तुम्ही घेत असलेली काळजी अती काळजी तर होत नाहीये ना हे असं ओळखा.
हर्षदा पिंपळे
“अगं किती काळजी करशील ? बास कर काळजी करणं.”
हे वाक्य कुणालाही नवीन नाही. एकतर आपण तरी दुसऱ्यांची जास्त काळजी करतो किंवा दुसरे आपली
जास्त काळजी करतात.आणि त्यावेळेस अगदी
सहजपणे हे वाक्य कानावर/ओठावर येतं.
काळजी करणं काही वाईट नाही.आपल्याला
एखाद्याविषयी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे.
कुणी धडपडलं,कुणाला लागलं तर आपला जीव
लगेच खालीवर होतो.मन काळजीने बेचैन होतं.
आपण अशीच आपल्या माणसांची काळजी घेत असतो.
आणि कधी कधी हीच काळजी कुठेतरी अति होऊन जाते.थोडक्यात काळजीचा अतिरेक झालेला असतो.
आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.
तर , हा काळजीचा होणारा अतिरेक कसा ओळखायचा ते पाहूयात.
[आईला मुलांची खूप काळजी असते.आणि ते साहजिक आहे. पण कधी कधी आया मुलांची इतकी काळजी करतात की,मुलांनाच आईची काळजी वाटायला लागते.ती कधी कधी मुलांच्या बाबतीत इतकी काळजी करते की,मुलांना ते असह्य होतं.मुलं मोठी झाल्यावरही आईचं काळजीने भरलेलं मन काही शांत बसत नाही. मुलं कळत्या वयाची होतात तरीही आई मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते.अर्थात त्यात काही चुकीचं नाही. परंतु खरच कधी कधी आई प्रमाणाच्या बाहेर काळजी करत असते.
तर आईच नाही, आपल्या आयुष्यात असणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्ती अनेकदा ‘हे करू नको,त्याने असचं होईल, तसचं होईल.हे असं नाही करायचं,कितीदा सांगितलं? ऐकत जा जरा.आम्ही काळजीपोटीच बोलतो.’असं बोलत असतात.अर्थात त्यात आपणही येतोच.]
“तु मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. कुठेही एकटं जायचं नाही. तुला काही झालं तर ? तुला काही झालं तर माझं कसं होणार ? बाकीच्यांच कसं होणार ?” असं आपणही एखाद्याला कित्येकदा बोलत असतो.
” अगं बास् कर आता.किती काळजी घेशील. मला कंटाळा आलाय गं या तुझ्या अशा वागण्याचा.इतकी काळजी नको करू गं.”
“अगं,मला माझ्या गोष्टी माझ्या पद्धतीने करूदे.मला हवं तसं करूदे.सारखं सारखं मला हे असं करू नको.तसं करू नको.
असं बोलत जाऊ नको गं.मलाही समजतं काय करायचं आणि काय नाही.”
“धन्य आहे तुझ्या काळजीपुढे.इतकी काळजी तर माझे घरचेही नाही करत.कोण करतं यार एवढी काळजी ? प्लीझ् इथून पुढे माझी काळजी करणं बंद कर.मला नाही वाटत माझी कुणी इतकी काळजी घ्यावी.”
असे संवाद किंवा अशी वाक्ये जर कानावर येत असतील तर समजून जा,आपण एखाद्याची अतिकाळजी करतोय.
एखाद्याच्या बाबतीत आपणओवरपझेसिव्ह,ओवरप्रोटेक्टीव्ह होत असू तर हे अतिकाळजीचं लक्षण आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
“तिचं कसं होईल ? तो सगळं व्यवस्थित करेल नं ? तिथे काय झालं असेल ? या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करणे.तासनतास अशा प्रश्नांवर विचार करत राहणे.
कुणी थोडं धडपडलं तर तासनतास त्यावर काळजी करत राहणे.’फार लागलं तर नाही नं ? मलम लाव,गरम पाण्याने शेक,हे कर ते कर अशा गोष्टी चालूच असतात. क्षणभराच्या काळजीसाठी अनेकदा इथेच एक तास घालवला जातो.
ह्या सगळ्या गोष्टी आपण नेमकी किती काळजी करतोय हे दाखवतात. यावरूनच लक्षात येतं की आपल्या कडून अति प्रमाणात काळजी घेतली जातेय.
खरं तर काळजी करायची नाही असं नाही. ती सहजतेने केली जाते. परंतु परंतु आपणच कधी कधी तिच्या मर्यादा ओलांडत राहतो.आपल्याला काळजी करण्याची सवय नाही तर व्यसन लागलेलं असतं.त्यामुळे कधी, कुठे ,कशी काळजी करायची हे ठरवून घ्यायला हवं.
यामुळे स्वतःला आणि इतरांनाही त्रास होणार नाही.
कारण, अतिकाळजीने स्वतःला त्रास होतो,
आणि इतरांनाही त्रास होतो. म्हणून,काळजी करावी पण प्रमाणात.
अगदीच क्षुल्लक गोष्टींची काळजी करणं सोडून द्या.कप फुटला म्हणून संपूर्ण घर डोक्यावर घेण्यात काहीच अर्थ नसतो.तिथे अति काळजी करून काहीच उपयोग नसतो.शारीरिक आणि मानसिक ऊर्जा अशावेळी उगाचच खर्च होत असते.
पहा,काय करायचं ते एकदा ठरवून घ्या.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

