Skip to content

व्यक्ती जेव्हा पूर्णतः बोलायची बंद होते, तेव्हा ती वाईट काळातून जात असते.

व्यक्ती जेव्हा पूर्णतः बोलायची बंद होते, तेव्हा ती वाईट काळातून जात असते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


विवानच वागणं दिवसेंदिवस सर्वांच्या चिंतेचा विषय बनत चाललं होत. पण कोणी काही करू पण शकत नव्हतं. कारण तो अलीकडे स्वतःच्या कोषात असा काही अडकला होता की ज्यातून कोणालाच त्याला बाहेर काढता येईना. कारण तो काही बोलतच नव्हता. आता काही व्यक्ती मुळतः

अंतर्मुखी असतात, कमी बोलतात. पण हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो ज्यात काही गैर नाहीये. स्वभावाने शांत असणं हा एखाद्याचा गुण असूच शकतो. पण रोज घडाघडा बोलणारी व्यक्ती, सर्वांमध्ये मिसळणारी व्यक्ती जेव्हा अचानक बोलायची बंद होते तेव्हा ते काळजी करण्याच एक कारण बनून जाते. कारण अस तेव्हाच होत जेव्हा त्याच्या मागे काही गोष्टी घडलेल्या असतात. अशी अचानक व्यक्ती गप्प होत नाही.

विवानबाबत पण असच काहीस झाल्यासारखं वाटतं होत. अगदी परीक्षा तोंडावर आलेली असताना जो मुलगा बिनधास्त होता. जो दुसऱ्यांना दिलासा देत होता की काही होत नाही रे, आपण आरामात पास होऊ, कश्याला टेन्शन घेता? चिल मारा. त्याने स्वतः तर कधी या गोष्टीचं टेन्शन घेतलच नाही. बुद्धीने पण हुशार होता. त्यामुळे कितीही मस्ती केली काहीही केल तरी त्याला त्याचा अभ्यास आणि या गोष्टी यांचं व्यवस्थित नियोजन करता येई. त्याच एकच मत जे काही करायचं ते आनंद घेऊन करायचं, मग ते कष्ट का असेनात? आनंद घेऊन एखादी गोष्ट केली की ती अजून चांगली होते.

टेन्शन घेऊन अजून त्रासच होणार. त्याच्या या बोलण्याने खरच इतरांना दिलासा मिळत असे. प्रोत्साहन मिळत असे. मित्रपरिवार तर खूप मोठा. कारण याचा सगळीकडे सहभाग पण होता. अस सगळ असताना याच अचानक शांत होण सर्वांच्या जिव्हारी लागत होत.

मित्रांची, जे ओळखत होते त्यांची अवस्था अशी झाली होती तर घरातल्या माणसांची काय कथा. सर्वांनी आपापल्या परीने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, त्याला बोलत करायचा पण प्रयत्न केला. पण तो काही बोलतच नसे. काही नाही झालं आहे, मी ठीक आहे इतकचं तो बोले.

पण त्याच्या या गप्प बसण्यामागे खूप मोठं काहीतरी घडल होत इतकं मात्र नक्की. त्याच्या आत जी खळबळ माजली होती ज्याच्याबद्दल फक्त त्यालाच माहीत होत. दुसऱ्या कोणालाच त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दुःखाची गोष्ट ही होती की कोणालाच काही लक्षात येत नसल्याने त्याला जे काही दुःख होत असेल, त्रास होत असेल त्यातून बाहेर काढायचा मार्ग देखील सापडत नव्हता.

अशी अवस्था माणसाच्या आयुष्यात येते जेव्हा ती अबोल होऊन जाते. पण हा अबोला असून आत साठवून ठेवलेल्या दुःखातून आलेला. हा अबोला असतो आत चालू असलेल्या वादळ, खळबळीतून आलेला. माणूस शांत होता याच कारण तो आयुष्याच्या अश्या वाईट काळातून जात असतो जिथे काय बोलायचं, किती आणि कोणाशी बोलायच हेच त्याला समजेनास होत.

आत इतकं जास्त साठलेलं असत की ते व्यक्त पण करता येत नाही. झाल्या गोष्टींचा मनावर प्रचंड धक्का बसलेला असतो ज्यातून ती व्यक्ती स्वतःला सावरू शकत नसते आणि अश्या वेळी माणसाचा इतर माणसांशी संपर्क कमी होत जातो, तुटत जातो. व्यक्ती स्वतःच्याच कोशात अडकत जाते.

इथे त्यांना बोलत करण, त्यांचं दुःख समजून घेऊन त्यातून त्यांना बाहेर काढयला मदत करण ही वाटते तितकी साधी सोपी गोष्ट नसते. कारण जी व्यक्ती काही बोलतच नाही तिच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला तरी कसं कळणार? अश्या वेळी तिला सरळसोट त्याची कारण विचारणं, जबरदस्ती बोलायला लावणं यातून काही नाही त्या व्यक्तीचा त्रासच अजून वाढतो. काही वेळा शब्द नाही तर आपली कृती त्या माणसाला खूप मदत करत असते.

आपल्याला न बोलता देखील समोरच्या व्यक्तीला याची जाणीव करून द्यावी लागते की तिला जो काही त्रास होत आहे तो मी समजून घेईन, तिने फक्त मोकळं व्हावं, जे काही आहे ते बाहेर काढावं. जी जाणीव आपल्याला न बोलता करून द्यावी लागते. असा एखादा माणूस जो खूप दुःखातून जातोय, कोणाशी काही बोलत देखील नाही.

अश्या माणसं शेजारी फक्त जाऊन बसल आणि खांद्यावर हात ठेवला, तो जो स्पर्श आहे तो त्याला खूप काही देऊन जातो. कारण त्या स्पर्शात उबदारपणा असतो, विश्वास, धीर असतो. काही न बोलता फक्त एकदा जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवलं तरी त्या माणसाला आपल्या सोबत कोणीतरी आहे याची जाणीव होते आणि हेच खूप जास्त महत्त्वाचं असत.

मदत करण्यासाठी आधी त्या माणसाचं मन समजून घ्यावं लागतं, त्यात जागा निर्माण करावी लागते. आपण मनाने जेव्हा त्या व्यक्तीच्या जवळ जातो तेव्हाच तो तिचं मन आपल्यासमोर उघड करते आणि त्यातून तिचं दुःख कमी व्हायला मदत होते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!