Skip to content

रात्री मागील काही गोष्टींचा विचार करता-करता अचानक मला रडू येतंय…

रात्री मागील काही गोष्टींचा विचार करता-करता अचानक मला रडू येतंय…


मयुरी महेंन्द्र महाजन


कितीतरी गोष्टी घटना घडून गेलेल्या असतात, परंतु त्याचे पडसाद मात्र उभ्या आयुष्यभर राहतात, जरी ते दिसत नसले तरी त्याची एक किनार नेहमी असते ,आपलं मानसशास्त्र सांगते की आपला मेंदू झोपलेल्या अवस्थेत सुद्धा अॅक्टिव असतो, तो अबोध अवस्थेतल्या गोष्टी बोधावस्थेत रिपीट करत असतो,

झोपलेल्या अवस्थेत अचानक दचकून उठणे, किंवा चित्र विचित्र स्वप्न पडणे, किंवा जुन्या काही गोष्टी आठवून झोप न लागणे, या सर्वात कधी कधी रात्री मागील काही गोष्टींचा विचार करता करता त्याने रडू येते …तसं तर आयुष्यात असण्याला महत्त्व आहेचं, पण त्यासोबत रडून मोकळे होण्यालाही खूप महत्त्व आहे, रडावस वाटत असेल ,तर नक्की रडून घ्यावं,

कुणाच्या समोर मोकळं रडता येत नसेलं, तर आपला एकांत गाठावा आणि त्यासोबत रडून घ्यावे, परंतु ते फक्त त्या क्षणांपुरतेचं, नंतर तीचं आसवे पुसून एका नव्या ध्यासाला,एका नव्या विचाराने सुरुवात करावी, उशीर कधीच होत नसतो, त्यावेळेस आपल्याला आपला पाँईट गवसला ,तिथूनच सुरुवात करावी.

विशालने आपल्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि प्रेमाची व्यक्ती गमावली, आणि परिस्थितीने हिरावून घेतलेल्या आनंदाला विशाल विशाल मुकला, त्याचे विशालला प्रचंड दुःख आहे, परंतु त्यासोबत तो स्वतःला सावरून आपल्या छोट्या बाळाचे पालनपोषण करतोय, त्यात आनंद घेतोय,

परंतु यापेक्षा जास्त दुःख विशालला आपल्या बाळाची आई नसल्याने होते, कारण विशाल देवाला म्हणतो, देवा माझा नाही, परंतु त्या लहान बाळाचा तरी तू विचार करायला हवा होतास, तू ईतका निष्ठुर आणि कठोर कसा होऊ शकतो????? असा प्रश्न विशाल देवाला विचारतो.

सावर स्वतःला असं सांगण, जितके सोपे तितकेच त्या परिस्थितीतून जाणे अवघड आहे, विशाल मात्र आईची आणि बापाची भूमिका पार पाडण्यात कुठेच कमी पडू देत नव्हता, पण माणूस म्हणून तोसुद्धा भावनांनी भरलेला आहे ,प्रेमाच्या आठवणी कडू असल्या, किंवा गोड असल्या तरी कोणीही ते विसरणे शक्य नाही,

रात्री आपल्या बाळाला कुशीत घेऊन झोपताना विशालला आपल्या भूतकाळाचा विचार येतो ,आणि अशा कितीतरी रात्री विशालने मागील काही गोष्टींचा विचार करता करता रडून काढलेल्या आहेत,

पण दिसणारे वास्तव हे कितीही भयानक असले तरी ,ते स्वीकारावेच लागते,हे मात्र जीवनाचा खूप मोठा भाग आहे, विशालला गेली काही दिवस खूप जड गेली,स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली, स्वतःला सावरण्यासाठी काही वेळ जाऊ दिला, आणि ज्यावेळे तून विशालने स्वतःला सावरले, त्या वेळेतून विशालने स्वतःला सावरले,त्यातून आपल्या आयुष्याला हळूहळू आकार देऊ लागला.

आपयुष्य हे चालत होते, चालत आहे, आणि तसेच पुढे चालत राहणारं, मग त्यात आपण कधी असू किंवा नसू, नाही ती व्यक्ती विसरणे शक्य आहे, नाही त्या व्यक्तीच्या आठवणी विसरणे शक्य आहे, पण जोडलेल्या तारा तुटण्याचे दुःख मात्र प्रत्येक वेळी तसेच राहीलं, विशाल हे काल्पनिक पात्र आहे,

परंतु जगण्याचा संदेश मात्र त्यातला खूप वास्तववादी आहे, कारण की घटनांचे प्रकार वेगळे असू शकतात ,गोष्टी घटना वेगळी असू शकते, निभावणारी पात्र वेगळी असली, तरी माणूस म्हणून व्यक्तीच्या भावनांना लागलेली ठेच मात्र काही अंशी सारखीचं असते, म्हणून लागलेली ठेचं जेव्हा शब्दाने सांगता येत नाही, तेव्हा डोळ्यातून वाहणारे अश्रूचं, त्याची वेदना सांगून जातात,

बघा जर कधी डोळ्यातून पाणी आलेचं, तर ते उगीचचं येत नाही, ज्या गोष्टीचे बंध मनाच्या खोलवर दडलेले असतात, ज्याच्याशी मनाचा थेट संबंध असतो, ज्याविषयी आपल्या मनात ओढ असते, त्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी तरळते , उगीचच कोणी कोणासाठी रडत नाही, जेव्हा बंध मनाच्या कोपर्‍याशी असतात, तेव्हा त्याचे दुःख मोठे असते,

जर मागच्या गोष्टीचे दुःख घेऊन आपल्याला रडू येत असेल, तर आपण आपल्या पुढच्या संकल्पना वाढवायला हव्यात, जेणेकरून आपल्या गेलेला काळाचे दुःख न होता येणार्‍या दिवसाचे आपण मोकळ्या मनाने स्वागत करू शकतो…..!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!