व्यक्तीची कुठलीही एक भावना अडकून पडली की त्याचा इतर भावनांवर ही परिणाम होतो.
पुजा सातपुते
माणूस म्हंटलं कि भावना या आल्या आणि भावना हा शब्द ऐकला तर किती साऱ्या आठवणी समोर येतात ना. कधी प्रेमाच्या तर कधी रागाच्या, कधी आनंदाच्या तर कधी दुःखाच्या. प्रत्ये्यक व्यक्तीचं मन हे वेगळ असतं. कोणी खूप हळवे असतात तर कोणी खूप कठोर असतात, पण कुठलीही व्यक्ती कितीही कठोर असली तरी त्यांच्यात भावना या असतातच.
काही लोकं आपल्या भावना सहज मोकळ्या करतात तर काही जण मनात दाबून ठेवतात. कधी जर कोणी रागावला तर काही जण पराकोटीला जातात, तर काही जण पटकन माफ करतात. थोडक्यात काय तर काहींना इमोशन्स कंट्रोल करायला जमतात तर काहींना वेळ लागतो.
वेळ सर्व काही ठीक करते पण आपल्याला वेळेनुसार स्वतःला सावर्ण ही गरजेचं असतं. तीच तीच गोष्ट आठवत राहिली किव्हा कुठल्याही व्यक्ती मध्ये खूप गुरफटून राहिलं, आपल्या भावना त्यात अडकून राहिल्या तर त्याचा परिणाम आपल्या इतर भावनांवर व्हायला सुरु होतो आणि त्यामुळे आपण आपल्या पुढच्या जीवनाच्या प्रवासावर नकळत फुल्ल स्टॉप लावतो.
आत्ता राग ही एक अशी भावना आहे कि ती जर पराकोटीला गेली तर काय चांगलं किव्हा काय वाईट याचं भान राहत नाही त्यामुळे आपले रेलशन्स उध्वस्त होण्याचे चांसेस निर्माण होतात.
खूप हळवे होणं पण घातक असतं. त्यामुळे आपल्या मनात डिप्रेशन ची भावना निर्माण होते व आपल्या आयुष्यात काही वाईट झालं तर आपण स्वतःला सांभाळ्यात अयशस्वी होतो आणि त्यामुळे आपण कुठेतरी अडकून राहतो.
म्हणतात ना खूप दुःखही चांगलं नसतं, खूप आनंद ही चांगला नसतो, खूप रागही चांगला नसतो, खूप हळवेपणा ही चांगला नसतो. आपली कुठलीही भावना खूप वेळ अडकून पडली तर साहजिकच त्याचा आपल्या इतर भावनांवर परिणाम होतो.
आपण दुःखी किव्हा रागावलेलो असलो तर आपल्या जवळचे लोकं आपल्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात पण आपण जर आपल्या भावनेत खूप अडकलेलो असलो तर नकळत आपल्या भोवती आपण बाउंडरी तयार करतो व सर्वांपासून स्वतःला लांब करतो. तसच हळवेपणाचंही आहे, खूप हळवेपणा मुळे आपोआपच लोकं आपल्या पासून दुरावतात.
प्रत्ये्यक भावनेचा समतोल हा असला पाहिजे म्हणजे आपण आपल्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहत नाही. आपल्या भावनांवर जर आपला कंट्रोल असला तर कुठलाही प्रसंगातून आपण सहज रित्या सुटतो. मानलं तर आपलं आयुष्य खूप सोप्पं आहे आणि योग्य रित्या जगलं तर खूप सुंदरही आहे.
प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रसंगातून जात असतो. कधी तो प्रसंग अचानक समोर येतो तर काहीजण स्वतः आपल्यावर ओढवून आणतात. कधी कोणाला कशावरून वाईट वाटेल, राग येईल हे सांगता येत नाही आणि कोण किती स्वतःच्या भावनांवर परिणाम करेल हे ही सांगता येत नाही.
दुसऱ्यांचं आयुष्य आपल्या हातात नसतं पण आपलं आयुष्य हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. कोणाचं बोलणं किती मनावर घ्यायचं हे आपल्या हातात असतं, अपयशाला कसं सामोरं जायचं हे पण आपल्या हातात असतं.
वेळेत आपल्या भावनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. भावनेत जाऊन नेगेटिव्ह विचार करू नका. खूप आनंदातही स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा म्हणजे जेणेकरून पडत्या काळी आपल्या मनावर आपला ताबा राहतो. कारण सगळे दिवस सारखे नसतात. तर मग का आपण एकच भावना मनात धरून ठेवायची.
स्वतःच्या भावनांवर ताबा आणायचा असेल तर स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून घ्या, वाचन करा, मेडिटेशन करा, नेगेटिव्ह विचारान पासून व नेगेटिव्ह लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. आपले जे खास लोकं आहेत जे आपल्यावर खूप प्रेम करतात आणि आपल्याला डिप्रेशन मधून बाहेर आण्याचा प्रयत्न करतात त्यांना साथ द्या. त्यांच्याही भावनांचा आदर करा. तुम्ही जर तुमच्या भावनांवर नियंत्रण आणलं तर कितीही वाईट प्रसंग असो तुम्हाला योग्य दिशा ही सापडणार आणि तुम्ही त्यातनं बाहेर पडणार.
आपलं लईफ हे आपल्यावर अवलंबून असतं. जर वेळेत आपल्या भावनांवर नियंत्रण आणाल तर आपोआपच तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं वाटू लागेल. प्रयत्न करा आणि आपल्यात व आपल्या भोवती एक हसरं खेळतं वातावरण निर्माण करा. असं वातावरण जिथे खूप दुःख झालं तरी त्रास नाही, खूप आनंद झाला तरी हुरळून जाणं नाही, खूप हळवे पणा ही नाही, खूप कठोर पणा ही नाही, एक समतोल वातावरण व भावना ज्या आपल्या आयुष्याला एक फुल्ल स्टॉप नाही तर कॉन्टीनुऊस फुल्ल स्टॉप लावून आपल्या आयुष्याची स्टोरी पुढे नेण्यात मदत करेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
