वाईट दिवस आपण अडवू शकत नाही, पण त्याचा आपल्याला होणारा मनस्ताप नक्कीच थांबवू शकतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
आयुष्य जगत असताना आपण वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देत असतो. अनेक आव्हान आपल्यासमोर असतात. अगदी चांगलं चांगलं म्हणणाऱ्या लोकांवरही वाईट वेळ येतेच. आणि ती आपण थांबवू ही शकत नाही. कारण आपलं कोणावरही नियत्रंण नसत. वरकरणी आपल्याला वाटत की आपण सर्व गोष्टी कंट्रोल करू शकतो, आपल्याला वाटेल तश्या वळवू शकतो. शेवटपर्यंत व्यक्ती खटपट करते ती कश्यासाठी? याच साठी की आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी व्हाव्यात, सर्व आपल्या हातात असावं. पण अस खरच होत का?
अगदी लहान ते खूप मोठ्या गोष्टीतून निसर्ग आपल्याला दाखवून देत असतो की आपला कोणावर कंट्रोल नाही. हीच गोष्ट आपल्याला मान्य होत नाही. आपल्या मनासारखं सर्व व्हावं आणि तेच नेमके होत नाही तेव्हा जास्त त्रास होतो. म्हणूनच हा अट्टाहास आधी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. ही डिमांड करण कमी केलं पाहिजे. तरच आपण आलेल्या समस्येतून मार्ग काढू शकतो.
आता जर आपला कश्यावर कंट्रोलच नसेल तर आपण ती समस्या किंवा ती परिस्थिती हाताळण्यााठी आपण काय करू शकतो अस वाटू शकत. तर याचही उत्तर आहे. ते म्हणजे प्रभाव टाकणं. आपण जरी परिस्थिती वर किंवा कोणत्याही गोष्टीवर नियत्रंण मिळवू शकत नसलो तरी त्यावर प्रभाव टाकू शकतो. म्हणजेच काय तर ती समस्या सोडवावी कशी, त्यासाठी काय करता येईल यावर विचार करून वेगवेगळे मार्ग काढू शकतो. जेणेकरून सर्व पूर्वीसारखं नीट होईल. यालाच प्रभाव टाकणं अस म्हणतात.
जेव्हा आपल्याला हे समजत की आपण जे होणारे त्याला पूर्ण थांबवू शकत नाही तेव्हा हेही समजत की चांगल्या गोष्टी प्रमाणे वाईट गोष्टी ही घडतात. जे ठरलेले आहे. त्यामुळे आपण जे काही वाईट होईल त्याला अडवू शकत नाही. अगदी जगातील श्रीमंत व्यक्तीही आपली जवळची व्यक्ती गमावतो. अनेकदा सर्व असूनही आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवता येत नाही. याहून त्रासदायक काय असू शकत? पण जे व्हायचं ते होणार आहे. ते आपण अडवू शकत नाही. पण त्याने आपल्याला खूप मनस्ताप होणार नाही इतकं तरी आपण नक्की करू शकतो.
आपल्या हातात बाहेरच्या गोष्टी नसल्या तरी आपले विचार आपलं वागणं आपल्या हातात आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे वाईट दिवस येत असतात. ते आपण थांबवू शकत नाही. पण त्याचा आपल्याला किती त्रास करून घायचा हे आपल्या हातात आहे.
यावेळी आपल्या आजूबाजूला जे काय चांगलं आहे ते पण पाहण्याची आवश्यकता असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पण एखादी व्यक्ती गेल्यावर शोक कालावधी १२दिवसांचा दिला आहे. त्यामुळे दुःखी व्ह्यायच नाहीच अस नाही. पण त्यात पूर्ण अडकून राहायचं नाहीये.
जेव्हा आपण त्यात अडकून जातो, स्वतः ला मनस्ताप करून घेतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्याची आपली क्षमता कमी होते. Problem solving capacity कमी होते.
वाईट दिवस पण संपू शकतात हे स्वतःला सांगून आपण त्यातून कस बाहेर पडता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मनस्ताप करून आपण आपली मानसिक तसेच शारीरिक क्षमता पण कमी करतो. याचा आपल्या झोपेवर, खाण्यावर एकंदरीत आरोग्यावर परिणाम होत असतो ज्यातून अजून समस्या निर्माण होतात. म्हणून जरी आपण वाईट दिवस टाळू शकत नसलो तरी ते आले तरी त्याचा सामना करण्याची ताकत आपल्यात पाहिजे. तसे आपले विचार पाहिजेत. जास्तीत जास्त वाईट काय असू शकत? त्या तुलनेत हा त्रास किती आहे असा विचार करता आला पाहिजे.
शेवटी आपल्या हातात काही नसलं तरी विचारांचं स्वातंत्र्य अबाधित राहत. ते आपल्यापासून कोणी नाही हिरावून घेऊ शकत. त्यामुळे आपण कोणत्या परिस्थितीत कसा विचार करायचा हे आपल्या हातात आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान मी आता वाईट अवस्था मध्ये आहे माझी मुलगी माझा पासून दूर आहे
Very good