पुरुषांनो, तिला कायम वर्तुळाबाहेरच राहू द्या, नाहीतर तुमचा आनंदी संसार उध्वस्त होईल.
आपलं मानसशास्त्र
पुरुष म्हणले की त्याला नावीन्य , विविधता आवडते हा स्वभाव असतो त्यांचा. अगदी स्वतः ची सुंदर, काळजी घेणारी , आनंद आणि सुख देणारी , शारीरिक संबंधात ही साथ देणारी अशी छान बायको असेल तरी ही एखादी दुसरी स्त्री आवडतेच. आणि तिला ही त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट जागा असते. पुरुषाच्या दृष्टीने तिचे ही महत्व असते. तिच्या अस्तित्वाला ही महत्व असते.
सगळेच पुरुष असे असतात असे नाही. पण ज्यांच्या आयुष्यात अशी एखादी जवळच्या मैत्रिणी पेक्षा ही जास्त जवळची स्त्री असते. मग ते मन आणि शरीर या दोन्ही गोष्टीत एक वेगळे नाते जुळले असते. मन आणि शरीर दोन्ही याच करिता कारण स्त्री आणि पुरुष दोघांच्या ही इच्छेने ते एक पाऊल पुढे गेले असतात. आणि तसे नसते तर परत परत ते संबंध आले नसते. एका कोणाची जर जबरदस्ती असती तर त्यांच्यात नाते किंवा संबंध कधीच निर्माण होणार नाहीत. एकदा वापर हो तिथे वापरच योग्य शब्द म्हणावा लागेल. एकदा वापर करून झाला की परत एकमेकांचे संबंध ही नसते आले. पण ज्या अर्थी परत परत संबंध येतात त्या अर्थी मन आणि शरीर यांची जवळीकता ही स्त्री आणि पुरुष यांच्या इच्छेने , संमतीने आलेली असते.
पुरुषांनो, तिला कायम वर्तुळाबाहेरच राहू द्या, नाहीतर तुमचा आनंदी संसार उध्वस्त होईल. असे का बरे वाटले ना ? हो याची कारणे बघुयात. विवाहित पुरुष असेल तर त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या या असतातच. त्याची कर्तव्य असतात. त्यात तो अडकून पडलेला असतो. जसे बायको , मुले ही नातेवाईक , आई वडील, समाज , कायदा याने एक बंधन निर्माण झाले असते. ते कधीच तोडता येत नाही. तिच्या जबाबदाऱ्या , मुलांच्या जबाबदाऱ्या ,वत्यांच्या विषयी कर्तव्य ही त्याला कायम पार पाडवी लागतात.
अशा वेळी दुसरी जी स्त्री आयुष्यात आली असेल तिला कायम एका वर्तुळा बाहेरच ठेवा याचे कारण तुम्हाला तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेणे शक्य नाही. दुसरे तिच्या बाबत सगळी कर्तव्य पार पाडणे ही शक्य नाही. कायदा , समाज , आई वडील , नातेवाईक किती ही झाले तरी तिला आपलेसे करून घेणार नाहीत.जरी तिचा स्वभाव चांगला असेल , तरी ही ती कायमच त्यांना परकी वाटेल किंवा त्यांचे मन खात राहते की हक्काची मुलाची बायको आहे, दोष मुलाचा नाही. हिचा आहे . ती स्त्री असून तिने त्याच्या संसारात का यावे.
म्हणजे तिला पैसे ,किंवा काही मालमत्ता पाहिजे असेल, शरीर सुख , संबंध यातून जवळीक करून आपल्या मुलावर त्याच्या सर्व गोष्टींवर ताबा मिळवायचा असेल हाच विचार केला जातो. आणि कायम समाज , सून , नातवंडे यांना ही घाबरून एक अंतर ठेवले जाते . जर ती स्त्री घरच्यांशी जवळीक करत असेल तर त्यांना अजून जास्त भीती वाटत असते. आणि भले तिच्या मनात कोणताही स्वार्थ नसेल तरी तो स्वीकार ही होणार नाही.
याउलट एखादी स्त्री खरेच स्वार्थी हेतूने पुरुषाच्या आयुष्यात आली असेल तर त्याचे आयुष्य बरबाद होईल आणि ती आपल्या मुलाचे , नवऱ्याचे सर्वस्व काढून घेईल ही भीती घरच्यांना असतेच.
त्या बाहेरच्या स्त्री विषयी घरी समजले तर बायको ही वाद घालत असते. भांडण करते , अंतर ठेवून वागत असते. तर कधी घटस्फोट या पर्यंत वाद जातील. आणि मुले असतील तर मुलांच्या करिता , त्यांच्या मनावर कोणते आघात होवू नयेत, मुलांना आई वडील दोघांचा सहवास मिळावा , संस्कार राहावेत. कुटुंब फुटू नये म्हणून तडजोड करून एका घरात राहीले तर नवरा , बायको यांचे संबंध नसतात. बोलणे नाही. पण मुलांचे संबंध चांगले असतात मुलांच्या करिता सर्व एकत्र करावे लागते.
केवळ गरजा पूर्ती करणे. त्यात नवरा बायको मध्ये भले नवऱ्याला असेल पण बरेचवेळा स्त्री ला आपलेपणा नसतो. ओढ नसते. ती शारीरिक संबंध ही नाकारते. याचे कारण स्त्री ही थोडी पझेसिव्ह असते तिला तिच्या आपल्या हक्काच्या गोष्टीत वाटा नको असतो .
अशावेळी पुरुष फक्त कर्तव्य करणारा राहतो . पैसा पुरवणे , गरजा पूर्ण करणे , कुटुंबाला संरक्षणदेण्यासाठी घर , गरजा पूर्ती मग शिक्षण , दैनंदिन खर्च , किंवा ऐशो आराम देणे . मुलांचे संबंध काही वेळेस चांगले राहतात. मात्र मुलांना वडिलांच्या विष्यी अर्धवट वयात किंवा वयात आल्यावर ही काही विचित्र पद्धतीने या गोष्टी समजल्या तर त्यांचा ही विश्वास वडीलांवरून उडतो. त्यांच्यात ही दुरावा येतो. मुलांना ही insecure फील होते.
यातून तुमचा आनंदी संसार उध्वस्त च होतो. त्याचमुळे पुरुषांनो, तिला कायम वर्तुळाबाहेरच राहू द्या. आणि हे कायम लक्षात ठेवा की किती ही झाले तरी तुम्ही तिला बायकोचे स्थान कधीच देवू शकणार नाही. कायदा , नातेवाईक, समाज या कोणत्याच दृष्टीने. त्या खेरीज चुकून तिला तुमच्या पासून मुले झालीच तर त्यांना ही आपलेसे करू शकणार नाही. त्यांना नाव लावणे ही शक्य नाही.
यातून त्या स्त्री ला ही सतत insecure फील होईल. किंवा मग ती सतत तिच्या हक्क आणि तिच्या विषयी कर्तव्य , आर्थिक गोष्टी करिता तुमच्याकडे तगादा लावेल, वाद घालत राहील . अगदी हुशार असेल तर कायम गोड बोलून तुमच्याकडून काढावा काढेल. ज्यातून तुमचे आर्थिक गणित आणि सांसारिक गणित ही ढासळेल. बायको आणि मुले दुसरी स्त्री आणि तिची मुले हे सहन ही करू शकणार नाहीत. त्यामुळे आहे हा आनंदी संसार उद्ध्वस्त होईल.
दोन स्त्रिया एक हक्काची बायको आणि दुसरी एक स्त्री जरी किती ही जवळची असेल तरी तुम्ही तिला ही योग्य न्याय देवू शकत नाही. Balance होवु शकत नाही. दोघींनी जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी बायको , मुलांना पूर्वी इतका वेळ देवू शकत नाही. कारण त्या दुसऱ्या स्त्री करिता कुठे ना कुठे थोडा वेळ द्यावा लागतो. आर्थिक घडी ही विस्कटून जाते. जसे वेळ तसेच पैसा ही कारण तिला घरी भेटू शकत नाही. मग बाहेर भेटायचे म्हणजे जागा , मग एक तर कायमची तिच्या करिता राहण्याची , किंवा दोघांना एकत्र भेटण्याची सोय तशी जागा विकत , भाड्याने घ्यावी लागते. किंवा मग इतर ठिकाणी पैसे देवून तात्पुरती सोय. यात आर्थिक गोष्टींचे balance ही कोलमडत जातात.
बरं कायम भीती ही असतेच , घरातल्या कोणी , ओळखीच्या , जवळच्या कोणी दोघांना एकत्र बघितले तर घरात समजते त्यातून कधी वाद होतात तर काही वेळेस ती गोष्ट कायम मनात ठेवून नवऱ्याचा दुस्वास केला जातो. त्याला तो चुकला याची कायम जाणीव करून दिली जाते. तर कधी मनात कायमची अढी ठेवली जाते.
प्रत्येक वेळी त्या स्त्री कडे जाताना काही ना काही खोटी कारण , बहाणे करुन जावे लागतात. तेव्हा बायको हे लक्ष ठेवून असते. उशीर झाला. बाहेर जेवण .. मोबाईल वरचे बोलणे , मेसेज वाचले जातात यातून बायकोची ही चिडचिड होत जाते. कधी कधी काही गोष्टी मुद्दाम त्रासदायक केल्या जातात. तर मग कधी कायम पैशाची , वस्तूंची डिमांड आणि ती पूर्ण केली नाही तर परत अशांतता. दुरावा.
पण बहुतांशी वेळा पुरुषांनो, तिला कायम वर्तुळाबाहेरच राहू दिले नाही तर पुरुषांचे मानसिक संतुलन बिघडते च , पूर्वी बायको कडून मिळणारे शारीरिक सुख , समाधान या पासून वंचित राहावे लागते. कारण बरेचदा स्त्री आपला पती कधी कोणाशी शेअर करण्याच्या मताची नसते. एक तर स्वतः चा हक्क दुसरे कोणती शारीरिक व्याधी नको व्हायला ही भीती. आणि तिसरे ती कधीच हे स्वीकारू शकत नाही की ती कुठे तरी कमी पडली असेल त्याचमुळे तिचा पती दुसऱ्या स्त्री कडे गेला. किंवा त्याला ती तेवढा वेळ देवू शकत नाही. त्याच्या गरजा समजू शकत नाही. किंवा त्याच्या नाविन्याची आवड समजू शकत नाही. तिची चूक कबूल करण्याची किंवा स्वीकारण्याची किंवा त्यात बदल घडवून आणण्याची तिच्यात क्षमता नसते. किंवा ते स्वीकारण्याची कधीच तयारी नसते.
पुरुषांनो, तिला कायम वर्तुळाबाहेरच राहू द्या, वर्तुळात शिरण्याचा प्रयत्न केला तरी घरातले जवळचे , नातेवाईक , समाज इथून काही गोष्टींचा , बोलण्याचा , वागण्याचा त्रास तिला झाला तर ती तो तुम्हाला ही देणार आणि तुम्ही त्यातून डिस्टर्ब होवून घरात काही तरी वाद विवाद घालणार . यातून घरातला आनंद उध्वस्त होतो.
जर तुम्ही तिला च आपलेसे करण्याचा प्रयत्न केलात. तुमच्या वर्तुळात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केलात तर तुमचे आपले कायमचे दुरावणार. काहीही झाले तर तीच महत्वाची असे असेल तर तुम्ही सगळे सोडून कायम तिच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर साहजिक तुमचा आनंदी संसार उध्वस्त होईल याचे कारण तुमच्या एकट्याचा विचार तुम्ही केलात असे होते. घरच्यांची पर्वा नाही असा अर्थ होतो..त्यांची निराशा पदरी पडते.
थोडक्यात काय आहे की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. अर्थात पूर्वी राजे त्यांच्या अनेक राण्या असतं त्याची कारणे ही अनेक असत. एक तर त्या काळी ती पद्धत रूढ ही होती. आणि समाज , नातेवाईक आणि सगळ्याच राण्या यांस ती स्विकार्य होती. आर्थिक दृष्टीने चिंता नसे , वंश वृद्धी करिता ही गरज असे. शिवाय राजा म्हणजे बलशाली , ताकदवर , अनेक महिने युद्ध करण्यासाठी बाहेर ही राहावे लागे. त्यातून तिकडून आल्यावर त्याची तेवढी शारीरिक गरजपूर्ती ही करणे असे. शिवाय नावीन्य , विविधता ही आवड .. त्यातून पूर्वी सर्वांना अनेक राण्या असणे हे कधी गैर वाटले नाही.
पण जसे कायद्याची चौकट आली तशी बंधने ही आली. आणि त्यातून पुरुषाच्या आनंदी संसारात दुसरे कोणी आले तर ते बायको आणि कायद्याने ,समाज आणि समाजाच्या भीतीने नातेवाईक , आई वडील हे स्वीकारू शकत नाहीत. बरं ती स्त्री ही तिच्यावर अन्याय होतो असे गृहीत धरते. तिला कोणते हक्क नाहीत. तिच्याविषयी कर्तव्य करताना मर्यादा असतात . आर्थिक गोष्टी ही तिच्या करिता मर्यादा. सामाजिक स्थान नाही.
बायको आणि ती स्त्री दोही ही बरेचवेळा इर्षा , स्पर्धा , द्वेष करण्याची ही शक्यता असते. अधिकार कोणाचे यातून वाद. सगळ्यातून मनसिक असंतुलन प्रत्येकाचे हे गृहीत असते. त्यामुळे पुरुषांची कटपुतली होते .दोन्हीकडून कडकड , असमाधान , यातून आनंदी संसार उद्ध्वस्त होतात.

लेख चांगला आहे हा झाला पुरुषा साठो लेख लग्न झालेल्या महिला चे बाहेर पर पुरुषा बरोबर संबंध असतील पुरुषा ने काय करावे काही मार्गदर्शन लेख आहे का
सर्व बरोबर आहे