Skip to content

आपल्या लोकांना आपणच समजून घ्यायचे असते.

” जगा आणि जगू द्या “


हेमा यादव – कदम


आयुष्यात वय आणि अनुभवानुसार प्रत्येक व्यक्तीच्या गरजा बदलत जातात ., हे सर्वाना माहित असते पण हे माहित असताना हि आपण कोणीहि आपल्या आचरणात कोणताही बदल करत नाही .. यात चूक कोणाचीच नाही .. मला असे वाटते कि , हा सर्व खेळ आहे मानवी भावना आणि मन यांचा …..

आपल्याला कळत असते कि, सध्या आपली गरज काय आहे ? तरी आपण आपल्याला हवे ते बऱ्याचदा करू देत नाही.. आपल्या विचारांवर आपल्या भावनेचा पगडा इतका मोठा असतो कि, आपली विचारशक्ती त्यापुढे निष्क्रिय वाटू लागते. बरं हे वागणे स्वतःपुरते मर्यादित असेल तर ठीक पण आपण दुसऱ्यांचे आयुष्य हि नियंत्रणात आणायचे प्रयत्न करत असतो आणि समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही कि अगदी आभाळ कोसळल्या सारखी आपली मनस्थिती होऊन जाते ..

नाते कोणतेही असो पण प्रत्येक नात्यात असणाऱ्या व्यक्तीला हि स्वतंत्र आयुष्य आहे , आयुष्याकडे त्याचा पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे त्याला / तिला त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार असतो , काही स्वप्न प्रत्येकाची च असतात .. पण आपल्याकडे इतरांचा कोण विचार करत नाही. “समोरच्याने माझ्याशी कसे वागावे” हे मला खूप चांगले माहित आहे. पण ” मी समोरच्या सोबत कसे वागायला पाहिजे ” हे आपल्याला माहित नसते .. वयाच्या ५ व्या वर्षी ज्या गोष्टी आपल्याला आवडत होत्या त्याच गोष्टी वयाच्या ५० व्या वर्षी आवडतील का ?

लहानपणी आपल्यासमोर येणाऱ्या समस्या वेगळ्या असतात, वयात आल्यावर वेगळ्या , वय निघून गेल्यावर वेगळ्या … गरजा या वयानुसार बदलत जातात … त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर हक्क दाखवत असतो. त्याने कसे वागावे हे आपण ठरवत असतो. तेव्हा जरा विचार करा त्या व्यक्तीची मनस्थिती काय होत असेल.

आपल्याकडे आजही बरेच लोक घरी खोटे बोलून पार्टी ला जातात , ड्रिंक करतात , ट्रिप ला जातात … पण हे सर्व घरात खोटे बोलून … का येते हि वेळ ? आपल्याच घरात आपल्याला स्वातंत्र का नसते ? लोकांना आपल्याशी खोटे बोलायची वेळ का येते.. प्रत्येक खोटे बोलणारी व्यक्ती वाईट नसते पण आपल्या समजूतदारीवर त्याला / तिला शंका असते . आपल्या प्रतिक्रियेची त्यांना भीती वाटते आणि मग अगदी सहजच खोटे बोलण्याला सुरवात होते.

आपणच आपल्या लोकांना खोटे बोलायला भाग पडतो .. अति काळजी किंवा अति अविश्वास किंवा अति हक्क यामुळे … आपल्या लोकांची काळजी जरूर घ्या .. घ्यायलाच पाहिजे पण त्याची पद्धत थोडी बदला .. समोरच्या व्यक्तीला पर्याय द्या कि , जर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करणार असाल तर पुढे तुम्हाला काय काय गोष्टी सहन कराव्या लागतील.. त्यांना जाणीव करून द्या आणि त्यांना स्वतःला निर्णय घेऊ द्या ..

तुमचे निर्णय कोणावर लादू नका .. आणि कोणाचे निर्णय स्वतःवर लादून घेऊ नका , कारण प्रत्येक अपयशी व्यक्ती नेहमी बोलते कि, मी समोरच्याचे ऐकून निर्णय घेतला आणि अपयशी झालो / झाले . त्यामुळे कोणाच्या अपयशाचे कारण तुम्ही बनू नका. आणि स्वतःच्या चुकीमुळे आलेल्या अपयशाचे खापर हि कोणाच्या डोक्यावर टाकू नका कारण आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हि आपल्या मुळे घडत असते आपल्या यश आणि अपयशाला इतर कोणी नाही आपण स्वतः जबाबदार असतो . हे लक्षात घ्या .

पुढचा जन्म आहे कि नाही माहित नाही , या कोरोना काळात उद्याचा दिवस पाहू कि नाही हा प्रश्न आहे .. त्यामुळे मिळालेल्या या सुंदर आयुष्याचा भरभरून आनंद घ्या .. ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतील त्या करून घ्या थोडक्यात सांगायचे म्हणजे ” जगा आणि जगू द्या ”

वय आणि काळानुसार गरजा बदलत जातात हे समजून घ्या .. प्रेम करा पण अति हक्क नका दाखवू , काळजी करा पण समोरील व्यक्तीच्या क्षमतेवर अविश्वास नका दाखवू , ती व्यक्ती धडपडली तर त्याला / तिला सावरा हात द्या पण चुका काढून अपमान नका करू .. कारण वेळ प्रत्येकाला यश आणि अपयश दाखवत असते .. आपण कोणीही ग्रेट नाहीये आपण हि कधीतरी चुकतो हे लक्षात ठेवा …

आपल्या लोकांना आपणच समजून घ्यायचे असते ., प्रत्येकाचे स्वातंत्र जपा आणि स्वतःचे हि ,,,,,,,,,,,

धन्यवाद!

 



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!