Skip to content

त्रासातून बाहेर पडल्यावर लक्षात येतं, नादात खूप साऱ्या गोष्टी गमावून बसलो.

त्रासातून बाहेर पडल्यावर लक्षात येतं, नादात खूप साऱ्या गोष्टी गमावून बसलो.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


कल्पना करा आपल्या हातात खूप साऱ्या वस्तू आहेत. एकेक करत आपण त्या कमी करत आहोत. पण काही ना काही राहत आहे. जसं जश्या वस्तू कमी होतात तस तस आपण हात बंद करत जातो. एक वेळ अशी येईल की आपल्या हातात वस्तू अशी काहीच नसेल पण तरीही आपला हात पूर्ण रिकामा आहे अस आपण म्हणू शकत नाही. अस का? कारण डोळ्यांना आपल्याला काही दिसल नाही तरी आपल्या मुठीत हवा ही असतेच. ती आपल्याला प्रत्यक्ष दिसते का? नाही. पण तरी तिचं अस्तित्व आपण नाकारून चालणार नाही. आपल्या आजूबाजूला अगदी काहीही नसल आपल्याला वाटलं जी सर्व काही रिकाम, क्लिअर आहे तरी ही हवा असतेच. तिने ती जागा व्यापली आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट पूर्णपणे जाते किंवा सपाट असते अस आपण म्हणू शकत नाही.

माणसाचं त्रासाशी असलेलं नातं काहीस असच आहे. असा कोणीही माणूस नाही ज्याला कसला त्रास नसेल. प्रत्येकाची त्रासाची तीव्रता, प्रकार, त्याची पातळी वेगवेगळी असू शकते. म्हणजेच जो त्रास लहान मुलाला होतो, ज्या पातळीवर होतो तो मोठ्या माणसाला कदाचित जाणवणार नाही. नुकत्याच तरुणपणात पाऊल ठेवलेल्या मुलांचा त्रास, त्यांची आव्हान वेगळी असतील जी त्यांच्या वयाला जितकी समजतील तितकी वेगळ्या वयाला पटकन समजणार नाहीत. आणि ही अशी गोष्ट आहे जी कोणामध्ये भेदभाव करत नाही. म्हणजे श्रीमंत असतील तर कमी गरिबांना जास्त अस काही यात नसत. ज्या त्या माणसाला त्याच्या त्याच्या पातळीवर काही ना काही सहन करावं लागतच. कमी जास्त होतच. पण त्रासविरहित, तणावविरहित माणूस असा कोणीही नसतो.

त्यामुळे त्रास हा सर्वांना असतोच. आपण त्याला सामोरे कसे जातो त्यातून बाहेर कसे पडतो यावर सर्व अवलंबून आहे. अनेकदा आपण आपल्या त्रासात इतके अडकून पडतो की तो त्रास म्हणजेच आपल्याला आपलं आयुष्य वाटू लागत. उदा. समजा आपल्या बोटाला काहीतरी जखम झाली आहे. आता त्या बोटाच्या जखमेला आपण हाताला झालेली जखम अस मानून बसलो तर काय होईल? बोट आणि हात यामध्ये फरक आहे ना! दोघांच्या त्रासामध्ये अंतर आहे. तुलना केली तर कोणती जखम लगेच बरी होईल, कोणत्या गोष्टीचा कमी त्रास होईल? तर बोटाचा. पण त्याला हात मानून बसल्याने तो त्रास पण वाढला आणि लवकर बर न होण्याची शक्यता पण वाढली. आपली अस्वस्थता वाढते ती याने.

आपल्या आयुष्यात जे काही अडथळे निर्माण होतात, आपल्याला जो काही त्रास होत असतो, मग तो शारीरिक, मानसिक, कौटुंबिक कोणत्याही पातळीवरचा असेल त्याला आपण तेवढंच ठेवत नाही. त्या त्रासाला आपण आपलं आयुष्य मानून बसतो. मला आता अमुक एक त्रास जाणवतो आहे अस न म्हणता आपल्या तोंडून अनेकदा काय येत? माझं आयुष्य म्हणजेच एक प्रोब्लेम होऊन बसलं आहे. आता अस म्हणून आपण आपल्या त्रासातून बर होण्याच्या ज्या काही शक्यता असतात त्याच नाहीश्या करून टाकतो. त्या नसतात अस नाही. आपण आपल्या त्रासात जास्त अडकुन पडतो, त्याने स्वतः ला व्यापून टाकतो. कधीकाळी आपण अश्या गोष्टींना सामोरे गेलेले असतो, आपल्याकडे त्रासातून बाहेर पडण्याची क्षमता असते, आजूबाजूला मदत करायला माणसं असतात, सुविधा असतात पण आपल्याला या सर्व गोष्टी त्रासातून जात असताना जाणवत नाहीत, दिसत नाहीत.

यातून होत अस की एका त्रासातून आपण बाहेर तर पडतो. कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नसते. तो एक काळ असतो जो सरतो. त्यातून जे उरत जे निर्माण होत ते आयुष्य असतात. आपण आपल्या त्रासाची तीव्रता वाढवून, पातळी वाढवून त्यातून नंतर कधीतरी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या लक्षात येत की आपण या नादात किती गोष्टी गमावल्या. जसं आधी म्हटल त्रास हा काही फक्त शारीरिक मानसिक असत नाही. तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो. पण त्या त्रासातून जात असताना आपण आपलं एकंदरीत आयुष्य कुठेतरी हलवतो. बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी जाणवतात. आता यातून बाहेर पडण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. पण या गोष्टीचं टेन्शन घेत कित्येक जण ड्रिंक करतात, स्मोक करतात. कामाचा ताण असला की अनेकदा त्याचा राग घरी निघतो. भांडण होतात, वाद होतात. त्रासाची ही जी मुळ कारण आहेत ती कधीतरी कमी होतातच. ती राहत नाहीत. पण त्या नादात व्यसन केलेलं असत त्याचा परिणाम कशावर होतो? आरोग्यावर. भांडण, वादावादी यातून नाती खराब होतात.

एक गोष्ट नीट करताना जर अजून चार खराब होत असतील तर आपल्याला इथे विचार केला पाहिजे. जो काही त्रास असेल त्याला योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशी कोणतीच समस्या नसते ज्याला उत्तरं नसत. आपल्याला ते मिळत फक्त त्याची तीव्रता आपण वाढवायची नाही. त्याला तेवढच महत्त्व देऊन, प्रसंगी एखाद्याची मदत घेऊन आपण त्यातून बाहेर पडायचं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “त्रासातून बाहेर पडल्यावर लक्षात येतं, नादात खूप साऱ्या गोष्टी गमावून बसलो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *