Skip to content

तुमच्यामुळे इतरांना त्रास झालाय हा मनातला पश्चात्ताप हळूहळू असा रिलॅक्स करा.

तुमच्यामुळे इतरांना त्रास झालाय हा मनातला पश्चात्ताप हळूहळू असा रिलॅक्स करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मी खूप मोठी चूक केली, खरच मी अस वागायला नको होत. माझ्यामुळे किती त्रास झाला सर्वांना. आई बाबा किती upset झाले ते. माझ्यामुळे त्यांना नकोत्या गोष्टींना सामोर जावं लागलं. त्यांनी जरी दाखवलं नाही तरी मला माहित आहे त्यांना किती त्रास होत असणार. मीच सर्वाची अपराधी आहे. मी हे काही केल ती गोष्ट आता कधी भरून निघेल का नाही काय माहीत? त्या सर्वांना वाटत मी परिस्थितीपासून पळ काढत्ये, म्हणून इथे या अश्या परक्या ठिकाणी येऊन राहते.

पण त्यांना कोण सांगेल त्यांच्यासमोर जायची, त्यांना फेस करायची माझी हिम्मत नाही. आणि त्यासाठी जर हे एकट राहणं माझ्या वाट्याला येत असेल जर याला पळवाट म्हणत असतील तर हो, मी पळवाट शोधली आहे. मी नाही जाऊ शकत त्यांच्यासमोर. एक मुलगी म्हणून त्यांनी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या. त्या तर मी पूर्ण केल्या नाहीतच उलट त्यांना मान खाली घालायला लावली. माझ्यामुळे त्यांची सर्व नातेवाईक, आजूबाजूच्या लोकांसमोर नाचक्की झाली.

इतकं सर्व झालेले असताना मी त्यांच्या सोबत राहून त्यांचा त्रास अधिक वाढवण्यात काही अर्थ नव्हता. आता इथे राहणच योग्य आहे. जितकी मी त्यांच्यापासून लांब राहीन तितकं त्यांना त्रास कमी होईल. कारण मी समोर असले की लोक नको नको ते प्रश्न विचारणार. मी तिथे नसलेच तर बोलायला विषयच मिळणार नाही. त्यामुळे माझा हाच निर्णय योग्य आहे. पालवी स्वतःशीच बोलत बसली होती.

डोळे भरून आले होते. जे काही झालं होत त्याला आता जवळपास सहा सात महिने लोटून गेले होते. पण जखम भरली तरी त्याचा व्रण राहतो आणि तोच जास्त त्रासदायक ठरतो तस काहीस तिचं झालं होत. झाल्या गोष्टीचे जे पडसाद उमटले होते ते तिच्या मनातून काही केल्या जाईनात. अपराधीपणाची भावना मनात घर घर करून बसली होती.

काय झालं होत अस सहा सात महिन्यांपूर्वी? ज्याचा त्रास पालवीला अजून होत होता. तर पालवी कॉलेज मध्ये असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडली होती. तो तिच्या कॉलेजचा नव्हता. पण कुठल्याश्या एका पार्टीमध्ये बाकी फ्रेंड्सच्या माध्यमातून तिची प्रणयशी ओळख झाली. त्यांचं बोलणं वागणं प्रभावित करण्यासारखच होत. दिसायला पण छान, चार चौघात उठून दिसणारा.

बोलण लाघवी समोरच्या माणसाला लगेच आपलसं करून टाकणारं. पालवी त्याच्यावर भाळली यात काही आश्चर्य नव्हत. पार्टी मध्ये जी ओळख झाली त्याच रूपांतर मैत्री मध्ये झालं. मग हळू हळू कॉलेज झाल्यावर त्याला भेटण, त्याच्यासोबत वेळ घालवण या गोष्टी होऊ लागल्या. काही दिवसांनी प्रणय ने स्वतःच तिला प्रपोज केलं. तिने नकार द्यायचा प्रश्नच नव्हता.

तिला तो पहिल्यापासूनच आवडला होता. एका नवीन नात्याची सुरुवात झाली. पालवी तर त्याच्याशी लग्न करायची स्वप्न पाहू लागली. काही महिन्यांनी तिचं कॉलेज पण पूर्ण होणार होत. मग आई बाबांना सांगायचं आणि लग्न करायचं असा तिने विचार केला. तिने ही गोष्ट प्रणयला पण बोलून दाखवली. आश्चर्य म्हणजे त्याने देखील लगेच होकार दिला. तिला कल्पना नव्हती की तो अस लगेच हो म्हणेल. कारण आपण नात्यात जरी असलो तरी लग्न ही गोष्ट इतका सहजासहजी होत नाही. पण जेव्हा तो तयार झाला तेव्हा मात्र पालवीला कधी कॉलेज होत आणि आपण आई बाबांना सांगतो अस झालं.

यात काही घटना देखील घडल्या. प्रणयच्या मनात नवीन बिझनेस सुरू करायचा अस चालू होत. पण समस्या ही होतो की त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पालवी सोबत असताना सहज एकदा तो ही गोष्ट बोलला. या मुलीने काहीही विचार न करता त्याला आपल्याकडे असलेले पैसे जे तिच्या आई बाबांनी तिच्या साठी म्हणून ठेवले होते ते काढून दिले. आपण शेवटी याच माणसासोबत आयुष्य काढणार आहोत, आता जर त्याच आयुष्य स्थिर झालं तर आपलंच चांगल होणार इतकाच तिचा हेतू होता.

त्यासाठी ती वाटेल ती मदत करायला तयार होती. या मध्ये तिने एकदा तिच्या आईने तिच्यासाठी जे दागिने करून ठेवले होते ते काढून घेऊन दिले. प्रणयने आधी घ्यायला खूप नकार दिला पण बिझनेस ग्रो झाला की मी तुझ्यासाठी याहून चांगले दागिने करेन अस बोलून त्याने ते दागिने घेतले. त्यावेळी घरात खूप गोंधळ झाला होता. दागिने गेले तरी कुठे हा विचार करून करून आई बाबा रात्रभर जागले होते. पण पालवी काही बोलली नाही.

हे अस करत करत तिचा कॉलेज पूर्ण झाल आणि एक दिवस योग्य वेळ पाहून, आई बाबांना समोर बसवून प्रणयविषयी सांगितल. त्यांनी खूप आढेवेढे घेतले पण ते त्याला भेटायला तयार झाले. तो त्यांना येऊन भेटून पण गेला. त्यांचं बोलणं वागणं पाहून आई बाबांना पण तो पसंद पडला आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. दोन दिवसांनी माझ्या आई बाबांना भेटायला घेऊन येतो अस प्रणयने सांगितल. इथे आई बाबांनी त्याच्या बद्दल नातेवाईकांमध्ये पण सांगितल होत.

पण आयुष्यात असे काही अनुभव येतात ज्याची आपण कल्पना केलेली नसते. तसच झालं. दोन दिवसांनी येतो अस सांगून प्रणय जो गेला तो परत आलाच नाही. पालवी ने खूप फोन केले, तो जिथे राहत होता तिथे गेली, त्याचे मित्र मैत्रिणी त्यांना भेटली पण कोणालाही काही माहीत नव्हत. या गोष्टीला जेव्हा एक महिन्याहुन जास्त काळ लोटला तेव्हा सर्वांना समजून चुकलं की पालवीची फसवणूक झाली होती. प्रणय तिच्याशी प्रेमाचं नाटक करून, तिचे दागदागिने पैसे घेऊन पळून गेला होता.

हा तिच्यासाठी, तिच्या आई बाबांसाठी खूप मोठा धक्का होता. सर्वच अनपेक्षित होत आणि अस जेव्हा होत तेव्हा माणसांना बोलायला संधीच मिळते. जेव्हा ही बातमी लोकांना समजली तेव्हा बोलण सुरू झालाच, कधी समोर कधी पाठीमागे. कशी पालावीचीच चूक होती, कसं आई वडिलांना पण समजलं नाही. या सर्व गोष्टी पालवीला जेव्हा असह्य झाल्या तेव्हा ती त्यांना सोडून इथे दुसरीकडे येऊन राहिली. इथे तिला नोकरी मिळाली होती. दर महिन्याला ती घरच्यांना पैसे पाठवत असे. पण तिथे जायला मात्र तिचं मन होत नव्हत.

या अश्या घटना आपल्या आयुष्यात पण कधी ना कधी घडतात. आपल्याकडून पण अनेकदा चुका होतात ज्याचा त्रास आपल्याला सोबतच इतरांना होता. पण याचा अर्थ तो त्रास आपण मुद्दाम दिलेला असतो अस नाही. ज्या चुका होता त्या देखील आपण जाणून बुजून केलेल्या असतात अस नाही. माणूस आहोत म्हटल्यावर आपल्याकडून चुका होऊ शकतात. त्यातूनच शिकून पुढे जायचं असत.

आपण जर त्याच गोष्टीचा पश्चाताप करून, स्वतः ला अपराधी समजून कोसत राहिलो तर यातून कोणाचंच चांगल नाही होणार. उलट यातून त्रास अजून वाढणार. त्यामुळे जरी काही झालं तरी त्या परिस्थितीतून पळ काढू नका. त्याला सामोर जाण हाच त्यावरचा मार्ग आहे. कारण त्रास हा कधी कायम स्वरुपी राहत नाही. तो हळू हळू कमी होतो.

जी आपल्याला समजून घेतात ती आपल्याला माफ देखील करतात. आणि जरी चुका झाल्या असल्या तरी त्याची वेगवेगळी कारण असतात. जी त्यावेळी कारणीभूत ठरतात. ती पण आपण लक्षात घेतली पाहिजेत. अनुभवातून माणूस परिपक्व होतो अस म्हणतात. त्यामुळे जे काही झालं ते मला काहीतरी शिकवून गेलं अस म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे आणि स्वत:ला माफ केलं पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!