वारंवार दुःखांना टाळत राहिल्याने त्यांची तीव्रता वाढत राहते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
दुःख कोणाला चुकले नाही. सर्वांना ते जाणवतेच. फरक इतकाच की प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे याच दुःख कमी, त्याचं जास्त अस आपण म्हणू शकत नाही. माणसाचं subjective unit of distress हे नेहमी वेगळं असत. त्यानुसार त्याला समजून घ्यावं लागत. पण परत हाच प्रश्न निर्माण होतो की दुसरा आपल्याला किती मर्यादेपर्यंत मदत करणार दुःखातून बाहेर पडण्यासाठी? कितीही मोठा मानसोपचार तज्ञ असुदे किंवा आपले जवळचे लोक कितीही आपल्याला दुःखातून सावरायला मदत करुदेत, आपल्याला स्वतःहून काहीतरी प्रयत्न करावे लागतात.
लोक पण तेव्हाच मदत करणार जेव्हा आपली त्यातून बाहेर पडायची तयारी असेल. आपलीच तयारी नसेल, आपणच जर दुःखाचा सामना करायला तयार नसू, बाहेरून आपल्याला कितीही मदत मिळाली तरी त्याचा उपयोग नाही होत.
आपण काय करतो तर आपल्या आयुष्यात जी काही दुःख येतात, त्रास होतो त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यात हे काही झालच नाही अशी खोटी जाणीव स्वतःला करून देत राहतो. Denail मध्ये जातो. पण अस केल्याने काय होत? आपली दुःख अजून वाढतात. कारण जे झालं आहे ते आहे. आपण कितीही टाळल तरी ते खोटं होत नाही.
मनात अस सर्व दाबून टाकल्यावर त्याचे परिणाम नंतर दिसू लागतात. आपल्या वागण्यातून, आपल्या विचारातून. नंतरच्या आयुष्यात निर्माण होणारी भीती, एखादी गोष्ट टाळण्याकडे असलेला कल. हे सर्व आधी दाबून टाकलेल्या दुःखाचा परिणाम असतात.
बरीच जण लहानपणी वेगवेगळ्या त्रासातून गेलेले असतात. मोठ झाल्यावरही रेलेशनशिप break होणे असेल यासारख्या गोष्टीतुनही जातात. मनात त्याच दुःख असत. पण वर मात्र नॉर्मल दाखवलं जातं. कशी/कसा मी ठीक आहे अस स्वतः ला भासवल जात. कारण ते दुःख पचवायची ताकत नसते. त्याचा सामना करायची ताकत नसते. त्यामुळे एखादी घटना घडल्यावर जितका व्ह्यायचा तेवढा त्रास होणार तो पण स्वीकारला जात नाही. हे दुःख स्वीकारता न आल्याने, त्याची वास्तविकता नाकारल्याने ते तसच मनात कुठेतरी साठून राहत आणि नंतर वेगळ्या आणि अजून वाईट पद्धतीने बाहेर पडत.
अनेक जणांना नवीन नाती तयार करायला भीती वाटते. कारण विचारल तर नीट सांगता येत नाही. याची कारण, मूळ आधी कुठेतरी असतात. जी दाबून टाकलेली असतात. त्यांचा नीट सामना केलेला नसतो. त्यामुळे जेव्हा कधी त्यासारखे प्रसंग आयुष्यात पुन्हा यायला लागतात, जरी त्रास देणारे नसले तरी त्रासदायक वाटू लागतात. कारण त्यांचा संबंध आधीच्या गोष्टींशी जोडला गेलेला असतो.
एक लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर काही लिहीत असताना शब्द चुकला, नीट नाही लिहिला तर त्याकडे दुर्लक्ष करून परत परत गिरवल तर ती नीट होईल का? तो अजून वाईट दिसणार. इतका की तो परत पूर्ण काढताना कागद फाटतो. आपल्याला अस आपल्या आयुष्यासोबत करायचं आहे का? ठीक आहे दुःख रुपी अक्षर आयुष्यात येऊ शकतात.
पण ती त्याचवेळी नीट केली तर आयुष्य नीट , सुंदर होणार ना! किती दिवस ते दुःख टाळून त्यावर परत परत नवीन अनुभव गिरवायचा प्रयत्न करणार. आपल्या आयुष्याचा कागद आपल्या फाडायाचा नाही तर स्वच्छ, सुंदर करायचा आहे. त्यासाठी जिथे काही त्रास होत, दुःख होत लगेच तिथेच ते दुरुस्त करा, आपल्याकडे असलेली साधन कमी होत आहेत अस वाटेल, थकवा येईल. मग काय झालं? बाकीची लोक आहेत ना! ती करणार मदत. फक्त आपण सांगितलं पाहिजे की मला माझ्या आयुष्याचं पान छान करायचं आहे.
न मागता आपल्याला मदत मिळेल. फक्त सुरुवात मात्र आपणच करायची आहे. दुःख टाळून नाही तर त्याचा सामना करून!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
