तुमचा मनस्ताप आता वाढणार आहे, हे या ६ लक्षणांवरून ओळखा.
टीम आपलं मानसशास्त्र
माणूस म्हणले की सुख , दुःख , त्रास , मनस्ताप सगळे आलेच. काही वेळेस काही तरी चांगले करताना खूप challenges असतात. ती स्वीकारून पुढे यश मिळविताना खूप आनंद होतो. तर काही गोष्टी करताना अनेक अडचणी येतात. कामे होता होता कुठे ना कुठे अडकत जातात. मनस्ताप वाढत जातो.काम एवढेसे असते पण मनस्ताप मात्र वाढत जातो.आणि काम धड होत नाही.
तुमचा मनस्ताप आता वाढणार आहे हे या ६ लक्षणांवरून ओळखा.
१. अडथळे येणे : –
एखादे काम हाती घेतले असावे . ते तडीस नेण्याचा प्रयत्न सुरू असतो . पण सतत अडथळे येत असतात. तेव्हाच समजून येते की यात मनस्ताप जास्त आहे. किंवा ते छोटे छोटे अडथळेच मनस्ताप वाढवणार हे लक्षात येते.
जे काम किंवा इतर गोष्टी बाबत आहे तेच नात्या बाबत ही. नात्यात काही छोटे मोठे खटके उडत असतील. तर लक्षात घ्यायचे की कुठे तरी मनस्तापाची सुरुवात आहे. आणि तो मनस्ताप हळूहळू वाढत जाणार आहे.
२. नवरा बायको मध्ये बायकोने संशय घेणे , नवऱ्यावर अविश्वास दाखविणे , सतत रखरख करणे, टोमणे मारणे :
नवरा बायकोचे नाते खरे तर विश्वासाचे. प्रेमाचे , आपुलकीचे , समजुतीचे , ओढ लावणारे असते. वाद होतात पण ते क्षणिक. ते विसरून पुढे जायचे असते. पण सतत बायको नवऱ्यावर लक्ष ठेवून असेल, संशय घेत असेल, किरकोळ गोष्टीवरून वाद घालत असेल , वादाचे परिणाम शारीरिक संबंधांवर होत असतील तर समजून जावे की बायकोसोबतच्या चांगल्या आणि जवळच्या लोकांच्या ही नात्यात मनस्ताप वाढणार आहे.
३. कामात चुका होणे , एकाग्रता न होणे : – कामात मन एकाग्र करता येत नसेल. सतत चुका होत असतील तर हे लक्षण ही तुमच्या कामात मनस्ताप वाढण्याचे आहे. कारण ते काम धड होत नाही आणि परत परत वाढत जाते. आणि त्यातून वेळ , energy ही खर्च होते आणि मनस्ताप वाढतो.
४. धोका , दगा , विश्वासाला तडा : –
एखाद्यावर पूर्ण विश्वास टाकून आपण आपल्या काही खास गोष्टी शेअर करतो , एखादी गोष्ट विश्वासाने सांगतो. कधी गरज असेल त्याने मागितले तर त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याला पैसे देतो. पण गरज संपल्यावर तीच व्यक्ती विसरून जाते तिला मदत केली होती. पैसे परत द्यायची आठवण केली की टाळू लागते. आणि वरती मी काय कुठं पळून जाणार आहे का , एव्हढा विश्वास नाही का माझ्यावर हे असे बोलणे. यातून समजून जाते की आपण आपले समजून केलेली मदत , टाकलेल्या विश्वासाला तडा जावून मनस्ताप मात्र वाढत जाणार आहे.
५. चिडचिड वाढणे , बडबड करणे :
ज्या गोष्टीत, नात्यात मनस्ताप वाढू लागतो त्यात चिडचिड वाढू लागते. उगीच बडबड केली जाते. सतत राग राग होतो. आपले स्वतः वरचे नियंत्रण आपण गमावून बसतो.
उदा. लग्न म्हणजे दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र येण्याची संधी. मन आणि शरीर या दोन्हीत. लग्न केले आणि बाकी गोष्टीत बायको खूप छान साथ देते मात्र शारीरिक संबंध म्हणले की तयार होत नाही .तर नवऱ्याची चिडचिड वाढत जाते. लग्न करून ही जे सुख पाहिजे ते मिळत नाही म्हणून अस्वस्थता वाढते. लग्न करून आपणच आपला मनस्ताप वाढवून घेतला असे होते.
६. मनस्थिती बिघडणे : मानसिक संतुलन बिघडते :
नाती असोत काम असो त्यात काही अडचणी येत गेल्या , वाद होत गेले , संकटे येत गेली, समजून घेण्याची क्षमता संपत गेली तर ताण , तणाव वाढत जातो , निराशा वाढते, नकारात्मकता वाढते. यातून मनस्थिती बिघडत जाते. ते काम करण्याची इच्छा संपते. तरी ही त्यातून पुढे कान करायला गेलो तर काही तरी बिघडत जाते. आणि मनस्ताप वाढतो.
नात्यात ही असे होते चांगले चालले असते आणि कुठ तरी काही तरी बिघडत जाते. ती नाती सुधारण्याचा प्रयत्न करायला गेलो तर अजून जास्त बिघडत जातात. आणि आपण चांगले प्रयत्न करतो तरी असे बिघडत जाते मग आपला मनस्ताप अजून वाढत जातो.
काही वेळेस आपण मनस्ताप टाळू शकत नाही. पण मग शांत राहून , संयम ठेवून आहे त्या गोष्टीचा स्वीकार करावा. आणि मनाला हे बजावून सांगावे की ही तात्पुरती परिस्थिती आहे. ती बदलणारी आहे. Temporary गोष्टींच्या करिता त्रास करून घ्यायचा नाही. हे rotation आहे. दुःख, त्रास तात्पुरते आहेत उद्या ते रोटेशन बदलून सुख , आनंद येणार आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे. क्षणिक गोष्टींच्या त्रासामुळे मनस्ताप करून घेण्यापेक्षा शांत राहून त्याचा स्वीकार करा आणि हळूहळू परिस्थिती बदलणार आहे आणि बदलण्याकरिता प्रयत्न करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Nice article
लेख फारच सुंदर आहे
आजच जग हे फार स्वार्थी आहे माणूस हा आत्मकेंद्रीत होत चालला आहे त्यामुळे मनस्ताप कमी करायचा असेल तर आपले मन देव सोडून कुणा जवळही मोकळे करु नका