Skip to content

विषय तेथेच सोडून द्या, जेथून तुम्हाला होणारा त्रास आता असह्य होवू लागतो.

विषय तेथेच सोडून द्या, जेथून तुम्हाला होणारा त्रास आता असह्य होवू लागतो.


काव्या गगनग्रास


जानकी सोड ना आता! किती त्रास करून घेणार आहेस? माझी आजी नेहमी म्हणते, झालं गेलं गंगेला मिळालं. आपण झालेलं बदलू शकतो का? नाही ना ! आपल्या हातात नसतं ते. पण आपण जर त्यातून पुढे गेलो तर काहीतरी मार्ग काढू शकतो. जानकी मुसमुसत म्हणाली, प्रिया तू म्हणतेस ते पटत नाही अस नाही ग! पण मी इतकी मेहनत घेतली होती, तरी अस व्हावं त्याच वाईट वाटत मला. इतका अभ्यास केला, प्रॅक्टिस केली तरी माझं सिलेक्शन झालं नाही. तूच सांग तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत.

प्रियाला तिच्या दुःखाची पुरेपूर जाणीव होती. पण आता जानकी चा त्रास तिचा तिलाच असह्य होत होता म्हणून ती जानकी ल समजावत होती. प्रियाच्या प्रश्नावर ती म्हणाली, जानु त्रास मला पण झालाच असता. तो कोणालाही होणार, त्याबद्द्ल मी बोलत नाही. पण तो किती वाढवायचा हे आपल्या हातात आहे. तू मेहनत घेतली, सर्व केलं पण सिलेक्शन होण तुझ्या हातात होत का ? नाही. त्यामुळे ते झालं नाही म्हणून त्याबद्द्ल त्रास करून घेऊन तो इतका वाढवण्यात काय अर्थ आहे? त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.

आपला हा त्रास रबर बँड सारखा असतो बँड तू जितका ताणणार तितका तो लगेच तुटणार. त्याला एका पॉइंट नंतर सोडावं लागत. तसच हे आहे. जो विषय आपण बदलू शकत नाही. ज्यातून आपल्याला त्रास होत आहे तो विषय तिथेच सोडून दिलेला ठीक नाही का?

आता तुझा रिझल्ट समजून चार पाच दिवस झाले. तरी तू त्याचा इतका त्रास करून घेत आहेस. याचा तुझ्या पुढच्या स्पर्धेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तुला मी म्हणत आहे की हा विषय इथेच सोड आणि पुढे अजुन कस चांगलं परफॉर्म करता येईल याकडे लक्ष दे. ते तुझ्या हातात आहे.

Let the things go if they bother you to much. एक खूप छान वाक्य आहे. “Yesterday is history, tomorrow is a mistery, but today is gift that’s why it’s called present.”
जे होऊन गेलं ते आपण बदलू शकत नाही. जे पुढे होणारे ते आपण पाहू पण शकत नाही. पण आता आपण काहीतरी नक्कीच करू शकतो जे आपल्या हातात आहे. म्हणून तुला हा विषय सोडून तू आता काय करू शकते यावर लक्ष दिलं पाहिजे. प्रियाच्या या बोलण्याने जानकीच्या मनाला थोडीतरी का होईना उभारी मिळाली व तिनेही ठरवले यापुढे झालेल्या गोष्टीमध्ये अडकून न पडता त्यातून बाहेर पडून पुढे काय करता येईल याचा विचार केला पाहिजे.

आपणही अनेकदा काय झालं तर त्याचा खूप त्रास करून घेतो. त्या गोष्टी वाढवतो. ज्याची काही गरज नसते. मनात जर एकसारखे विषय साठवून ठेवले तर त्याच डबक व्ह्यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच त्याला निर्मळ ठेवायचं असेल तर झऱ्यासारख वाहत असल पाहिजे. गोष्टी तिथल्या तिथे सोडता आल्या पाहिजेत.
कारण,

If you want to fly in the sky, you need to leave the earth.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “विषय तेथेच सोडून द्या, जेथून तुम्हाला होणारा त्रास आता असह्य होवू लागतो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!