उपयोगी नसलेल्या आठवणी आणि माणसांचा दिशाहीन प्रवास!
सोनाली जे.
ट्रिंग ट्रिंग ! अग ईशा , किती वेळ ग फोन उचलायला ? आधी पण प्रयत्न केला. घरीच आहेस तर काय झाले? ऐकू आले नाही का ? ईशा अग बोल ना !
कोणत्या तरी हरवलेल्या भावना , आठवणीतून बाहेर पडून एकदम वास्तवात यावे तसे झाले ईशा चे. अग सायली काही नाही ग आज आवरा आवरी काढली आहे. आता २५ वर्षात कधी कॉलेज ची वह्या पुस्तके , नोट्स वाचल्या गेल्या नाहीत. विचार केला आता सगळे काढून देवून टाकावे तेवढीच मुलांच्या पुस्तके वह्या याकरिता जागा होईल तिथे. आणि ती आवराआवरी करत असताना , आपल्या मेहनती ने काढलेल्या , तेव्हाच्या सगळ्यात उपयोगी नोट्स..कालांतराने निरुपयोगी ठरल्या.
आज इतके वर्षांनी जाणवत होते की आता याचा काय उपयोग , उगीच या पुस्तके , वाह्यानी जागा मात्र व्यापली आहे. बरं आता पोर्शन ही बदलला आहे. याचा उपयोग कॉलेज मध्ये देवून ही नाही होणार.
असेच आपल्या मनाचे कोपरे साफ केले तर ? हा विचार करत होते.
मोबाईल मध्ये व्हॉटसॲप वरून भरभरून फोटो , माहिती ,येत असते. कधी साजरे केलेले क्षण. , दिवस यांचे फोटो आणि त्याविषयीच्या आठवणी येत असतात. आपण साठवून ठेवत असतो.
पण अशी एक वेळ येते की आपल्या फोन ची memory कमी होवू लागते. संपू लागते. मग नाईलाजाने जुन्या गोष्टी,निरुपयोगी गोष्टी , फोटो , कॉम्प्युटर मधल्या जुन्या निरुपयोगी फाईल्स काढून टाकाव्या लागतात. कधी एखादा good morning मेसेज आवडतो , एखादे quote तेव्हा त्या परिस्थितीत आवडते पण आज त्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणून delete करतो आपण.
जेव्हा परत एकदा भरपूर स्पेस असते तेव्हा नव नवीन काम करता येते त्याच्या फाईल्स save करता येतात. तसे मोबाईल मध्ये ही नवीन गोष्टी , आठवणी , फोटो साठविण्यासाठी जागा राहते. आणि परत एकदा मन ही उत्साहाने नव्या गोष्टी करण्यासाठीं आतुर होते.
तसेच व्यक्तींच्या बाबत ही आहे. काही व्यक्ती आयुष्याच्या त्या त्या टप्प्यात मागे पडत जातात. एकेकाळी अतिशय महत्वाची व्यक्ती असते तिला सगळे सांगत असतो, तिची मदत , सल्ला घेत असतो. ती काळानुरूप मागे पडते. आपण पुढे जात राहतो.
काही महत्वाच्या व्यक्ती , आठवणी असतात. काही नको असलेल्या कटू आठवणी , नावडत्या व्यक्ती, त्रासदायक गोष्टीं ही असतात. काही गोष्टींनी त्रास झालेलं त्या सगळ्या let go करत असतो. पण तरीही मनाच्या कप्प्यात त्या असतात.
जेव्हा कधी त्या गोष्टी समोर येतात, व्यक्ती समोर येतात तेव्हा त्या memories समोर येतात. पण त्या काही गोष्टी past experience मग चांगले वाईट हे आपल्या मनात साठले असतात. परत त्या समोर आल्या की आपण तेच past experience मनात आणून तसेच या क्षणी त्याकडे बघतो. पण काही वेळेस हे चुकीचे ही असू शकते कारण काय तर आपण तेव्हा जसे केले , तेव्हा जसा आनंद मिळविला , किंवा त्रास झाला याच गोष्टीत अडकून पडून त्याचा परिणाम वर्तमान काळात घडवून आणतो. नावडती व्यक्ती समोर आली तर नकारात्मक विचार , घटना समोर येवून आपली पहिली reaction अशी होते की अरे देवा हा / ही कशाला आली समोर.
याउलट जे पूर्वीचे , past मधले खूप छान क्षण असतात तेव्हाचे past मधले ते तसेच परत मिळावे ही अपेक्षा वाढते आणि तसे झाले नाही की अपेक्षाभंग होतो.
आणि खरेच आहे की पहिली गोष्ट करताना , शिकताना , व्यक्ती सोबत भेटताना , पहिले प्रेम असेल, कडक उन्हाच्या तडाख्या नंतर पहिला पावूस खूप आवडून जातो. पण तोच रोजचा झाला की त्याचा कंटाळा येतो. नको नको होते. मग उगीच मन त्या नकारात्मक गोष्टीत अडकते तेव्हा किती मजा आली होती आज का नाही येत. किंवा प्रेमातून प्रेमभंग असेल, परीक्षेत आलेले अपयश असेल या नकारात्मक , निरुपयोगी गोष्टी present मध्ये त्रास देतात. त्या व्यक्तीविषयी नकारात्मक भावना बनवत जातात जिच्यावर कधी आपणच प्रेम केले असते. तिच्यावर राग , चिडचिड होते. त्या आठवणी ही त्रास देतात. दोष कोणाचा नसतो . बरेचवेळा परिस्थिती चा असतो.
खरेच त्या क्षणी जगलेले क्षण काही वेळेस वर्तमानात आलेल्या निराशे मधून बाहेर पडून परत उत्साहित करण्यास , नात्यात तेढ निर्माण झाली असेल तर जुन्या गोष्टी आठवून , तेव्हा ते क्षण किती सुंदर होते . कसे एकत्र अनेक गोष्टी केल्या होत्या, एखादी सुंदर गिफ्ट अजून ही सोबत आहे. त्या भावना खूप सुखद असतात. जुन्या आठवणी , व्यक्ती , गोष्टी याची जोड देवून भूतकाळात कधी काही बिघडत गेले असेल तर वर्तमानकाळात ठीक करण्यासाठी खूप मोलाचा वाटा या आठवणीतल्या गोष्टी करतात. व्यक्ती ही करतात.
मात्र उपयोगी नसलेल्या आठवणी आणि माणसांचा आपल्या आयुष्यात दिशाहीन प्रवास सुरू होतो. उगीचच जपून ठेवायचे कधी काळी उपयोगी येईल . व्यक्तीला नको तोडायला , नको टाकायला वस्तू असे म्हणून ठेवले तर निरुपयोगी वस्तू आणि व्यक्तींनी जागा व्यापून जाईल. अगदीं जसे कचरा साठवून साठवून ठेवायचे मनातले पसारे आठवत ,व साठवत ठेवायचे. मनाच्या कप्प्यात सगळेच अस्ताव्यस्त होते. कधी कधी सगळे साफ करा. त्यातले जीर्ण , नको असलेल्या आठवणी , दुःखी गोष्टी काढून टाका.
ज्या मैत्रिणी सोबत बोलत होते जीचा फोन आला होता. सायली .अगदी लहान वयात लग्न झाले , दोन सोन्यासारख्या मुली , आणि तिचा नवरा ३५ व्यां वर्षीच अचानक काही निमित्त झाले आणि वारला. दोघी मुलींची संपूर्ण जबाबदारी हिच्या एकटी वर येवून पडली. सासरचा असा आधार फक्त सासू . पण ती ही वयस्क , माहेरचा आधार काहीच नाही.
जिद्दीने पुढे जात राहिली. काल बोलता बोलता म्हणाली की मोठ्या मुलीने परवा तिच्या बाबांचा विषय काढला. तिला म्हणले तू जा घरात बस मी आले असे म्हणून अर्धा तास बाहेर फिरून शांत होवून आली.
कारण तिने अगदी ठरवून तिच्या नवऱ्याच्या आठवणी , अगदी त्याच्या मृत्यू ची तारीख , वार , त्याचे गुण , दोष , त्याच असे अचानक सोडून जाणं. ही धक्कादायक गोष्ट पचविली . आणि रोजचे व्यवहार , मुलींना मोठे करणे हे एकच उद्दीष्ट ठेवून असे का झाले, कसे झाले याचे कोणतेही विचार ,व्यक्ती , आठवण सोडून देऊन वास्तवात जगणे स्वीकारले. आणि म्हणून ती परत त्या भूतकाळात जात ही नाही. कारण मग खूप मानसिक त्रास , आठवणी जाग्या होवून वास्तवात जगणे कठीण होते.
त्यापेक्षा त्या व्यक्ती आणि तिच्या आठवणी ही नकोत ..कारण मग निराशा येते, नकारात्मक विचार येवू लागतात. मूड बिघडू लागतो. मुलींवर राग निघतो. आपण मुलींना इच्छा असून ही यापेक्षा चांगल्या गोष्टी देवू शकत नाही या नकारात्मक विचारांचा त्रास होतो, आपण कमकुवत आहोत याची जाणीव होते.
एखाद्या व्यक्तीने खूप त्रास दिला असतो. आणि एका व्यक्ती मूळ अनेकांना त्रास होत असतो. कधी स्वार्थीपणा , वाकडे बोलून , वाईट वागून, तर कधी फसवून .अशा व्यक्तींना आठवून , त्यांचे चुकीचे वर्तन आठवून अजून त्रास होत असतो त्यापेक्षा त्यांना कायमचे विसरून पुढे जात राहणे ..आणि ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांच्या सोबत आनंदी रहा. जे आताचे क्षण आहेत ते भरभरून जगा. आयुष्य सुंदर आहे. वर्तमानात जगा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

