तुमच्या फिलिंग्स तुम्ही एका ठराविक ठिकाणी वाया घालवत आहात हे कसे ओळखाल?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
रडु येणं काही वाईट नाही, पण आपण का आणि कोणासाठी रडतोय हे देखील तितकच महत्त्वाचं आहे
कारण एका क्षणानंतर आसव देखील डोळ्यातून बाहेर येण्यास कंटाळा करतात..
असा एक टप्पा आपल्या आयुष्यात येतो जेव्हा जेव्हा आपल्याला याची जाणीव होत की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीसाठी आपण इतकं सर्व केल त्याचा काही फायदा नाही. त्यातून काही साध्य झालं नाही. पण या सर्वाची जाणीव काही लगेच होत नाही. त्याआधी आपण खूप काही गोष्टी केलेल्या असतात. माणूस म्हटल्यावर भाव, भावना या आल्याच. भावानहीन माणूस असत नाही. आणि आपल्या आयुष्यात, आपल्या वयाच्या एखाद्या टप्प्यात होतच की आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी मनात फिलिंग्स निर्माण होतात. ती व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास हवाहवासा वाटतो, तिची मैत्री हवी असते, बरीच जण त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहतात. अस होत आपल्याला एखादी व्यक्ती,तिचे गुण भावतात आणि आपल्याला ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग व्हावी अस वाटते. त्यासाठी आपण प्रयत्न पण करू लागतो.
मग त्या माणसाशी बोलण असुदे, तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी केलेली धडपड असुदे. आपल्याला जमेल ते आपण करतो. आता एखाद्या व्यक्तीविषयी मनात फीलिंग्ज निर्माण होण, आकर्षण वाटणं यात काय चूक किंवा वेगळं अस नाहीये. अस वाटू शकत. कारण अनेकदा अस होत की आपल्या मनात एखाद्या विषयी चांगल्या भावना असतात पण त्या योग्य वेळी, योग्य ठिकाणी व्यक्त न केल्याने नात तयार होत नाही, गोष्टी तश्याच अव्यक्त राहतात कारण वेळ कोणासाठी कधी थांबत नाही. मराठी मधील ती सध्या काय करते ही मुव्ही याच उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या मनातलं एखाद्या पुढे व्यक्त करण यात काही चूक नाही. उलट आपल्याकडून काहीतरी राहून गेलं अस तरी वाटत नाही.
पण म्हणून एखाद्यासाठी किती प्रयत्न करावेत याला देखील मर्यादा आहेत. आपण सतत एका दिशेने प्रयत्न करतोय काहीतरी करू पाहतोय आणि तरी समोरून काहीच प्रतिसाद येत नसेल तर इथे विचार केला पाहिजे की आपण करतोय ते योग्य का? खरच यातून काही निष्पन्न होत आहे का? आता कोणतीही गोष्ट लगेच कळत नाही. आणि या बाबतीत तर आपण बऱ्याचदा वेगळ्या झोन मध्ये असतो. आपल्याला ती व्यक्ती आवडते म्हणून आपण काही ना काही करत राहतो. तिथे असा विचार डोक्यात सहसा येत नाही आणि आपल्याला समजत देखील नाही की आपण करतोय ते योग्य आहे की नाही. हेच समजण्यासाठी आपल्या वागण्याकडे त्या व्यक्तीशी आपली जी देवाणघेवाण, संवाद असेल त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचं आहे. अश्या काही छोट्या छोटी गोष्टी घडत असताना ज्यांना आपण दुर्लक्ष करतो. त्यांनाच पाहणं, त्यांचा विचार करण गरजेच असत. त्या कोणत्या ते पाहू:
१. तुम्ही जितकं देता तितकं तुम्हाला मिळत नाही: नात हे देवाणघेवाणीतून विकसित होत असत, भक्कम होत असत. ही देवाणघेवाण कसली? तर प्रेमाची असेल, मैत्रीची असेल, विचारांची असेल, सोबतीची असेल. म्हणजे जे काही आहे ते एकमेकांसाठी केलेलं असत. दोघांचही त्यात तेव्हढ योगदान असत. तर ते खर healthy नात म्हणता येत. पण आपण एकटेच सर्व काही करतोय, समोरून तसा काहीच प्रतिसाद नाही. आपण जितकं देतो मग त्यात वेळ पण येते की पुन्हा येत पण नाही त्या बदल्यात आपल्याला काहीच मिळत नसेल तर इथे आपण विचार केला पाहिजे.
२. ती व्यक्ती सारखी येते जाते: ज्या माणसासाठी आपण धडपडत असतो, ज्याच्यासाठी आपण आपली काम बाजूला टाकतो, तिला महत्त्व देतो, ती कधी आपल्यासोबत पूर्णवेळ असेल तर कधी न सांगता पण निघून जाते. जसं आपण त्या माणसाला आपल्या आयुष्यात स्थान दिलेले असते, महत्त्व दिलेले असते तसे तिच्याकडून जाणवत नाही. वाटेल तेव्हा बोललं, बोललच नाही अस होत असेल तर हे एक साईन आहे.
३. आपण त्या व्यक्तीच्या प्राध्यानक्रमात नाही: जेव्हा आपण समोरच्याला महत्त्व देतो तेव्हा तिचं स्थान आपल्या प्राध्यान्य क्रमाच्या यादीत वर असत. आपण त्या नादात बाकीची काम, बरेचदा नाती देखील बाजूला ठेवतो. पण तस समोरून काहीच येत नाही. त्या व्यक्तीच प्राध्यान वेगळच असत. त्यातून कधी वेळ मिळाला तर ती व्यक्ती आपल्याकडे येत असेल तर आपण विचार केला पाहिजे की आपण योग्य करत आहोत का?
४. आपण एक करमणूक बनून जातो: ज्या व्यक्तीशी आपण नात जोडू पाहत असतो, जिच्या विषयी आपल्या. मनात प्रामाणिक भावना असतात तिच्याशी आपण दोन मिनिटे बोललो तरी आपल्याला बर वाटत. त्यासाठी आपण आसुसलेले असतो. पण तस पलीकडून होत नाही. आपण बऱ्याचदा एक करमणूक, वेळ घालवण्याच साधन बनतो. म्हणजेच काय, आपल्याला जेव्हा त्यांच्याशी बोलवस वाटत, वेळ घालवावासा वाटतो तेव्हा ते कधीच हजर नसतात. पण तेच जर त्यांना कंटाळा येत असेल, वेळ जायला हवा असेल म्हणून ते बोलू पाहत असतील तर ही आपल्यासाठी एक चेतावणी आहे.
५. सिरीयसनेस नसतो: आपण जिथे नात भक्कम करू पाहत असतो, काहीतरी नाव देऊ पाहत असतो तिथे ती व्यक्ती मात्र तात्पुरत्या आनंदासाठी बसलेली असते. ती या नात्यासाठी गंभीर नसते की तिने कधी तसा विचार केलेला असतो. अनेकदा याबद्दल विचारल्यावर टाळाटाळ केली जाते.
या काही गोष्टी ज्या आपण ओळखल्या पाहिजेत, त्यांचा विचार केला पाहिजे आणि नंतर ठरवलं पाहिजे की आपण कोणासाठी किती फील करावं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खूप छान
खूप छान