तुमचा एखादा शारीरिक आजार अजूनही बरा न होण्याची मानसिक कारणे वाचा.
टीम आपलं मानसशास्त्र
बरेचवेळा काय होते की शारीरिक आजारावर योग्य उपचार सुरू असतात. औषधे ही एकदम उत्त्तम्मोत्तम सुरू असतात. बऱ्याच व्यक्तींना , रुग्णांना औषधांचा फायदा होवून त्यांचे आजार पण बरे होतात. पण एखाद्या व्यक्तिबाबत असे होते की काही ही करा , डॉक्टर बदलून बघितले , औषधे बदलून बघितली , मग alopathy , homeopathy , आयुर्वेदिक कोणतेही औषध घेतले , हवा बदल म्हणून कुठे गेले तरी ही त्या रुग्णाचा तो शारीरिक आजार बरा होत नाही . मग याच्या मागे मानसिक कारणे असतात का ? तर नक्कीच असतात. मग ती मानसिक कारण काय ते बघुयात .
१. नकारात्मकता :-
बरेचदा रोग असतो एवढासा ..किंवा जरी सहज .दुखणे किंवा आजार दुखणे कमी होत नाही.यामागे कारण असते आपली नकारात्मकता. रुग्णाच्या मनाने ठरविलेले असते की मी आता यातून बरे होणारच नाही. किंवा आता हे सहन होत नाही. बरे होणारे दुखणे नाहीच.
त्यामुळे ही नकारात्मकता अजून जास्त वाढते आणि दुखणे बरे ही होत नाही. कधी वाढते तर कधी आहे तसेच रडत खडत ..
यामुळे होते काय की सततची नकारात्मकता तुमच्यातली positivity हिरावून घेते. आणि मग बरे होत नाही ..होणार नाही हेच नकारात्मक विचार वाढीस लागून खरेच दुखणे बरे होत नाही.
२. मनावरचा सततचा ताण , स्ट्रेस :
सततचा मनावरचा ताण , स्ट्रेस , कामाचा ताण असेल , कौटुंबिक , नात्यामध्ला ताण असेल , आर्थिक ताण तणाव असेल तरी ही यातून रुग्ण कितीही चांगले औषध घेत असेल तरी रुग्ण लवकर बरा होत नाही.
किंवा थोडे दिवस थोडे बरे असते तर अचानक ताण वाढला की परत सगळी शारीरिक चक्रे बिघडत जातात.
३. एकटेपणा, कौटुंबिक नात्यात कलह , introvert वृत्ती , स्वभाव :
व्यक्ती जेव्हा एकाकी असते. एकटेपणा चा अनुभव घेत असते. कौटुंबिक नात्यात कलह असतो. किंवा कोणाला कोणाची काहीच फिकीर नसते. एखाद्याची वृत्ती introvert असते त्यामुळे आपले त्रास , दुःख , वेदना या मोकळ्या केल्या जात नाहीत. ते आपल्या मनात ठेवून, साठवून राहिले जाते.
कोणीच जवळचे नसते की शरीराची आणि मनाची यातना त्यांच्या समवेत शेअर करता येईल. मन हलके करता येईल , होईल असे कोणीच जवळचे नसते. समजून घेणारी नसतात. त्यामुळे ही बरेचवेळा शारीरिक त्रास , दुखणे , यातना ही कोणाला सांगता येत नाहीत. आणि मन तेवढे साथ देत नाही.
असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती आपले त्रास इतरांच्या सोबत शेअर करते तेव्हा मन हलके होते आणि दुखणे ही कमी होवून लगेच बरे वाटायला लागते.
पण जेव्हा आपल्याशी मोकळेपणाने बोलणारे कोणी नसते. कुकरच्या कोंडलेल्या वाफे सारखी अवस्था कायम असते.
यातून आपले दुखणे ही कोणाला सांगणे होत नाही. आणि मग शारीरिक दुखणे ही लवकर बरे होत नाही.
४. विल पॉवर कमी पडणे. ..मानसिक इच्छाशक्ती कमी पडणे : मानसिक support लाभत नाही :
आपल्याला झालेले शारीरिक दुखणे खूप त्रासदायक आहे. आणि आता आपण बरे होणार नाही ही मानसिकता वाढते. आणि मग विल पॉवर कमी पडते.
जावू दे हे रोजचे च दुखणे झाले. ते आता असेच चालू राहणार असे विचार येत रहातात. आणि मानसिक इच्छाशक्ती हळूहळू कमी होवू लागते.
अशावेळी मनाला उभारी देण्याकरिता इतर कोणाकडून ही मानसिक support लाभत नाही.
आपल्या मनानेच ठरवले जाते की आता आप्पण बरे होणार नाही. मनातून उदासीनता वाढत असेल तर खरेच मग बरे होण्याची मानसिकता च राहत नाही. आणि मग तो शारीरिक आजार ही बरा होत नाही.
५. निराशा , उदासीनता : – रोगाकडे बघण्याचा दृष्टीकोन जर निराशावादी असेल, उदासीन असेल तर रोग बरा होण्यापेक्षा वाढत जाईल. मनाने जर खचले तर त्या रोगतून लवकर बरे होत नाही.
याउलट थोडा जरी आशावाद असेल . हा त्रास लवकरच संपेल. किंवा आपण शारीरिक त्रासातून , व्याधी तून लवकर बरे होवू अशी प्रबळ इच्छा ..आपल्याला लवकर बरे करते.
पण माझ्याच मागे हा रोग लागला , मीच काय केले होते असे विचार करत राहिलो तर अजून निराशा येत जाते. आणि दुखणे वाढतेच.
६. आपल्या आजाराची इतरांशी तुलना : तोच आजार दुसऱ्या ही जवळच्या माहितीतल्या व्यक्तींना असेल आणि ती व्यक्ती तिच्या resistence पॉवर , आत्म बलावर लवकर बरी झाली आणि आपले आजारपण सुरूच असेल तर आपल्या रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. ती वाढवावी हे विचार डोक्यात येत नाहीत पण ती समोरची व्यक्ती नशीबवान आहे. तिचा आजार कमी आपल्यापेक्षा अशी कुठे तरी तुलना करण्यात वेळ घालवला जातो. किंवा इतर लोक सांगतील ते उपचार करत राहायचे कारण काय तर समोरच्याला त्या उपचारांनी बरे वाटले म्हणजे आपल्याला त्याच औषधांनी बरे वाटेल हे विचार आणि मानसिकता. डॉक्टर हे प्रत्येकाच्या प्रकृती नुसार औषधे देत असतात. आणि बरेचवेळा याकडे दुर्लक्ष होवून योग्य उपचार मिळत नाहीत . भलतेच उपचार करण्यात वेळ आणि मन गुंतत जाते. त्यातून ही शारीरिक आजार लवकर बरे होत नाहीत.
मन आणि शरीर हे दोन्ही ही निरोगी असतील तर शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. मन आजारी पडणे हे आता आता लोकांच्यात जागृती होवू लागली आहे.
सुलभा काकू कायम आनंदी , उत्साही असायच्या. अलीकडे त्यांचा उत्साह कमी होवू लागला होता. सतत पोट साफ न होणे , डोकेदुखी , अस्वस्थ वाटणे, तक्रारी सुरू होत्या. सर्वांना वाटत होते की शारीरिक तक्रारी मुळे त्यांच्यात बदल घडत आहेत. पण सगळे उपाय केले तरी तक्रार कमी होत नव्हती. तेव्हा मानसिक काही त्रास आहेत का हे बघा असे डॉक्टरनी सुचविले. त्यांना मानसोपचार तज्ञ यांस दाखवण्यात आले.
तेव्हा लक्षात आले की आता वयोमानानुसार रोजच्या गोष्टी करताना ही सुलभा काकूंना खूप स्ट्रेस , ताण पडतो. आणि मग सतत काळजी करत बसतात त्या .कारण पूर्वी जी सहज आणि वेळेत कामे पूर्ण करत त्या आता वयोमान झाल्याने तेवढ्या पटकन आणि सहज आणि त्याच वेळेत पूर्ण करता येत नाहीत. त्याचा ताण रोज त्यांच्या मनावर वाढत होता आणि त्यातून शारीरिक रोग निर्माण झाले होते. आणि औषधोपचार करून ही ते कमी होत नव्हते.
सांगायचे विषय काय तर मन आणि शरीर हे एकमेकांशी संलग्न आहे. मन बिघडले तर त्याचा शरीरावर ही परिणाम होतोच. आणि शरीरात बिघाड झाला तरी ही मनात बिघाड होतो. जसे दीर्घकालीन आजार , सततची औषधे घेवून ही आजारावर नियंत्रण राहत नाही याचे कारण मन कमकुवत होत जाते. नको नको तो आजार आणि दुखणे अशी स्थिती होते.
मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी मन आणि शरीर स्वास्थ्य राखा. रोज योगा , प्राणायाम , ध्यान धारणा , योगासने , शारीरिक व्यायाम जरूर करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

छान