तुमच्या जगण्याचा आशावाद संपला कि समजा आता सर्वच हळूहळू संपणार.
डॉ योजना चिराग.
शास्त्रशुध्द होमिओपॅथी तज्ञ
“मॉडेल कॉलनी मध्ये आलिशान बांगलो आहे, वर्षाचा जवळपास अर्धा – पाऊण करोड च्या आसपास इनकम असेल मॅम,दोन मुले दोघेही उच्च शिक्षित एक कॅलिफोर्निया त MNC त सॉफ्टवेअर मध्ये जॉब करतो आहे एक इथे माझ्या सोबत आमच्या Private फर्म मध्ये च काम करतो पुर्ण settled आहे, त्याला ही नुकतेच गोंडस बाळ झालेय, बायको सुगरण आणि गायिका आहे सून आदराने वागवते स्वतः ही हुशार आहे, दिमातीला घरी ऑफिस मध्ये चार नोकर आहेत……. असं सगळं अतिशय व्यवस्थित चालू आहे मॅम ”
पण…….” मॅडम कशातच खरं इंटरेस्ट, रस नाही वाटत, कशातच आनंद नाही मिळत,मागच्या वर्षा पासूनच काहीसा ऑफिस मधला आणि घरातला माझा सगळा उत्साह आनंद निवळला आहे. ”
“काय माहित का पण रोजचा दिवस same रटाळवाना, monotonous वाटतो, बाळा ने छान छान गोंडस खेळ केले काय किंवा बायकोने छान सुग्रास मेनू करुदेत खायला मजा येत नाही, जनू काही हे घडतच नाहीये स्वप्नवत गुंगीत असल्यासम वाटते आणि सगळे क्षण असेच बेसूर boring वाटतात” रविकांत हे IBS आणि डायबेटिस आजारासाठी आपल्याकडे होमिओपॅथीक उपचार घेण्यासाठी case history taking मध्ये बोलत होते.
मयुरी ही अवघ्या 16 वर्षाची teen age मुलगी. तिच्या पिंपल्स किंवा acne आणि hormonal imbalance साठी माझ्याकडे treatement घ्यायला आलेली.
ती history देताना व्यक्त झाली आणि आईने ही सांगितले ” मॅडम कशातच सहभाग घेत नाही घरात, एकटीच तिच्या रूम मध्ये पडून असतें, ह्या lockdown पासून तर फारच विचित्र वागते आहे, मैत्रिणीशी बोल म्हटले तर एकही call करत नाही नातेवाईकांशी बाहेर येऊन साधं बोलत ही नाही, जवळ घ्यायला गेलो तर झिडकरते, आणि छोट्या बहिणीच्या कुठल्या ही मज्जे त येत नाही,
कधी कधी खूप जास्त राग राग करते, उद्धट बोलते, तर बाकी वेळी सुम्म बसून असते.मॅडम जोक झाला तर हसायला ही येत नाही म्हणते, कशातच आनंद मिळत नाही हिला 😔”
“हळू हळू ही मुलगी कोमेजत चालली आहे तिचा चेहरा बघवत नाही.
वरील दोन्ही patient वेगवेगळ्या वयाचे आणि वेगवेगळ्या परिस्थिती त ले आहेत असे अनेक patients आम्ही क्लिनिक मध्ये एवढ्या २० वर्षात जास्तच बघत आहोत.
त्यांच्यातील एक प्रतिनिधिक म्हणून ही उदाहरणे मी घेतली आहेत. मी स्वतः REBT थेरपी ने पेशंट ला मदत करते. परंतु जिथे प्रॉब्लेम जास्त गुंतागुंतीचा असेल, clinical psychology related असेल तर मी psychology experts कडेच पाठविते. जसे वरील १६ वर्षीय मुलगी.
आज अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यन्त ज्वलंत प्रश्न या युगाचा 21 व्या शतकातील आहे.
भौतिक जगतातील सर्व सगळा साज, सगळी भौतिक समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेत असताना. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होताना सर्रास बघायला मिळतो कि सगळा भौतिक साजशृंगार आजूबाजूस असताना ही कशातच आनंद मिळत नाही आनंद वाटत नाही, आनंद काय असतो कळत नाही, आणि आनंद शोधला तरी सापडत च नाही, अशा बऱ्याच जणांचे आयुष्य रोजचे तेच तेच बोअर आणि भकास जाणवते त्यांना, रोज गोड धोड खायला असून त्यात रस नाही वाटत.
फिरायला गेले तरी तिथे निसर्गाची चोहो बाजूने सौंदर्याची अक्षरशः उधळण चालू असतें पण तिथेही बरेच जण बोथट नजरेने बघत फक्त उपस्थित असतात,
इवलुशा चिमुकल्या हाताने बाळाने केलेले गोंडस चाळे, मधूनच हुंकार तर मधेच सोडलेली किलकारी, अतिशय निष्पाप चंचल आणि सुंदर डोळ्यांनी बाळाने दिलेला कटाक्ष कुणालाअंतरंगात भिडत नसेल तर काय म्हणावे….
पण मी त्या सर्वांची अवस्था समजू शकते ही जी अवस्था आहे ती ” Alexithymia “म्हणतात…. म्हणजेच आपल्याला आपल्या भावना च जाणवत नसतील, राग पण नाही आणि आनंद पण नाही तर…. भावनाशून्यता……Depression ची पहिली phase मला डिप्रेशन हा शब्द अतिशय negative आणि गंभीर वाटतो नेहमीच…. जेव्हा कि लोक सर्रास वापरतात तो डिप्रेशन शब्द नको म्हणून मी “Alexithymia ” शब्द वापरला आहे असं च नाही फक्त पण क्लिनिकल depression यायच्या आधीची ही phase…. त्याही आधी कित्येक दिवस आपले शरीर मन आपल्याला तसें संकेत देत च असतात आपण दुर्लक्ष करतो.
आपण प्रॉब्लेम discuss करत बसणार नाही आहोत नेहमीच्या पोस्ट्स प्रमाणेच आपण solution वर काम करणार आहोत.
तर ही मानसिक अवस्था नक्की का दिसते आपल्या आजू बाजूस. तर बरीच कारणे आहेत पण सर्वात prominant दिसणारे कारण म्हणजेच आपल्या शरीरात Serotonin या hormone किंवा Neurotransmitter ची कमतरता असणे.
Serotonin हे आपल्या brain मध्ये जे neurons असतात त्यांना जोडणाऱ्या synapses मध्ये आढळून येणारे द्रव्य आहे.
जे Tryptophan नावाच्या अमिनो ऍसिड कडून बनवले जाते. जे आपल्या भावभावना नियंत्रण आणि त्यानिगडित असणारे कामे करते. हे द्रव्य किंवा neurotransmitter त्याची कार्य बघुयात
Role of Serotonin /Functions of Serotonin
1) Happiness hormone –
आपल्या आनंद, समाधान, तृप्तता या अतिशय तरल भावनासाठी serotonin अत्यंत महत्वाचे hormone आहे.
आयुष्य भरभरून जगावेसे वाटणे, डोळ्यात चमक आणि अंगात चपळाई आणि मनात उत्साह स्फूर्ती ह्या hormone मुळे मिळत असतें.समरसून जगण्याचे,रसरससत्या सळसळत्या आयुष्या चे गमक ‘high spirit ‘ is Serotonin
केवढे दैवी आहे हे serotonin hormone. काहीतरी नवीन करत राहावे, नवनवीन जागी हिंडावे, नवीन adventure try करावे वाटणे, नवनवीन challenges घ्यावी वाटणे, नवीन अवचेतन मार्ग नव्याने चोखंदळा वे वाटणे,
नवीन माणसाला भेटले तर अलगद smile आणि ओळखीच्या व्यक्तीसाठी आनंदाच्या उत्साहाचे Hi, Bye, गुडमॉर्निंग, good day, तर आपल्या दोस्तांचा मैत्रिणींचा ता्फा खूप दिवसांनी बघितल्यावर चे घट्ट अलिंगण आणि जोरदार आवाज, चेकाळणे, पाहिजेच पाहिजे,
मैत्रिणीं आठ दहा आहेत आणि शांत गप्पा मारताहेत हे जरा दुर्मिळ च दृश्य न
हो खरंय मैत्रिणी जमल्यावर चार दोन घरा पर्यंत आवाज पोहोचायला च हवा, लांबूनच हशा टाळ्या किलकाऱ्या ऐकायला यायला च पाहिजे…. I mean हे शास्र नाही बरं… Jokes apart…. पण हे सगळं कशामुळे आपण करतो तर जोश, उत्साह, आनंद आणि स्फूर्ती च न ते काम Serotonin मुळे होते.
हे सगळं जाणवत च नसेल एखाद्याला तर…
करंटा….. असं अजिबात म्हणू नये.
त्याच्या कारणं चा शोध घ्यावा ताबडतोब.
तर हे कामे आहेत Serotonin नावाच्या दैवी देणगी चे.
2) Sleep Regulator –
आपल्या झोपेच्या रेगुलशन मध्ये ह्या serotonin hormone चा अत्यंत मोलाचा सहभाग आहे.
आपल्या शरीरात चांगल्या झोपेसाठी Serotonin high प्रमाणा मध्ये हवे.
Melatonin नावाचे जे sleep hormone आहे ते च मुळात serotonin produce करते बनवते.
त्यामुळे serotonin हे मुबलक प्रमाणात असेल तरच melatonin भरपूर असेल आणि आपली झोप छान शांत आणि refreshing व्हायला मदत होते.
3)- Agression/ तापट किंवा आक्रमक अति रागीट असणे – serotonin कमी झाले तर व्यक्ती अति रागीट, mood कायम agressive असणे.दिसून येते.
अशा लोकांमध्ये serotonin ची लेव्हल्स खूप कमी असतात.
त्या Anger management साठी mood management साठी या serotonin लेव्हल्स वाढवण्याने खूप मोलाची मदत होते.
4)- Appetite regulator –
भूक नियंत्रित करणे . भूक कमी करणे किंवा थांबाविणे नाही तर नियंत्रित करणे हे serotonin चे डायरेक्ट काम नाही.
पण indirect नक्की आहे. कसे तर serotonin hormone आपल्याला satity feeling देते, समाधाना ची भावना देते, तृप्ततेची जाणीव देते.
जेव्हा मन तृप्त आहे तेव्हा जेवण गरजे पुरते झाले कि थांबतो माणूस अगदी त्या विरुद्ध जेव्हा मन थाऱ्यावर नाही, समाधानी नाही, आनंदी नाही त्यांना काहीही कितीही खाल्ले तरी खाल्ल्याचे समाधान मिळत नाही.
उलट सारखी खा खा होते.त्याला च comfort eating बोलतात or mood hunger बोलतात.
जेव्हा खुश असतो तेव्हा आपल्याला उगाच खात बसावे नाही वाटत.
5)- Sexual drives Regulator –
समाधानी, आनंदी आणि pleasant feeling किंवा well being ची भावना serotonin मुळे व्यवस्थित असल्याने sexual drive ही कंट्रोल मध्ये असतें.
आणि त्यातील असंतुलन वाढत नाही पर्यायाने विकृती वाढत नाही.
6)- Memory and learning hormone – memory आणि learning ला ही आपल्याला मदत होते
Alzheimer हा आजार सर्वांना माहीतच असेल त्यापासून दूर ठेवण्यासाठी serotonin मुबलक प्रमाणात हवा.
7)-Blood clotting –
Blood clotting मध्ये खूप महत्वाचा role serotonin चा आहे.
जास्त आवाजवी रक्तप्रवाह होणे जो बऱ्याच आजारामध्ये दिसून येतो तो blood clotting न झाल्यामुळे होते त्या process मधेही serotonin चा मोलाचा सहभाग आहे.
आता सर्वात महत्वाचे बघुयात कि हे आपल्या सर्वांना जन्मजात मुबलक प्रमाणात दैवी देणगी दिलेले serotonin कमी कशाने होते.
1) -आपला आहार – चुकीचा आहार जो antiserotonin आहे
म्हणजेच असा आहार जो serotonin ची शरीरातील मात्रा कमी करते. ते आहेत
a)कोल्ड ड्रिंक्स जास्त प्रमाणात घेणे
b)alcohol जास्त घेणे
c)coffee किंवा तत्सम पदार्थ जास्त घेणे
d)साखरेचे पदार्थ किंवा जास्त गोड पदार्थ नेहमी नेहमी खाणे
e)junk food जास्त घेणे जसे पिझ्झा बर्गर आणि तत्सम
f)सोडा जास्त घेणे
ह्या खाण्याने serotonin कमी कमी होतं जाते
2)आवाजावी ताण तणाव आणि दीर्घ काळासाठी जर मानसिक ताण तणाव माणूस घेत असेल तर त्याला serotonin defficiency नक्की होणार.
उगीचच जास्त विचार करत बसणे, काळजी करत बसणे किंवा genuine स्ट्रेस जरी असेल तरी continuous खूप वर्षे महिने तणावात असण्याने neurotransmitter चे regulation च थकते त्याने त्याच्या production वर ही दुष्परिणाम दिसून येतो.
3)Sunexposure – जर आपण सूर्यप्रकाशात अजिबात जात नसू आणि घरीच बसून राहात असू तर व्हिटॅमिन D defficiency होते आणि व्हिटॅमिन D has considered to be very prominent role in serotonin production.
व्हिटॅमिन D अतिशय महत्वाचे व्हिटॅमिन आहे त्याबद्दल बोलू तेवढे कमी इतका महत्वाचा सहभाग आहे आपल्या रोजच्या शारीरिक आणि मानसिक क्रियामध्ये.
4)Sedentary lifestyle – गतीहीन किंवा बैठी जीवनशैली
म्हणजेच एकाच जागी बसून जीवन जगत असाल. फारशी हालचाल करत नसाल तर serotonin वर अत्यंत दुर्दैवी दुष्परिणाम दिसून येतात आणि serotonin लेव्हल्स कमी होतात.
आता जेव्हा serotonin चे इतके दैवी चमत्कारीक उपयोग बघितले त्याच्या कमतरतेची कारणे ही बघितली आता सगळ्यात महत्वाचे बघुयात कि हे वाढावायचं कसे.
प्रश्न किंवा कुलूप दिले त तर त्याची उत्तरे किंवा चाव्या ही असायला च हव्यात.
आता बघुयात कसे हे वाढावायचे
A)- Active Lifestyle – रोजचे आयुष्य गतिशील हालचाल कारण्याने serotonin लेव्हल्स भरपूर वाढतात.
मग एकतर तुमची जीवनशैली च हलती असावी जसे आपला पोशिंदा शेतकरी,मजूर, कामगार, कष्टकरी
किंवा मग तुम्ही रोज चांगला घाम येईल दम लागेल एवढा व्यायाम करायला हवा.
मिनिमम 45मिनटे ते एकतास.
कुठलाही व्यायाम, जिम, खेळ, swimming, dancing, sketing, running, jogging, aerobics, cardio किंवा काहीही ब्रिस्क walk सुद्धा चालेल पण rigorous activity हवी. व्यायाम किंवा शारीरिक कष्ट आपल्याला ताबडतोब आनंद देतात. Fresh ठेवतात.
उदा.
१-तुम्ही कधी निरीक्षण केले का मला comment मध्ये सांगा नक्की.
मी नेहमी बघितले आहे जिम मध्ये एक एक तास व्यायाम करून घामाघूम झालेले लोक वजने उचलून trademill वर धावून किंवा jogging करून ब्रिस्क walk किंवा running करणारे किंवा एखाद्या मॅरेथॉन संपल्या वर दिसून येते कि ही पुर्ण थकलेली, घामेजलेली माणसे,बायका आतून खुश दिसत असतात, डोळ्यात चमक आणि शरीरात स्फूर्ती दिसते. त्यांच्या ती त्या व्यायामाने वाढलेल्या serotonin मुळे.
उदा-
२- तुम्ही नेहमीच हा अनुभव घेत असाल मोठे मोठे सण तर सोडा पण नागपंचमी, तुलसी विवाह नी वटपौर्णिमा ह्या सणा नां सुद्धा बेल वाजली आणि आपण गाऊन वर विस्कटलेल्या केसांनी दार उघडले तर आपली कामवाली मावशी नटून, सजून चांगली साडी घालून येते
आपण तिलाच विचारतो काय आहे ग आज ?तर ती छान हसून प्रसन्न मुद्रेने सांगते ताई आज वाटपौर्णिमा,किंवा नागपंचमी आहे. आपण विचार करतो एवढा उत्साह येतो कुठून हिच्यात तर तो उत्साह कळला आता येतो कुठून तर तिच्या रोजच्या शारीरिक हालचालीतून. रोजचे शारीरिक श्रम तिला मौल्यवान देणगी देते serotonin चे.
मला comment मध्ये नक्की सांगा कि तुम्ही किती वेळा कधी ऐकलेय कामवाली बाईला डिप्रेशन आजार झाला आहे.
नाही बघायला मिळणार. सतरा विश्व् दारिद्र भोगूनही ती माय हसत मुख असतें नेहमी
उदा.
३- कधीही गावाकडे शेतकऱ्यां कडे भेटायला जा काबाड कष्ट उपसले ले थकल्या भागल्या चा लवलेश चेहऱ्यावर न ठेवता घरात ले ते माय बाप हसत मुखाने चहा पाहुणचार आग्रहाने वाढून असेल ते उत्साहाने वाढणार जेवू खावू घालणार आणि जाताना अगदी प्रसन्न मुद्रेने शेतातील वानवळा भरभरून आपल्या हातात देणार कुठून येते हे high spirit कळले असेल एव्हाना सर्वांना.
Active lifestyle- दिवसभर अंग झाडून काम करतात शेतात Sunexposure – १२ महिने उन्हात काम करतात शेतात ते Serotonin rich diet -आहार- आता पिझ्झा बर्गर सोडा कोल्ड ड्रिंक नक्कीच घेत नाहीत ही निसर्गप्रेमी ते अतिशय पौष्टिक nutrient rich diet घेतात.
हेच गमक त्यांच्या आतून हृदयातून येणाऱ्या दिलखुलास हास्याचे नाहीतर आपल्या सर्वांपेक्षा अधिक तणाव, अधिक अडचणी आणि असुरक्षितता तर या माउलींना असते.
B)-आहार – serotonin rich food कुठले तर
Serotonin हे द्रव्य Tryptophan ह्या अमिनो ऍसिड मुळे बनते तर आपण tryptophan rich आहार घ्यायचा तो म्हणजेच
Fresh fruits, pinapple, सॅलडस, dryfruits nuts, cheese, दुधाचे healthy पदार्थ, seeds म्हणजेच वेगवेगळी बिया जसे, कलिंगड बी, जवस बी, भोपळा बी, तीळ, सूर्यफूल आणि अजून असे सगळे.अंडी इत्यादी
C)-सूर्यप्रकाश – रोज कोवळ्या सूर्यप्रकाशात 20 मिनिट (sunblock न लावता )
रोज अशा कोवळ्या सूर्याप्रकाशात वेळ घालवला तर serotonin वाढते
D)- Yoga and Meditation –
योगा आणि ध्यान या प्रक्रिया मध्ये मन आणि शरीरात संतुलन निर्माण होते,चित्त शांत होते त्यामुळे आपोआप neurotransmission regulation व्यवस्थित व्हायला मदत होते.
त्याने serotonin लेव्हल्स अलगद वाढल्या जातात
E)- Trained massage -शास्रशुद्ध मसाज… शरीराला, मस्तकाला,सावकाश आणि शास्रशुद्ध मसाज मिळाला आणि regular स्वरूपात कि serotonin लेव्हल्स वाढायला मदत होते.
F)- Nature stay – निसर्गात मनसोक्त भटकंती तुम्हाला पुन्हा neurotransmission नीट करण्यास नक्की च मदत करते आणि serotonin बहाल करते.
G)Gardening – बागबगीचा सांभाळने
रोपे फुलझाडे लावणे, त्यांची निगा राखणे यातून आपल्या ला मोलाचे serotonin वाढते
H) Time with Kids – लहान मुलांशी खेळल्याने त्यांच्या सोबत quality time spend केल्याने, त्यांच्यासोबत मज्जा मस्ती केल्याने. लहान मुलासारखे होऊन हसणे, acting mimicry करण्याने, बालिश आवाज काढण्याने त्यांच्यासोबत त्यांच्या सारखे बनून राहिल्याने serotonin देणगी मिळते…… सगळंच स्वर्गसूख
मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करते ज्या ज्या जणांनी वेळ काढून हा लेख इतपर्यंत वाचला आहे, फक्त आता एक खूप महत्त्वाचे की लेखातली माहिती फक्त काही शब्द आणि information म्हणून न घेता मनातून अतिशय गांभीर्याने वाचून त्यातील concept समजून घेवून, दैवी महत्व लक्षात घेवून आपापल्या रोजच्या दिनक्रमात जीवनशैली त कायमस्वरूपी काही सांगित ल्या प्रमाणे व्यायाम, आहार आणि sunexposure हे badaतरी ताबतोब करा.
मला सांगा आता हा लेख वाचून त्यानंतर ही कोणाला व्यायमा साठी, पौष्टिक अहारा साठी कोवळ्या उन्हात फिरण्या साठी योगा ध्यान धारणा साठी मागे लागावे लागेल का????
नाही…. कारण आता व्यायाम करण्या च्या नावाने ज्यांना कंटाळा येतो त्यांनी योगा ध्यान धारणा आणि पौष्टिक आहार निसर्ग भटकंती च्या नावाने चेहऱ्यावर आळस वजा अठ्या येत असतील त्यांनी मी वर सांगितलेल्या पेशंट प्रमाणे डिप्रेशन च्या phase मधील स्वतः ला ठेवून बघायचे…… मान्य असेल तसे आपल्या सोबत होणे तर खुशाल आराम करू देत एकाच जागी बसून……
जबाबदारी घेवू यात फक्त सगळ्याची….. स्वतः च्या अवस्थे साठी दुसऱ्यांना blame किंवा दोषी नाही ठेवायचे कधीच….. यापुढे
आज मी आपणा सर्वांनांना आपापल्या अंगणात च आनंदाचे झाड कसे लावायचे हे साध्या सोप्या समजेल अशा भाषेत सांगितले….. नक्की लावून बघा हे झाड (म्हणजेच serotonin वाढविणारे घटक follow करा )
कधीच आनंद कमी नाही पडणार खात्री देऊन सांगते.
Alexithymia आणि Depression या सारख्या किचकट, अवघड आणि गंभीर आजारापासून तर नक्कीच आयुष्यभर सामना नाही होणार मग आपला.आशा आहे आपण सर्वांना लेख माहितीपूर्ण वाटला असावा आणि छोटी शी का होईना मदत या लेखातून झाली असेल.
लेखा चा शेवट जगतगुरू तुकाराम महाराजां च्या या उत्कट अभंगाने करूयात
“आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥”
हा परम्यातम्या शी एकरूपते विषयी आहे पण आनंदाची व्याख्या किती उत्कट आहे जे serotonin देते बरं आपल्याला.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chhan all goshte Tumhi mandlya. He Lokana kalate pan. Jasat karun shree.tela Satata techaya atale Aaiche kalaji asate te techya Atalya Aaila Baykola. Sunela ashi barecha Nate Jivanata thevyache astata ani Mhanun te sawtala Visrun Jate. Pan sawtala lakshata thevale tar. Saglyache te Neet kalji ghenar he tela Nahi kalata. Pan tumhala🙏🙏👏👏💐💐
Super heart touching article. Very useful information.