिती बद्दल जेव्हा स्वतःशी बोलायला लागतो तेव्हा बोलता बोलता नवीन काहीतरी आयडिया तर सुचतेच, पण त्याचबरोबर आपल्याला त्या सिचवेशनला फेस करण्यासाठी मोटिवेशन सुद्धा आपल्याच self-talk मधून मिळत असते. पण या सगळ्यासाठी आपण स्वतःशी बोलतो म्हणजेच आपला self-talk हा पॉसिटीव्ह असणं फार महत्वाचं आहे . जर आपण ‘तुला जमणार नाही , तू करूच शकत नाही’ अशाप्रकारचा self-talk करत असू तर त्याने आपलं खूप नुकसान होऊ शकतं आणि त्याचबरोबर आपला आत्मविश्वास ही डळमळीत होऊ शकतो.

पण हे झालं नॉर्मल माणसांचं, जे काम करतात , ज्यांच्या आयुष्यात काही ना काही करण्यासारखं आहे, ध्येय आहे . पण जी माणसे रिकामटेकडी आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यात करण्यासारखं काही आहे असं त्यांना वाटत नाही, अशा माणसांचं एकूणएक सगळंच जरा अवघड असतं . कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं . त्यासाठी जस आपण योग्य आहार घेणं , व्यायाम करणं, मेडिटेशन करणं गरजेचं आहे तसेच आपलं काहीतरी ध्येय असणं , आपण काहीतरी जबाबदारी उचलणं , काम करणं ही तितकंच महत्वाचं आहे .

मानवी मेंदू हा खूप complex आहे , तसेच आपल्या मेंदूच्या शक्तीला जर काही कामरुपी खाद्य दिलं नाही तर त्याचा ही आपल्या mental health वर परिणाम होतो. ते म्हणतात ना ‘खाली दिमाग शैतान का घर होता है ‘ अगदी तसंच . जर आपल्याकडे काही जबाबदारी नसेल, किंवा करायला काहीच नसेल तर मेंदू असा रिकामा राहतो. आणि मग नकोनको त्या कल्पना, विचार त्यात घर करायला लागतात.त्यामुळे काही माणसे रिकामटेकडेपणात स्वतःशीच बोलायला लागतात , कधी-कधी तर आजूबाजूला कोण आहे याच ते भान ही विसरून जातात.

आता सगळीच रिकामटेकडी माणसे अशीच असतील असं नाही, पण काही माणसांना अशी सवय लागून जाते . बडबड करण्याने काही नुकसान होत नाही हे जरी बरोबर असलं तरी ज्या अर्थी ते अतिप्रमाणात स्वतःशी बोलतायेत त्या अर्थी ते कुठेतरी overthinking करतायेत म्हणजेच अतिविचार करतायेत . आणि अतिविचाराचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. नसलेले प्रॉब्लेम देखील अतिविचार करताना आपल्याला सिरीयस वाटायला लागतात आणि त्यामुळे खूप टेन्शन येत .

त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्याला एखादया योग्य कामात गुंतवून घेणे फार महत्वाचे आहे. जसं अति कामाच्या ताणाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तसंच काम नसल्याचे गंभीर परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. अतिप्रमाणात बडबड करणं हेच मुळात mental illness च लक्षण असू शकतं. Anxiety, आत्मविश्वासाचा अभाव , ADHD (attention deficit hyperactivity disorder), substance use अशी देखील काही कारणे आहेत ज्याने माणूस अतिप्रमाणात बडबड करायला लागतो .


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!