Skip to content

तुमचा प्रॉब्लेम लोकांच्या वागण्यावरून वाढत असेल तर स्वतःला असं शांत करा.

तुमचा प्रॉब्लेम लोकांच्या वागण्यावरून वाढत असेल तर स्वतःला असं शांत करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या एकंदरीत आयुष्यात आपण वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या आयुष्यात येत असतात, बऱ्याच जणांशी आपली नाती तयार होती. मग त्याची कारण वेगवेगळी असू शकतात, ती नाती वेगवेगळी असू शकतात. पण आपण एका समाजाचा भाग म्हणून राहत असल्याने माणसांशी सामना हा होतोच. आपण ती कितीही टाळायचा म्हटला तरी तस होत नाही. आपण पूर्णपणे एकटे कधी असत नाही.

माणसं ही येत जातं असतातच. त्यांच्याशी आपली देवाणघेवाण होत असते आणि जिथे माणसं आली तिथे त्यांचे स्वभाव आले, त्यांच्या वेगवेगळ्या प्रवृती आल्या. गरजेचं नाही एक माणूस आपल्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याच पद्धतीने दुसरा माणूस वागेल. हे शक्य देखील नाही. कारण प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी असते. त्यावर त्यांचं वागणं ठरतं असत. अगदी घरातल्या घरात देखील आपलं प्रत्येकाशी वेगळं असत. सर्व रक्ताची नाती असली तरी आपलं खूप छान जमत किंवा पटत अशी एक कोणतरी व्यक्ती असते. ज्या माणसाशी आपण सर्व काही शेअर करत असतो.

आपलं माणसांशी जमत केव्हा? जेव्हा त्यांचा स्वभाव त्यांच वागणं आपल्याला पटत, आवडत. अश्या लोकांमध्ये वावरायला आपल्याला आवडत. त्यांच्याशी नात तयार करायला टिकवायला आवडत. पण हे सर्वांच्या बाबतीत होत नाही. जसं म्हटल प्रत्येकाचा स्वभाव, वागणं वेगळं असत. ते आपल्याला रूचेलच अस नाही. आणि अशी माणसं पण आयुष्यात असतात. कारणं कदाचित वेगळी असतील पण ही लोक असतात. जी अनेकदा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण करतात. त्यांचं वागणं अस असत की त्यातून गोंधळ निर्माण होतो, आपण गोष्टी नीट करायला गेलो तरी अजून समस्या निर्माण होतात. मग ते नात्यांच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबत असेल. कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अशी माणसं आपल्याला भेटतात जी समस्या निर्माण करतात.

एका टप्प्यानंतर आपल्याला याचा त्रास होऊ लागतो. या लोकांना पूर्ण टाळता पण येत नसत. यातून आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. चिडचिड होते, राग येतो. अनेकदा स्वतःवरचा ताबा सुटतो. आपल्याला जरी माहीत असले की आपण अस वागून आपलाच त्रास वाढवून घेतोय तरी देखील त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही. कामाच्या ठिकाणी अशी कोणतरी व्यक्ती बऱ्याचदा असते जी आपल्या मार्गात अडथळे आणत असते, समस्या निर्माण करत असते. आता अश्या माणसांना आपण पूर्णपणे टाळू पण शकत नाही. कारण आपण तिथे काम करत असतो. नातेवाईक असतात ज्यांचा बऱ्याचदा आपल्या आयुष्यात नको तितका हस्तक्षेप असतो. रोजच्या आयुष्यात वावरताना पण अशी काही माणस भेटतात ज्यांच्याशी आपला तसा परत संबंध येणार नसतो तरी काहीतरी घडतच.

हे अस सर्व होत असताना आपण स्वतःला कसं शांत ठेवायच हे आपल्याला अनेकदा समजत नाही. कारण एकसारख्या अश्या घटना घडू लागल्या तर आपली काहीतरी प्रतिक्रिया येतच असते. जी आपल्याला नंतर जाऊन त्रासदायक ठरते. त्यामुळे या परिस्थितीला कसं सांभाळायचं, स्वतःला कसं सांभाळायचं जे समजत नाही. तर अश्या वेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल करणे. जरी समोरच्या व्यक्तीने नीट वागाव आपल्याल अपेक्षित असल, जरी आपल्याला माहीत असले की चूक त्यांची आहे तरी आपण त्यांनी आपल्याच मनाप्रमाणे किंवा आपल्याला हवं तसच वागावं असा आग्रह धरू शकत नाही.

कारण तस होत नाही म्हणून आपल्याला त्रास होतो. आपण कोणालाही कंट्रोल करू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण आपल्या पद्धतीने त्या परिस्थितीवर प्रभाव टाकायचा प्रयत्न करू शकतो? तो कसा तर त्या माणसाशी शक्य तितका कमी संपर्क ठेवणे, किंवा आपल्याला माहीत आहे ही व्यक्ती आपल्या समस्या अधिक वाढवू शकते तर अश्या व्यक्तीशी अश्या कोणत्याही गोष्टी शेअर न करणे, assertively म्हणजेच ठामपणे बोलणे, विश्वास ठेवून अश्या जबाबदाऱ्या न देणे ज्यातून पुढे जाऊन गोष्टी बिघडतील. अश्या पद्धतीने आपण आपल्या पातळीवर आपल्या शक्य होतील तसे वेगवेगळे मार्ग अवलंबू शकतो.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण स्वतः ला एक प्रश्न विचारला पाहिजे की या प्रसंगात माझ्यासारखे अजून १००माणसं असती तर त्यांनी काय केलं असत? सर्वच माझ्यासारखे वागले असते का? नाही. का? कारण प्रत्येकजण वेगळा विचार करतो. याचा अर्थ ती माणसचं पूर्णपणे आपल्या त्रासाच कारण नाहीत आपले विचार देखील आहेत. त्यांनी समस्या निर्माण नक्की केल्या असतील पण त्या आपण आपल्या डोक्यात वाढवतो ज्याचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपले विचार बदलले पाहिजे. आधी म्हटल तस आपण कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे लोक वागायची तस वागणार. आपल्या हातात आपलं वागणं आहे. ते कसेही वागले तरी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो कारण त्यातून नंतर आपल्याला काही त्रास होणार नाही.

शेवटच म्हणजे आपल्या शरीरावर ताबा मिळवणे. अश्या वेळी बरेचदा आपल्या शरीरात बदल होतात. त्यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम करणे, mindfullness सारखे व्यायाम जे आपल्याला स्वतःवर ताबा ठेवायला मदत करतात.

अश्या पद्धतीने आपण स्वतः ला शांत करू शकतो. आणि हे सर्व आपण आपल्या आंतरिक शांतीसाठी, यशासाठी करत आहोत. दुसऱ्यांमध्ये बदल व्हावा म्हणून नाही. कारण ते दर वेळी शक्य होत अस नाही. आपल्या हातात स्वतः कसं वागावं याची निवड शेवटपर्यंत असते. त्याप्रमाणे आपण वागलो तर नक्कीच आपला त्रास कमी होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “तुमचा प्रॉब्लेम लोकांच्या वागण्यावरून वाढत असेल तर स्वतःला असं शांत करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!