Skip to content

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपण एका समूहाचा भाग आहोत, एका समाजाचा भाग आहोत. त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी अनेक प्रकारच्या माणसांशी आपला संबंध येत असतो, आपला सामना होत असतो. एकमेकांच्या मदतीने, साहाय्याने व्यक्ती पुढे जात असते. एक चांगला समाज यातूनच तर तयार होत असतो. आपण फक्त आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन इतरांचा विचार करतो यातून एक विस्तारित असे कुटुंब तयार होत असते, परस्परावलंबन तयार होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणतात ते यासाठीच.

इतरांचा विचार करतो म्हणजेच काय करतो? तर त्यांच्याप्रती संवेदनशील बनतो. माझ्या माणसांसोबत काही होत असेल तर मला त्रास होउच शकतो, मी त्यांच्या मदतीला जाणारच आहे. पण जे माझ्या ओळखीचे नाहीत, ज्यांना माझी एक माणूस म्हणून गरज आहे तिथे मी त्यांच्या कामी येतोय का? त्यांच्या सुख दुःखाने मला फरक पडतोय का? पडत असेल तर ते संवेदनशील बनणे आहे, empathetic होणे आहे. जेव्हा आपण असे बनतो तेव्हा आपण काही न सांगताही आपल्याशी लोक जोडली जातात.

आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक लोक आपण पाहिली असतील ज्यांना आपल्याला काही मदत हविये हे सांगावं लागत नाही. आणि हे खर माणूसपणाच कौशल्य आहे. कारण सांगून कोणीही मदत करत. न सांगता जेव्हा आपल्यासाठी कोणतरी धावून येते तेव्हा ती खास बनते. त्यामुळे आपल व्यक्तिमत्त्व अस असल पाहिजे की आपण जाऊ तिथे लोकांना आपली गरज भासली पाहिजे. आताचा काळ असा की “water water everywhere and not a drop to drink.” म्हणजेच काय तर तस पाहायला गेलं आपण अनेक माणसांनी गजबजलेल्या जगातच वावरत आहोत.

प्रत्यक्ष पाहता तस कोण एकट दिसून येत नाही. पण तरीही सर्वांनी भरलेल्या या जगात माणूस का एकटा होतोय? का एकटा पडतोय? कारण माणसं असूनही ज्याच्याकडे मन मोकळं करावं, ज्याला हक्काने मदतीची साद घालावी अशी माणसं खूप कमी झाली आहेत. त्यामळे माणसं असून माणूस एकटा पडला आहे. हे अस का होतय? कारण संवाद कमी झालाय, ऐकण जे आहे ते कुठेतरी कमी झालय. लोकांना एकमेकांच साधं बोलण ऐकायला वेळ नाही. मदत तर फार लांब गोष्ट राहिली.

त्यामुळे लोकांमध्ये आपली गरज निर्माण होणार कधी? लोक आपल्याकडून मदत मागणार कधी? जेव्हा तुमचं व्यक्तिमत्त्व तस असेल. दुःखाच्या सावटावर आपल्याला मलमाच हसू सावकाश लावता आलं पाहिजे. लोकांच्या चेहेऱ्यावर आपल्याला हसू आणता आला पाहिजे. अशी लोक असतातही, जी आपल्यासोबत असली की आपल्याला आनंद होतो, ती आपल्यासोबत असावीत अस आपल्याला वाटत. का? कारण त्यांचं वागणं बोलणं तास असत. त्यांच्या असण्याने वातावरणात एक चैतन्य येत. तस आपण असल पाहिजे. आपण कोणाला कितपत मदत करू शकतो, आपली क्षमता काय आहेत या सर्व पुढच्या गोष्टी आहेत.

पण किमान आपण त्या माणसाचं बोलण नीट ऐकून घेतोय यातच त्या माणसाला खूप समाधान वाटत असत. आणि ऐकून घेणं ही साधी गोष्ट नाही, ती सर्वांना जमते अस पण नाही. माझ मन मोकळं करायला कोणीतरी अशी व्यक्ती आहे ही भावना खूप समाधान देणारी आहे. त्यातून त्या माणसाला अर्ध बर वाटत. आणि अश्या माणसाची इतरांना गरज असते. गरज सरो वैद्य मरो अशी जर आपली वृत्ती असेल तर इतरांना आपली गरज लागणं बाजूलाच राहील आपल्यालाही कोणी मिळणार नाही.

म्हणूनच काही न करता फक्त आपल्या वागण्या, बोलण्यातून मी आहे इतकी जाणीव इतरांमध्ये करून दिली तुम्हाला समजणार पण नाही इतक्या लोकांना पावला पावलावर तुमची गरज भासेल. केवळ दुःखात फुंकर घालण्यासाठी नाही, तर त्यांच्या आनंद द्विगुणित करण्यासाठीदेखील.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!