तुम्हाला दुःखी करणाऱ्या गोष्टी अशा ओळखा.
हर्षदा पिंपळे
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे!
अनु हे गाणं म्हणत अंगणभर बागडत होती. तिला कोणत्या तरी गोष्टीचा प्रचंड आनंद झाला होता हे तिच्या वागण्यावरून सगळ्यांना समजत होतं.हे पाहून “अनु बाळा काय गं…काय खुशखबर हं….का बागडतय आमचं अनु बाळ ?” आबा म्हणाले.”काही नाही हो आबा…ते फुलपाखरू माझ्या हातावर येऊन गुदगुल्या करून पळून जातय.म्हणून मी खूप खुश आहे. मला खूप आनंद झालाय.’I’m so much happy ajooo’.” अनु म्हणाली.
थोडक्यात आबांनी ति आनंदी आहे तेही ओळखलं होतं आणि त्या आनंदामागच कारणही ओळखलं होतं.
अशा आनंदी करणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आजुबाजुला असतात.लहान मुलं तर ‘भॉ आणि कूक’ केल्यावरही आनंदाने उड्या मारतात.
आता आपल्याला आनंदी करणाऱ्या जशा गोष्टी असतात तशाच आपल्याला दुःखी करणाऱ्या गोष्टीदेखील असतात.कधी कधी आपल्याला कशातून आनंद मिळतो हेही समजत नसतं.किंवा कळून वळत नसतं.अगदी तसच आपल्याला काही दुःखी करणाऱ्या गोष्टीही असतात आणि आहेत. पण अनेकदा त्या लवकर ओळखूच येत नाही.किंवा मग असही होतं की आपल्याला दुसऱ्याला दुःखीकष्टी करणाऱ्या गोष्टी ओळखता येतात पण स्वतःला दुःखी करणाऱ्या गोष्टी ओळखता येत नाही.
तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुःखी करतात. त्या कशा ओळखायच्या ते आपण पाहूयात.
[दुःखी करणाऱ्या गोष्टी-पुरेसे पैसे नसणे,एखाद्यासोबत नातं तुटणे,गोष्ट मनासारखी न होणे किंवा मनाविरुद्ध घडणे, एखादी व्यक्ती सोडून जाणे,मृत पावणे,एखादी गोष्ट सॉर्ट न होणे…वगैरे वगैरे .]
—-
*पुरेसे पैसे नसतील तर कित्येक गोष्टी खोळंबतात. अपूर्ण राहतात. आणि गोष्टी अपूर्ण राहिल्या किंवा खोळंबल्या तर त्याचे परिणाम काही फारसे चांगले होत नाहीत.थोडक्यात सांगायचे झालं तर आर्थिक
चणचण आली की मन दुःखी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आर्थिक चणचण ही आपल्याला दुःखी करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे.
*मनासारखी नोकरी मिळाली नाही तर…..मन कामात कमी आणि दुसरीकडे जास्त भरकटत जातं.असच जर मनाविरुद्ध घडणारी गोष्टही आपल्याला दुःखी करते.
*जर कुणासोबत भांडण झालं तर ते नातं कधी तुटत तर कधी टिकतं.अनेकदा हे कधीकधी आपल्याला सहन होत नाही.आणि तेच भांडण आपल्या दुःखासही अनेकदा कारणीभूत ठरतं.
*हातून एखादी चुक झाली तर आपली अवस्था फार काही बरी नसते. अशावेळेस काय होतं….? चुकून चुक झाल्याच दुःखही आपल्याला दीर्घकाळ जाणवत राहतं.म्हणजेच एखादी चुकही आपल्या दुःखाच कारण असू शकते.
*आपल्या आयुष्यात अशा गोष्टी असतात ज्या दीर्घकाळ आहे तशाच असतात. त्या गोष्टी कधी सॉर्ट आउट होतच नसतात.(कधी कधी आपणही प्रयत्न करत नाहीत.)याच सॉर्टेड नसलेल्या गोष्टीही मनाला त्रास देतात.
*चांगल्या माणसांनी साथ दिली की जितकं बरं वाटतं तितकं कैक पटीने अधिक वाईट त्यांनीच वाईट काळात साथ सोडल्यावरही वाटतं.ही गोष्ट दुःख वाटण्यासारखीच आहे.
*हल्ली निःस्वार्थी भावना किती उरल्या…? स्वार्थासाठी माणूस काहीही करतो.अर्थात आपल्यासोबत कुणी स्वार्थी वृत्तीने वागत असेल तर समजून जायच….याचं दुःख तर होणारच.
अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुःखी करतात.एखादी आजी एकटीच शांत बसलेली दिसली तरी आपलं मन अस्वस्थ होतं.हे अस्वस्थ मन देखील आपल्या दुःखाच कारण बनतं. अभ्यास नाही झाला तर पेपर अवघड जाणार,पेपर अवघड गेला की मार्क्स कमी मिळणार….वगैरे.(त्या त्या प्रसंगावरून सुख की दुःख याची कल्पना आपण करू शकतो.)असो,असे काही प्रसंग घडत असतील तर समजून जायच आपल्याला या गोष्टी थोडफार दुःख देणारच आहेत.यामुळे आपण दुःखीकष्टी होणारच आहोत.
फक्त किती काळ दुःखी रहायच हे आपण ठरवायला हवं.दुःखातून बाहेर पडून मूव्ह ऑन करायच की तिथेच थांबायच याचाही विचार करा.ते आवश्यक आहे.आणि या दुःखाला आयुष्याचाच एक भाग म्हणून पहा.आहे ते स्विकारून पुढे जायला शिका.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेख आवडला