विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवतो आणि त्रास करून घेतो. उदाहरणं पाहूया.
सोनाली जे.
बरेचवेळा असे घडते की विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवतो आणि त्रास करून घेतो.
खरेच आपला कित्येक गोष्टी , व्यक्ती , वस्तू यांच्याशी काही ही संबंध नसतो तरी बरेचवेळा विनाकारण आपण स्वतः ला त्यात गुंतवतो. आणि वरती त्यांचे दुःख , त्रास आपण आपल्याकडे घेतो. आनंदाचे त्यांचे क्षण फार कमी वेळा घेतो आपण.
विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवतो आणि त्रास करून घेतो. उदाहरणं पाहूया.
१. निशा आणि तिच्या सासू बाई यांचे त्यांच्या भजनाच्या बाई यांचे सोबत खूप घनिष्ट संबंध. बरं. राहायला ही अगदी जवळ जवळ. फोन , भेटणे , भजने , गेट टुगेदर , बाई सुगरण होत्या.
परवा रात्री बारा वाजता निशाला फोन आला. बाई गेल्या. निशाला त्यांचे सगळे आजारपण आठवले. गेली चार वर्ष त्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाला तोंड देत होत्या. तरी ही कायम आनंदी होत्या. इतकी प्रचंड वेदना सहन करत होत्या पण चेहऱ्यावर त्रास , दुःख , यातना याचा कुठ ही लवलेश नाही. शेवटपर्यंत active, लोणची , मुरंबे सगळे करून उत्साही परत.
रात्री एवढ्या उशिरा बातमी समजली त्यामुळे निशा ला जाता ही येईना . बरं फोन वाजला त्यामुळे सासूबाई ही उठल्या आणि त्यांना ही बातमी समजली. त्यांना त्रास होवू नये म्हणून निशा ने खूप प्रयत्न केले. त्यांच्या सोबत थांबली. इतर विषयावर गप्पा. तरी आईंचा विषय फिरून बाईंवर मग निशा नी त्यांना त्यांच्या चांगल्या गोष्टी काय होत्या ते आठवा सांगितले. त्यांच्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी , भजने शिकलो ते आठवा , त्या शेवटपर्यंत सकारात्मक होत्या.
निषाच्या सासूबाई मात्र दुसरे दिवशी बाईंच्या सुनेला फोन करून वाईट झाले .मी बाईंच्या दहा मंडळांना कळविते म्हणाल्या.
नंतर त्यांचे फोनवर फोन सुरू. तेच तेच विषय परत परत .कसे झाले , काय झाले प्रत्येकाला सांगताना त्या तेच तेच बोलून त्यांना अजून जास्त त्रास होत होता. तेव्हा मात्र निशा त्यांना म्हणाली तुमचे वय ८३ वर्ष आणि तुम्ही विनाकारण स्वतःला नको तिकडे गुंतवून आणि त्रास करून घेत आहात.यापेक्षा भजनाच्या बाईच्या सुनेला त्यांच्या व्हॉटसॲप ग्रुप वर सगळी मंडळ आहेत त्यावर एक मेसेज करायला सांगा.
तिलाही ते सोपे .. तुम्हालाही त्रास होणार नाही. परत परत तेच विचार , बोलणे , इतरांना सांगणे याचा विनाकारण तुम्हाला त्रास होतो त्यापेक्षा हा सोपा मार्ग. तरीही त्यांचे सगळ्यांना फोन करून सांगणे .त्याच विषयावर परत परत चर्चा , त्यात विनाकारण गुंतून स्वतः त्रास करून घेणे चालूच होते.
भावना मान्य आहेत. आपली व्यक्ती जाणे याचे दुःख खूप मोठे असते. पण होवून गेलेली घटना , किंवा कधी ही बदल घडून येवू शकणार नाही अशी परिस्थिती माहिती असताना विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवतो आणि त्रास करून घेतो..
२. मनु आणि सोनू दोघी खूप चांगल्या मैत्रिणी . मनु खूप मोकळेपणाने सोनू ला सगळे सांगत असे. पण सोनू मात्र कायम रिझर्व्ह राहत असे. काहीच सांगत नसे. पण मनू चे सगळे friends तिला माहिती. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नबर्स तिच्याकडे प्रत्येकाला मेसेज करत असे. सगळे तिला कॉन्टॅक्ट करत . हळूहळू मनू च तिच्या friends circle मधून बाहेर पडली. कोणाबरोबर च तिचे कॉन्टॅक्ट राहिले नाहीत.
सोनू मात्र उगीच अधून मधून तिला विचारत असे की काय कोणाचे फोन , भेटली का .. मग मनू चे असे होई की का मुद्दाम विचारते. कारण एक दोन चांगले friends मनू ला कायम सांगत की सोनू चे मेसेज आले होते. ते काय कसे , आणि सोनू मात्र कायम म्हणायची नाही कोणाचे कॉन्टॅक्ट नाहीत. मेसेज पण नाहीत. आणि मग मनूला कोणाचे मेसेज आले का विचारत असे.
सोनू असे का सगळ्यांच्या सोबत जवळीक करते हा कायम प्रश्न मनू ला पडत असे. आणि तिचे विचारचक्र भरकटत असे. सोनू चे काही तरी मनूच्या friend सोबत बिनसले. मग मनू त्याच्याबद्दल सांगत असे. असे का वागला ? काय झाले असेल ? मग मनू ही म्हणत असे थांब समजेल. वेळ दे त्याला. सांगेल. किंवा मग कोणती कारणे असावीत याचे तर्क .त्यावर उपाय इलाज काय करावे हे तेवढे सोनूला मनू सांगत असे. आणि सोनू मात्र तिच्या आणि मित्राच्या मध्ये झालेला समेट, बोलणे हे काहीच मनू ला सांगत नसे.
यातून मनूला नेहमी वाटे की ती तिची energy , विचार आणि सोनू ची काळजी म्हणून किंवा आपल्याच मित्र आणि मैत्रिणी मध्यें पॅच अप करण्याकरिता मनू प्रयत्न करत असे.
खरे तर कोणी एव्हढे लहान नव्हते की कोणी कोणाची मध्यस्थी करावी , आपल्या friends चे वाद किंवा गैरसमज मिटवून देण्याचे प्रयत्न हे सगळे विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवतो आणि त्रास करून घेतो असे मनू ला आता जाणवू लागले होते.
खरे तर विनाकारण खरेच कोणाच्या आयुष्यात डोकावून ही पाहू नये. आणि कोणी काही एकमेकांविषयी सांगितले तरी लक्ष ही देवू नये. कारण चांगले मित्र मैत्रिणी क्षणात भांड्यात ही आणि एकत्र ही येतात.
लहान मुले याचे उत्तम उदाहरण . आपलीच मुले ..मुली ..म्हणजे ती भावंडे भांडतात आई जर कोणाच्या एकाच्या बाजूने बोलली तर दुसऱ्याला / दुसरीला राग येतो.बरोबर तो / ती लाडकी तुम्ही त्याची/ तिची च बाजू घेणार वरती ही बोलणी ऐकून घ्यायची. आणि थोडा वेळ गेल्यावर परत ही भावंडे , आपलीच मुलगी आणि मुलगा सगळे भांडण विसरून परत खेळताना , दंगा करताना दिसतात.
पण त्या क्षणिक वादात आई , वडील मात्र विनाकारण आपण स्वतःला नको तिकडे गुंतवून आणि त्रास करून घेतोना दिसतात. आणि वाईटपणा ही घेतात..
म्हणून खरे तर विनाकारण आपण स्वतः ला आहेत नको तिकडे गुंतवून त्रास ही करून घेवू नयेत. आणि चिंता ही नकोत. जेवढे सांगितले कोणी बरं म्हणून एका कानाने ऐकावे आणि सोडून द्यावे किंवा स्पष्ट सांगावे आपण दुसऱ्या कोणत्या तरी विषयावर बोलुयात. किंवा यात मला काही इंटरेस्ट नाही असे म्हणून अलिप्त व्हावे. पण विनाकारण गुंतून स्वतः त्रास करून घेवू नये.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

सत्य आहे ह्या घटना खुप चांगले वाटते