वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया सुद्धा प्रेमात पडतात, कारण…
हर्षदा पिंपळे
“प्रेम”…. प्रेम शब्द जरी कानावर पडला तरी कित्येकांच्या मनात गुदगुल्या होतात.पोटात फुलपाखरं भिरभिरतात.आणि प्रेम हे कुणावरही करता येतं.एखादा पाळीव प्राणी असो वा निसर्ग असो.प्रेम त्यांच्यावरही करता येतं.प्रेम शब्दात खरचं काहीतरी वेगळी जादू नक्कीच असावी.भल्याभल्यांना भुरळ घालणारं हे प्रेम म्हणजे अजबच म्हणावं लागेल.पण हेही तितकच खरं की प्रेमाची परिभाषा मोजक्याच लोकांना कळते.प्रत्येकालाच प्रेम म्हणजे काय हे कळत नाही.आकर्षणालाच प्रेम समजणारी लोकं आजही या जगात आहेत.आकर्षणाला प्रेमाचं नाव देऊन ती सरळ मोकळी होतात.
तर असो…प्रेमावर कितीही बोललं तरी कमीच पडेल.
आता मला सांगा प्रेमाला कसलं बंधन असतं का ?
तर साहजीकच प्रत्येकाची यावर असलेली मतं नक्कीच वेगळी असू शकतात.कुणी म्हणेल प्रेमाला बंधन नसतं पण त्याला बंधनं घातली जातात. कधी कधी वयाची तर कधी कधी जातीची, धर्माची. काही लोकं बोलतील आमच्या घरात प्रेम शब्द उच्चारला तरी सगळं अवघड होऊ शकतं.
तर मित्रांनो,खरं तर आपल्या समाजात आजही म्हणावं तसं प्रेमाला सहजासहजी कुणी स्विकारत नाही. आणि स्विकारणारेच याला स्विकारतात.असं म्हणतात की,प्रेमाला कसलं बंधन नसतं.जातीचं आणि धर्माचंही नसतं.आणि हो,या प्रेमाला वयाचही काही बंधन नसतं.
कुणी कोणत्याही वयात प्रेमात पडू शकतं.आणि कुणी मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतं तर कुणी लहान व्यक्तीच्याही प्रेमात पडू शकतं.प्रेमाला कसलीच सीमा नसते असं म्हणतात तसं त्याला वयाचीही सीमा नसतेच.आपण प्रत्येकाने याचा अनुभव घेतलाच असेल. म्हणजे आजुबाजूला अशी उदाहरणं आपण बघतोच.यामध्ये सामाजिक माध्यमेही काही मागे नाहीत.
टीव्ही सिरीअल मध्ये तर हमखास अशा लव्हस्टोरीज् दाखवल्या जातात.आता जाती-धर्म आणि वय,रंगरूप बघून खरं तर कुणीही प्रेमात पडत नसावं.(काही अपवाद नक्कीच आहेत)तर म्हणूनच केवळ तरूणीच नाही तर वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियासुद्धा प्रेमात पडतात.केवळ चोवीस पंचविशीतीलच स्त्री प्रेमात पडते असं नाही. चाळीशीतील स्त्रीसुद्धा ही कधीतरी प्रेमात पडतेच.आता याची कारणं नक्कीच वेगवेगळी असू शकतात.
तर प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे हे सर्वांनाच माहीत असेल.त्यामुळे तीचा सहवास प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा असतो.त्या भावनेपासून लांब रहावं असं कुणालाही वाटत नाही. प्रत्येकजण प्रेमासाठी धडपडत असतो.प्रेम मिळवण्यासाठी मनुष्य काय काय करत नाही. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही अनेकदा मनुष्य साध्य करण्याचा प्रयत्न करतो.
‘नैसर्गिक भावना’
प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. आणि ती भावना एखाद्याविषयी नैसर्गिकरित्या मनात सहज निर्माण होऊ शकते.त्यामुळे एखादी वयाने मोठी असलेली स्त्रीसुद्धा नक्कीच कुणाच्यातरी प्रेमात पडू शकते.मुळातच भावना ही नैसर्गिकरित्या निर्माण होते म्हणून वय इथे सहसा मॅटर करत नाही.मग त्या स्त्रीचे वय पस्तीस असो वा चाळीस असो.नैसर्गिकरित्या निर्माण झालेली ही भावना त्या स्त्रिला प्रेमात पडण्यापासून अडवू शकत नाही.
‘भावनिक गरज’
वयाने मोठी असली तरीही तीदेखील एक माणूस आहे. आणि माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम ही त्याची भावनिक गरज असते.अगदी तसच,वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांनाही भावनिक गरजा असतात. प्रेमाची गरज त्यांनाही असते.त्यामुळेच कुणी जर मनापासून प्रेम करत असेल तर त्यालाही ती स्त्री मोकळेपणाने स्विकारते.
तसेच एखाद्या स्त्रीला तर कधी घरातील माणसांचही प्रेम मिळालेलं नसतं.कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं,आपल्यावरही प्रेम करावं असचं तिला वाटतं.
त्यामुळेच एखाद्याच्या सहवासात राहणं तिला आनंद देत असेल,सिक्युर फील करून देत असेल तर स्त्री प्रेमात पडायला मागे पुढे पाहत नाही.
स्त्रिया एकटं जगू शकत नाही असं नाही. त्या निःशंकपणे एकट्याने जीवन जगू शकतात. पण तरीही काही स्त्रियांना कुणाच्या तरी आधाराची गरज भासते.आपला जोडीदार आपल्याला पूर्णपणे समजून घेऊ शकतो, आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खंबीरपणे सपोर्ट करू शकतो असा विश्वास त्यांना वाटतो.
तर काही स्त्रियांकडे सगळं असतं.गाडी, बंगला, ऐशोआराम सगळं असतं.उणीव असते ती प्रेमाची, मायेची. हीच उणीव कुणीतरी भरून काढावी असही बऱ्याच स्त्रियांना वाटतं.कुणी मनापासून आवडत असेल तर ते प्रेम त्या सहजासहजी स्विकारायला तयार होतात.
खरं तर वयाने मोठ्या असून प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक स्त्रिची कारणं ही वेगवेगळी असू शकतात.प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणणाऱ्या स्त्रिया ठरवून सुद्धा उशिराने प्रेमाच्या नौकेतून प्रवास करायला तयार होत असाव्यात.
आयुष्याच्या एका टप्प्यावर जोडीदाराची आवश्यकता भासते.आपलाही कुणीतरी जोडीदार असावा,उरलेलं आयुष्य एकमेकांच्या साथीने जगावं , एकत्र फिरावं,असं एखाद्या स्त्रिला वाटणं अगदी साहजिक आहे.
तर…प्रेम हे कायमच हवंहवसं वाटणारं आहे. त्यामुळे प्रेम ही भावना केव्हाही जन्म घेऊ शकते यात शंका नाही.
आणि हो, तुम्हाला जर काही कारणं माहीत असतील तर शेअर करायला विसरू नका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Yes you are right
अगदी बरोबर
Atishay sunder …
It’s overall good and yet some of the statements are not consistent with overall view. For example, प्रेमाला बंधन नसते. प्रेमाला बंधने असतात. नैतिकता, अश्लीलता आणि हिंसा….ही प्रेमाची पवित्र धारणा आहे. प्रेम ही व्यक्ती सापेक्ष नसतं. कारण प्रेम ही अभिव्यक्ती आहे. त्यामुळे प्रेम कोणाचेही आणि कोणावरही असू शकते. स्त्री पुरुष प्रेम ही जितकी शारीरिक असोशी आहे; तितकेच प्रेम हे साधेपण आहे, सहज आहे आणि अव्यक्त आहे. प्रेम सृजन पावणे, ही मानसिक संवेदना आहे. तिचे शारीरिक संबंधांमध्ये परिवर्तन होणे, ही मानवी संस्कृती आहे. विवाह हे प्रेमाला बंधन नाही, पण प्रेमाला नैतिकतेचे बंध निश्चित आहेत.
अगदी बरोबर तिच्या पूर्ण करून घेते
Khupach chaan 🙏☺👍
Khupch chan
Verry good👍