Skip to content

तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं म्हणून नको त्या लोकांना तुमच्याविषयी जास्त कळू देऊ नका.

तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं म्हणून नको त्या लोकांना तुमच्याविषयी जास्त कळू देऊ नका.


पुजा सातपुते


राग आणि उदासीनता या अशा भावना आहेत ज्यामुळे कधी कधी आपला स्वतः वरचा ताबा सुटतो आणि आपण आपल्याला घातक असलेल्या गोष्टी करायला लागतो. त्यातली एक म्हणजे आपण आपलं मन कोणासमोरही मोकळं करतो!

बरेचदा असं होतं की रागात आणि उदासीनतेत आपण खूप बडबड करतो, नको त्या गोष्टी नको त्या लोकांसमोर बोलून स्वतःचं मन मोकळं करतो आणि नंतर आपल्याला त्याचा पचतावा होतो.

काही लोकांना इकडच्या गोष्टी तिकडे करण्याची खूप आवड असते, साधी गोष्ट मोठी करून सांगणं ही त्यांची हॉबी असते. अशी लोकं नवीन न्यूसची वाट बघतच असतात. त्यांना समोरच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतोय याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. अशी लोकं सगळं ऐकून घेतात, सहानुभूतीही दर्शवतात आणि दुसऱ्या दिवशी तुमची गोष्ट सगळ्यांना तिखट मीठ लावून सांगतात.

आता काही लोकं मनानी चांगली असतात आणि तुमची खासगी गोष्ट सगळ्यांना कळावी हा त्यांचा हेतू नसतो पण त्यांचं स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी ते इतरांना सांगतात आणि आपली बातमी वाऱ्यासारखी पसरते.

कधी कधी आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी आपण आपली खासगी गोष्ट सांगतो, कधी ऑफिस मध्ये तर कधी आपल्या फ्रेंड्स सरकल मध्ये. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्यांना आपण चांगले ओळखतो आणि ही लोकं आपल्याला समजून घेतील पण आपण समोरच्याला कितीही ओळखत असलो तरी कुठलीही व्यक्ती जास्त काळ कुठली माहिती लपवून ठेवुच शकत नाही. कोणाला तरी ते ती सांगणारच आणि माहिती पसरत जाणार आणि त्याचं रूपांतर अफवेत होणार. ही ह्यूमन टेंडनसी आहे आणि त्याचं आपण काहीही करू शकत नाही.


म्हणून तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं म्हणून नको त्या लोकांना तुमच्याविषयी जास्त कळू देऊ नका. अगदी आपले खास असले तरी सुद्धा कारण माणूस म्हंटलं म्हणजे व्यक्त होणार, त्यांची भावना चुकीची नसली तरी ते आपलं मन कोणासमोर तरी मोकळं करणार पण ज्याच्या समोर ते व्यक्त होत आहेत ती व्यक्ती कशी असेल हे आपल्याला माहित नसतं आणि यामुळेच आपल्या आयुष्यात न घडलेल्या गोष्टीही पसरवल्या जातात.

साहजिक आहे आपण दुःखी असलो, रागात असलो तर आपल्याला काहीही सुचत नसतं आणि अशावेळेस कोणालातरी आपलं म्हणणं पटावं यासाठी आपण काय घडलं ते सांगतो जेणेकरून त्यातनं काहीतरी मार्ग निघेल आणि प्रॉब्लेम सुटेल पण खूप व्यक्त होण्याने प्रॉब्लेम सुटण्या ऐवजी वाढत जातो आणि त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागतात.

सगळ्यांची विचार क्षमता ही वेगळी असते. सगळे तुमच्या सारखाच विचार करतील असं नाही. तुम्हाला बरोबर असलेली गोष्ट समोरच्यासाठी चुकीची असू शकते. तुमच्या आयुष्यात काही विपरीत झालं आणि त्यात तुमची काहीही चूक नसली तरी इतरांच्या नजरेत तुम्ही चुकीचे असू शकता आणि त्यावर जेव्हा जास्त चर्चा व्हायला लागली की तुमची वयक्तीत गोष्ट ही वयक्तीत राहत नाही.

आता यामुळे कोणासमोर व्यक्तच व्हायचं नाही असा होत नाही. मन मोकळं करण्यामुळे नक्कीच फायदा होतो आणि प्रॉब्लेम्स चे सोलुशनही मिळतात पण मन व्यक्त करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे रागाच्या भरात किव्हा उदासीनतेत कोणासमोरही कोणाविषयी अपशब्द बोलायचे नाही कारण अशा वेळीस आपल्या स्वतःवर आपला ताबा नसतो आणि प्रॉब्लेम्स वाढण्याची शक्यता जास्त बनते.

स्वतः व्यतिरिक्त कोणीही आपल्याला जास्त ओळखत नाही. म्हणून अशा वेळेस पॉझ घ्यायची प्रॅक्टिस करा. राग आला की पॉझ घ्या, जे घडलं त्याचा थोडा विचार करा, चूक कोणाचीही असो त्यावर काय तोडगा काढता येईल ते बघा. दुःखी असाल तर पॉझ घ्या, पाहिजेतर एकटे रडून मोकळे व्हा, रडण्याने आपलं मन शांत होतं आणि शांतपणामुळे सोलुशन पण लवकर मिळतं.

तुम्हाला अगदीच तोडगा मिळत नसेल तर चर्चा जरूर करा पण खासगी गोष्ट डिटेल मध्ये सांगत बसू नका. समजा तुमच्या खास कोणाबरोबर भांडण झालं आणि ती गोष्ट तुम्ही सगळ्यांना सांगत बसले तर तेवढ्यापुरता ते तुमची बाजू घेणार, ज्याच्या बरोबर तुमचं भांडण झालं आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला चुकीचं सांगणार आणि तुमचं मन आणखीन कलुशीत होणार. आता सांगा आपले जे खास असतात त्यांना आपण चांगले ओळखतो का इतर लोकं? कधीतरी भांडणं ही होणारच त्यामुळे ती सगळ्यांना सांगत बसण्याची काहीही गरज नाही आहे. त्यापेक्षा थोडा पॉझ घ्या आणि ज्याच्याबरोबर भांडण झालं आहे त्याच्याशी डिसकस करा. आपोआपच तुम्हाला सोलुशन मिळेल.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा पण त्यांना अती पर्सनल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करू नका. काही गोष्टी पर्सनलच ठेवायच्या असतात. प्रॉब्लेमचं सोलुशन जरूर विचारा पण योग्य पद्धतीने, स्वतःचं किव्हा कोणाचं नाव खराब न करता. जेवढं तुम्ही शांतं राहाल आणि बुद्धीने विचार कराल तेवढी तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. नेगेटिव्ह विचार पसरवून तुम्ही आयुष्यात तिथल्याच तिथे राहणार आणि तुमची प्रगती थांबणार. तीच तीच चर्चा सतत करत बसले तर त्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. तुम्ही जेवढे शांतं आणि सिक्रेटीव्ह राहाल तेवढी तुमची रिस्पेक्ट वाढेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *