Skip to content

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं व्यसन जडलंय हे कसं ओळखाल??

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं व्यसन जडलंय हे कसं ओळखाल??


हर्षदा पिंपळे


व्यसन… ज्याला आपण इंग्रजीत addiction असं म्हणतो.तर व्यसन हे ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीच असतं/वस्तूच असतं तसचं एखाद्या व्यक्तीचही असतं. मग ती व्यक्ती तुमची मैत्रिण/मित्र असो,काकू असो किंवा आणखी कुणीतरी असो.आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्ती येतात.आणि त्यापैकीच येणाऱ्या कितीतरी व्यक्तींचं आपल्याला कधी व्यसन जडतं हेच कळत नाही. आणि व्यसन जडलेलं आहे की नाही ? हे ओळखणं कधी कधी आपल्याला अवघड वाटतं.पण हे अवघड वाटत असलं तरीही अशक्य मात्र मुळीच नाही.

मित्रांनो,आपण सहजपणे एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतत जातो.त्या व्यक्तीची आपल्याला इतकी सवय होते की दिवसभरात एकदा तरी त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय आपण राहत नाही. ईतकी सवय लागते की ते कधी व्यसन होऊन जातं तेच कळत नाही.

तर तेच कसं ओळखायचं ते आपण पुढील काही गोष्टींच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

—–

◆सतत काळजी वाटणे-

◆आठवण येणे –

◆वागण्या बोलण्याच्या/स्वभावाच्या प्रेमात पडणे –

◆सहवास हवाहवासा वाटणे –

◆तिच्याविषयी रिस्पेक्ट वाटणे,प्राउड फील होणे –

◆तिच्याविना सगळं व्यर्थ वाटणे –

◆संवाद साधावासा वाटणे –

◆सतत काळजी वाटणे-

काळजी करणं हा स्वभाव असला तरी आपण उठता बसता काही सगळ्यांचीच काळजी करतो असं नाही. आणि केली तरी इतकी काळजी करत नाही. पण आयुष्यात काही व्यक्तींसाठी मन सारखं काळजीने वेड्यासारखं येरझारा घालत असतं.अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही आपल्याला काळजी वाटत राहते. “ती कशी असेल?त्याला नाहीतर सरळ इकडे यायला सांग,जवळ असला की काळजी मिटेल.कळत नाही का याला कितीदा सांगायचं घरी पोहोचल्यावर कळवत जा म्हणून…” असं आपण काही ठराविक व्यक्तींविषयी सहजपणे, अगदी कळवळून बोलत असतो.

◆आठवण येणे –

एखाद्या व्यक्तीची आठवण येणं यासारखी सुंदर गोष्ट नाही.एखादी व्यक्ती आपल्या सोबत कायम असते.तिच्यासोबत आपल्या असंख्य आठवणी जोडलेल्या असतात. पण तीच व्यक्ती क्षणभर जरी नसली तरी आपल्याला तिची आठवण येत राहते.हसणं-रडणं,भांडणं सगळं काही अशावेळेस आठवत राहतं.ईतकी आठवण येते की हसता हसता कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात कळतच नाही. त्या माणसाच्या आठवणी क्षणाक्षणाला वेड्यासारख्या छळत राहतात.

◆वागण्या बोलण्याच्या/स्वभावाच्या प्रेमात पडणे –

सगळ्यांचच वागणं -बोलणं काही मधाळ आणि लाघवी नसतं.आणि सगळ्यांचाच स्वभाव काही समजूतदार नसतो.पण एखाद्या व्यक्तीचं वागणं बोलणं आपल्याला सहजपणे आवडायला लागतं.त्याचा स्वभाव, त्याचं वागणं बोलणं आपल्याला कळत नकळतपणे त्या त्या व्यक्तीच्या जवळ घेऊन जातं.

◆सहवास हवाहवासा वाटणे –

एखाद्या व्यक्तीचं आपल्या अवतीभवती रेंगाळणं आपल्याला खूप सुखद वाटतं.त्या व्यक्तीचा सहवासात एक वेगळीच जादू वाटते.छान वाटतं.मोकळं वाटतं.तो सहवास सतत हवाहवासा वाटत राहतो.सतत ती व्यक्ती आपल्या अवतीभवती असावी असं वाटत राहतं.

◆तिच्याविषयी रिस्पेक्ट वाटणे,प्राउड फील होणे –

एखादी व्यक्ती खरच अशी असते की त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात कळत नकळतपणे आदरभाव निर्माण होतो.त्या व्यक्तीबद्दल एक ग्रेटनेस तयार होतो.”ती खरचं ग्रेट आहे.तिच्याविषयी कितीही बोललं तरी कमीच आहे.” असं एखाद्या व्यक्तीबद्दल आपण सतत बोलत राहतो.

◆तिच्याविना सगळं व्यर्थ वाटणे –

एखाद्या व्यक्तीचा इतका लळा लागतो की,तर तिच्याशिवाय सगळं अपूर्ण वाटत राहतं.प्रत्येक गोष्टीत त्याच व्यक्तीची आठवण येत राहते.त्या व्यक्तीशिवाय सगळं व्यर्थ वाटायला लागतं. ती व्यक्ती आत्ता या क्षणी इथे असायला हवी असं वाटत राहतं.त्या व्यक्तीचं नसनं मनाला खात राहतं.

◆संवाद साधावासा वाटणे –

एखाद्या व्यक्तीसोबत बोलण्याची ईतकी सवय जडलेली असते की एक दिवसही करमत संवाद साधल्याशिवाय करमत नाही.दिवसभरात किमान एकदा तरी संवाद साधावासा वाटतोच. संवाद झाला नाही तर मन अस्वस्थ होतं.”आज काही बोलणच झालं नाही. राहवत नाहीये मला ” असं आपण खूप सहजतेने बोलून जातो.

तर या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला एखाद्या व्यक्तीचं व्यसन जडलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी नक्कीच मदत करतील.तर एकदा या गोष्टी लक्षात घेऊन काय होतय ते पहा.अनुभव घ्या.आणि जर तुमच्याकडे काही अजून वेगळे मार्ग असतील तर तेही सांगायला विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *