वारंवार mood off होणं ही सवय मानसिक आरोग्यासाठी फार घातक असते.
हर्षदा पिंपळे
“आज राधाचा मूड काही ठिक दिसत नाही. काय गं काय झालं तोंड पाडून बसायला…?काही बिनसलय का…?कुणी काही बोललय का तुला…?” असा संवाद आपल्यासोबत कित्येकदा घडतो.आपलाही मूड असाच स्वींग होतो.अनेकदा मूड स्विंग असेल तर आपण “आज माझा मूड नाहीये, मला जेवायला नकोय.”, “माझा मूड नाहीये तर मी नाही येणार कुठे”, “एकदा सांगितलं नं मी नाहीये माझा मूड,नकोय मला काही”
असं काहीसं बोलून जातो.पण रोजच जर असे मूड स्विंग होत असतील तर…?आणि इतकच नाही तर एखादा व्यक्ती मूडी असतो.आणि अशा मूडी व्यक्तीला सहसा लोकं टाळण्याचा प्रयत्न करतात.कारण मूडी लोकांसोबत फारसं कुणाच जमत नाही.त्यांच्याशी लवकर कुणी पटवून घेत नाही. त्यामुळे मूडी स्वभाव असेल तर जरा अवघडच…!
तर मूड ऑफ होणे म्हणजे नेमकं काय…?तर थोडक्यात सांगायच झालं तर आपण आनंदी असताना थेट निराशेच्या स्थितीत जातो ,आपल्याला त्यावेळी काही करावसं वाटत नाही. कारण आपला मूड ऑफ झालेला असतो.happy mode वरून आपण sad mode वर गेलेलो असतो.आणि अगदी कोणत्याही कारणावरून मूड ऑफ होतो.तर कधी कधी कारण नसतानाही मूड ऑफ होतो.
आता मूड ऑफ होण्यामागे काही कारणं असतात ती समजून घ्यायला हवी. तर कोणती कारणं असतात….? चिडचिड होणे, एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडणे,एखाद्यासोबत भांडण होणे,एखाद्याचं बोलणं मनाला लागणे , हार्मोन्समधील बदल,सकारात्मक ऊर्जेचा अभाव,सतत दमछाक होणे वा थकल्यासारखे वाटणे,झोपेची कमतरता,काही पदार्थांचे, औषधांचे दुष्परिणाम,मेंदूतील रासायनिक असंतुलन यांसारखी कितीतरी कारणं मूड स्विंगसाठी कारणीभूत ठरतात.
तर वारंवार असा मूड ऑफ होत असेल तर ते आपल्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. वारंवार मूड ऑफ होणं हे मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते. कारण मूड स्विंग होणं जरी नॉर्मल असलं तरीही वारंवार मूड ऑफ होणं काही नॉर्मल नाही. वारंवार मूडमध्ये होणारे नकारात्मक बदल हे आपल्या आरोग्यासाठी घातकच ठरू शकतात. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या मूड ऑफवर आपणच सोल्युशन शोधणं आवश्यक आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कारण मूड स्विंगचे आपल्या आयुष्यावर काही विपरीत परिणाम होतात. वारंवार मूड स्विंग होणाऱ्या लोकांना सामान्य जीवन जगण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.
*मूड स्विंगमुळे वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळे नकारात्मक बदल व्हायला लागतात.
*आपल्या मूड स्विंग्समुळे आजुबाजूच वातावरणसुद्धा गढूळ व्हायला लागतं.नकारात्मक व्हायला लागतं.
*स्वतःबरोबर दुसऱ्याच लक्ष विचलीत होतं.
*आपल्या कामावर याचा मोठा परिणाम दिसून येतो.
*कामात लक्ष लागत नाही, खाण्या-पिण्यात लक्ष लागत नाही.
*एकतर खूप कमी खाल्लं जातं नाहीतर अधाशासारखं खूप खाल्लं जातं.
*आदळ आपट करण्याची समस्या वाढू लागते.
*दुसऱ्यांवर विनाकारण चिडणे,दुसऱ्याला दोष देणे ,स्वतःला दोष देणे.
यांसारख्या काही गोष्टी मूड स्विंगमुळे आपल्या आयुष्यात घडतात. परंतु अशा गोष्टींमुळे आपलं मानसिक संतुलन बिघडून शारीरिक संतुलनही बिघडायला लागतं.मन सतत औदासिन्यात रमायला लागतं.शरिरावर, मनावर परिणाम होतो.माणूस व्यसनाच्या आहारी जायला लागतो.मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते.कोणत्याही गोष्टीत निर्णय घेणं अवघड होत जातं.वारंवार मूड स्विंगमुळे जीवनावर विपरीत परिणाम होऊन मनोविकाराच प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
म्हणून वारंवार मूड ऑफ होणं घातक ठरू शकतं.तर अशा या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपण वारंवार होणाऱ्या मूड स्विंग्सवर मात करू शकतो.
*व्यायाम-मेडिटेशन करणे.
*म्युझिक थेरपी ट्राय करणे.
*पोषक आहार घेणे.
*आवश्यक तितकं पाण्याचे सेवन करणे.
*अरोमा थेरपीझ् ट्राय करणे.
*नियमित आवश्यक तितकी झोप घेणे.
*लवकर उठणे-लवकर झोपणे.
*नकारात्मक वातावरणात जाणे टाळणे.
*स्वतःची काळजी घेणे.
*खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळणे.
*गवतावर मोकळ्या हवेत चालायला जाणे.
*छान पुस्तकं वाचणे.
अशा काही गोष्टी केल्यास आपण मूड स्विंगवर मात करू शकतो.मूड स्विंगचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊ नये यासाठी आपण काळजी अशी काळजी घेऊ शकतो.
सो..काळजी घ्या. शक्यतो वारंवार मूड स्विंग होऊ देऊ नका.मस्त पोषक आहार घ्या.योगा करा..आनंदी रहा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
