तुमचं ऐकून न घेणाऱ्या व्यक्तींकडे अशा काही चुका असतात ज्या तुम्ही कधी केलेल्याच नसतात.
मेराज बागवान
आजचा लेख एका विशिष्ट मानसिकतेविषयी आहे.आणि ती मानसिकता म्हणजे, काही व्यक्ती तुमचे कधीच काहीच ऐकून घेत नाहीत आणि त्यांच्या मनात अशा काही तुमच्याविषयी समजुती असतात ,ज्या खरे तर तुमच्या विषयी नसतातच, किंवा तुम्ही तसे अजिबात नसतात.पण तरी देखील त्या व्यक्तींकडे तुम्हांला सांगायला अशा चुका असतात ज्या तुम्ही कधी केलेल्याच नसतात.
व्यक्ती मग त्या कोणीही असतील, तुमच्या घरातील, कुटुंबातील,मित्र परिवारातील,कार्यालयीन जीवनातील किंवा मग सार्वजनिक जीवनातील.यातील काही व्यक्तींना तुमचे विचार पटत नाहीत.त्यामुळे तुम्ही कितीही चांगले बोलायला गेलात तरी देखील ते तुमचे ऐकून घेत नाहीत. आणि जणू तुम्ही त्यांच्यावर जोर जबरदस्ती करीत आहात असे ते तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न करतात.पण खरे तर तुम्हांला त्यांची काळजी असते.पण ते हे सर्व काहीच समजून घेत नाहीत आणि मग तुमच्या नसलेल्या चुका ते दाखवून देतात.
काही अशा स्वभावाची, मानसिकतेची माणसे असतात ज्यांना स्वतःचेच खरे करायचे असते.ते थोड्या बहुत प्रमाणात आत्मकेंद्रित असतात.आणि मग मी म्हणेल तसेच अशी मानसिकता त्यांच्या मनात तयार होते.मग पुढे जाऊन याचे रूपांतर तुमच्या नसलेल्या चुका काढण्यात जाते.जसे की , ‘तुला काही तरी अपेक्षा दिसते आहे माझ्याकडून आणि म्हणून तू मला मदत करण्याचे नाटक करीत आहेस’ अशी धारणा त्यांच्या मनात होते.पण वास्तविकता तुम्ही चांगल्या मनाने त्या व्यक्तीला मदत करीत असतात.
कधी कधी तुम्ही एखाद्याशी इतके चांगले वागतात की समोरचा त्या चांगुलपणावर देखील शंका घ्यायला लागतो.ही देखील एक नैसर्गिक मानसिकता आहे.पण तुमच्यासारख्या कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात.पण त्यांचा हा चांगुलपणा ‘अति’ झाला की इतर व्यक्ती तुमच्यात नसलेल्या चुका देखील काढायला सुरवात करतात.
तुम्ही चांगल्या मनाने कोणालातरी सल्ला देतात. त्याचे चांगले व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतात.पण काही व्यक्तींना तुमच्याकडून मदत नकोच असते, मग ती त्यांच्या कितीही भल्याची असली तरी देखील.पण ते प्रत्यक्षपणे हे बोलून दाखवीत नाहीत. आणि मग तुम्ही जे काही प्रयत्न करीत आहात त्यावर ते शंका कुशंका घेतात आणि जणू तुम्हीच चुकीचे काही तरी करीत आहात, किंवा करायचे म्हणून करीत आहात असे त्यांना वाटते आणि मग ते तुमचे ऐकून न घेता फक्त कृत्रिम चुका दाखवून देतात.
तर अशी देखील मानसिकता , दृष्टिकोन , स्वभाब असणारी माणसे, व्यक्ती ह्या जगात आहेत.ज्यांना तुमचे ऐकून घ्यायचे नसते.पण हे ते प्रत्यक्षपणे सांगत नाहीत आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्यात नसलेल्या चूका तुम्हांला दाखवून देत असतात. अशा व्यक्तींना अनेकदा त्यांच्या त्यांच्या आयुष्यात च रमायला आवडते.थोडा फार हट्टीपणा, अहंकारी पणा त्यांच्यात असतो.
मग आता आपण कसे वागायचे? तर काही नाही, ही मानसिकता समजून घेऊन फक्त शांत राहायचे.कोणतीच जबरदस्ती करायची नाही.थोडा काळ जाऊन द्यायचा.त्यांच्या विश्वात त्यांना रमू द्यायचे.त्यांना कधी ना कधी तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी पटतात.आणि ते कृती देखील त्याच प्रमाणे करतात.मात्र तुम्हाला ह्या गोष्टी ते कधीच बोलून दाखवणार नाहीत.त्यामुळे तुम्ही फक्त विनाअपेक्षा राहायचे.वेळ सर्व काही सर्वांना दाखवून देतोच.अशा व्यक्तींसाठी देवाकडे नेहमी चांगली प्रार्थना करायची आणि जास्त विचार न करता आयुष्याचे एक एक पाऊल टाकत पुढे जात राहायचे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खरंच अश्या मानसिकतेची मानस समाजात आहे,खुप सुंदर👌🙏
Khup chan vatla