तुम्ही परफेक्ट असाल तरच एखाद्याला जज करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अग आज कलाभवन ला चित्र प्रदर्शन होत. नलिनीच्या मुलीची चित्र देखील होती प्रदर्शनामध्ये. खूप छान होती. तू पाहिलीस का?” रेखा तिच्या मैत्रिणीला म्हणजेच ताराला विचारत होती. रेखा, तारा आणि नलिनी या तिघी मैत्रिणी. त्यामुळे एकमेकांच्या घरी कार्यक्रम असेल किंवा त्यांच्या मुलांचे काही इव्हेंट वैगरे असले तर त्या आवर्जून जात.
रेखाचा स्वभाव सर्वांचं भरभरून कौतुक करण्याचा होता. ती त्या माणसाने एखादी गोष्टी किती चांगली केली, किती परफेक्ट केली याहून त्याच्या कष्टाला महत्त्व देत असे. तिच्या लेखी ते कष्ट महत्त्वाचे होते. बाकी चुका, कमी जास्त होतच राहत. आपल्या प्रोत्साहन देण्याने, कौतुक करण्याने एखाद्याला काम करण्याचा हुरूप येत असेल, उत्साह येत असेल तर त्यात काय वाईट आहे अस ती म्हणे.
पण तारा मात्र अशी नव्हती. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण तिच्या नजरेतून सुटत नसत. रादर ती डोळेझाक करत नसे. या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या लगेच नजरेत येत. आणि एक म्हणजे कोणालाही लगेच जज करायचा तिचा स्वभाव होता. विचार न करता अगदी एखाद्या गोष्टीवरून त्या माणसाबद्दल मत बनवणे, काहीतरी पटकन बोलून जाणे अस ती करे. आता देखील जेव्हा रेखा मृणालीच कौतुक करत होती तेव्हा ती फणकाऱ्याने बोलली, “रेखा तुला ना उगाचच सर्वांचं कौतुक करायची सवय आहे. ही कसली कला आहे?
मॉडर्न आर्टच्या नावाखाली काहीही काढायचं. मला नाही आवडली बाई ती चित्र. मला तुझ्यासारख उगाच गोड बोलायची सवय नाही. जे खर आहे ते मी बोलते. आणि सरळ सरळ समजत होती की ती अजून तेवढी ट्रेन नाही की तिची चित्र प्रदर्शनामध्ये लावावीत. हल्ली काहीही चालत.” त्यावर रेखा म्हणाली, “अग तारा ती मुलगी अजून लहान आहे, आता शिकून बाहेर पडलीये, तू अशी कशी अपेक्षा करते की तिची चित्र एकदम परफेक्ट असतील? आणि अस कधी असत का? थोडफार मागे पुढे होतच. असच शिकत पुढे जायचं असत. तिला नाव ठेवायला आपल्याला तेव्हढ तरी येत का? आपण आहोत का तेवढे परफेक्ट? नाही! आपण एखाद्याच्या कष्टाला चांगल म्हणू शकत नाही तर अस डायरेक्ट जजच्या खुर्चीवर बसून सरळ सरळ मत तरी देऊ नये. आपल्याला जर खरच त्याहून जास्त येत असेल तर आपल्याला बोलायचा अधिकार असतो.”
रेखा इतकं कळकळीने बोलत होती पण तारा वर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ती तशीच पुढे निघून गेली. कारण समोरच्याच ऐकून घ्यायचं हे तिच्या स्वभावातच नव्हत. काही माहीत नसताना एखाद्यावर कमेंट करण तिला लगेच जमायचं. तिचा हा स्वभाव सर्वांना माहीत होता त्यामुळे तिचं बोलण कोण मनावर घेत नसे.
पण तरीही रेखाला वाटायचं तिचा हा स्वभाव बदलायला हवा. अशी माणसं समाजात असतात, आपल्या आजूबाजूला असतात. ज्यांना उगाचच वाटत असत की आपण परीक्षक आहोत आणि समोर जे कोण येईल त्याच आपण परिक्षण करायचं आहे. पण समोरच्या व्यक्तीमध्ये चांगली सुधारणा व्हावी म्हणून त्याच परिक्षण करण, त्यावर आपलं मत मांडण वेगळं आणि आपल्याला काहीही माहीत नसताना त्या माणसाप्रती judgemental होण यात फरक आहे. जी व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये judgemental होत असते तिला इतरांना चुकीच्या पद्धतीने criticise करायची, कठोरतेने बोलायची सवय असते. त्यांना वाटत आपण माणसामध्ये सुधारणा व्हावी म्हणून बोलतो. पण अस होत नाही. आपण ज्या पद्धतीने बोलतो त्याच्या समोरच्या माणसावर परिणाम होत असतो.
Rude होऊन कसही बोललं तर समोरच्या माणसाचं मोराल डाऊन होण्याची शक्यता जास्त असते. आणि एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे परीक्षक जेव्हा आपलं मत मांडतात, त्यांना तो अधिकार असतो कारण त्यांना त्यातील अनुभव असतो. ते देखील परफेक्ट नसतात. बऱ्याचदा ते आपल्याहून कमी अनुभव असलेल्या व्यक्तीकडून देखील शिकतात, तशी तयारी ठेवतात आणि अशीच वृत्ती असली पाहिजे. कारण जगात परफेक्ट अस कोणीच नसत. आपण गुण दोषांनी भरलेलं मनुष्य आहोत. हे मान्य करून यात सुधारणा करून आपल्याला पुढे जायचं असत. इथे परफेक्शन महत्त्वाचं नसून एक्सेलेन्स महत्त्वाचा आहे.
जो स्किल ने येतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला जज, विशेषतः चुकीच्या पद्धतीने जज करण्यापूर्वी आपण त्यात किती प्रवीण आहोत, आपल्याला त्यातल किती येत हा करण खूप गरजेचं आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
