Skip to content

थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवणं याची पहिली सुरुवात स्वतःपासून करा.

थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवणं याची पहिली सुरुवात स्वतःपासून करा.


सोनाली जे.


आपल्या देशात जसे विविध जबाबदाऱ्या विविध लोकांच्यावर किंवा एक प्रतिनिधी निवडून त्याच्यावर सोपविल्या जातात. , त्याची आर्थिक व्यवस्था , वाहतूक , दळणवळण , पाणी पुरवठा, अवजड उद्योग , सुरक्षा अशी विविध खाती वाटप करून त्या त्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात. आणि ती ती जबाबदारी त्या त्या प्रतिनिधीने चोख आणि वेळेत पार पाडायची , येणाऱ्या समस्या ही सोडवून प्रगती करत पुढे वाटचाल करत देशाला ही पुढे घेवून जायचे.

अगदी असेच कुटुंबाचे ही असते. कुटुंब प्रमुख आणि कुटुंबा मधील सर्व सदस्यांचे आपल्या कुटुंबा प्रती काही ना काही कर्तव्य असते. जबाबदाऱ्या असतात. कोणी एकाने कंटाळा केला तरी दुसऱ्या कोणी तरी पुढाकार घेवून ती जबाबदारी पूर्ण करावी लागते. केली जाते ही.

थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवणं याची पहिली सुरुवात स्वतःपासून करा.

थांबलेलं कुटुंब अनेक गोष्टी मध्ये थांबू शकते.जसे आर्थिक घडी विस्कटली जाते.नोकरी जाते, तर कधी कुटुंबात एखाद्याचा अपघात , तरी कोणाचे आकस्मिक निधन .कर्ज फेडण्याची चिंता, घराची , गाडीची चिंता . मुलांची चिंता , त्यांचे करियर , तर काही वेळेस त्यांचे अपयश , तर कधी निर्णय चुकतात मग जोडीदार असेल किंवा प्रेम किंवा व्यवसाय , नोकरी विषयी . यातून निराशा येते आणि भीती ही वाटते .एक तर कोण काय म्हणेल विचार करेल शिवाय भविष्याची चिंता ही वाढते. संवाद ही खुंटतात.

या व्यतिरिक्त म्हणजे एकमेकांच्या नात्यात काही कारणाने दुरावा येतो. मानसिक अशांतता , कधी एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता संपते. कधी खूप वाद , भांडणे. यातून बरेचवेळा पूर्वी हसत खेळत असणारे कुटुंब ही आहे तिथेच थांबते. तर ज्या कुटुंबात आनंद निर्माण व्हावा या करिता प्रयत्न सुरू असतात. ते जर थांबले तर सगळे कुटुंब विस्कळीत होते. सगळी चक्र जागच्या जागी थांबतात.

कोणतीही कारणे असोत की ज्यामुळे कुटुंब थांबले असेल तर थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवणं याची पहिली सुरुवात स्वतःपासून करा.

१. प्रयत्न करणे: –

पहिले तर हा विचार करा की असे कुटुंब थांबले आणि दिवसांवर दिवस , महिने जावू लागले आणि कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत तर ते कायमच थांबेल. जसे चालू गाडी धावताना छान वाटते. पण ती नादुरुस्त झाली , बंद पडली , हवा गेली तर आपण ताबडतोब प्रयत्न करून ती सुरू करतो.आणि पुढचा प्रवास सुखाचा आणि सोयीस्कर होतो.

तसेच आहे कुटुंबाची गाडी हळूहळू , धक्का मारत चालत ठेवली तर ती कधी तरी स्पीड पकडणार. त्याकरिता सातत्याने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. आणि हे प्रयत्न कोणी तरी करेल म्हणून स्वतः हातावर हात धरून बसू नका. तर स्वतः पहिले प्रयत्न सुरू करा. तर ते प्रयत्न मार्गी लागून कुटुंबाची गाडी रुळावर येईल.

२. सकारात्मक विचार आणि भूमिका :

किती ही नकारात्मक घटना घडल्या असल्या , नकारात्मक विचार येत असतील तरी त्यातून सकारात्मक विचार केले गेले पाहिजेत आणि तशी भूमिका ही घेणे जरुरीचे. पण मग याची सुरुवात कुठे तरी केली गेली पाहिजे मग ती तुम्ही स्वतः पासुंन सुरुवात केली तर ..यातून कुटुंब हळूहळू पुढे वाटचाल करत राहील.

३. संयम ठेवा : सातत्य ठेवा :

एखादी गोष्ट सातत्याने परत परत केली गेली तर म्हणजे जसे बंद पडलेल्या गाडीला एकदा धक्का मारून ती सुरू होते का ? नाही ना ? मग त्याला हळूहळू ..मग जोरात थोडे जास्त धक्के मारणे गरजेचे असते. तर ती गाडी सुरू होवून पुढचा प्रवास सुखकर सुरू होतो .

तसेच आहे थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवणे. या करिता प्रचंड संयम ठेवण्याची गरज आहे. आणि सातत्य ठेवा. एकदा प्रयत्न केले . दोनदा केले .. तीन वेळा असतील. पण तरी काही फरक जाणवत नाही म्हणून मग ते प्रयत्न थांबविले जातात.

याउलट सूक्ष्म अशा बदलांचा ही आनंद घ्या. आणि त्याची जाणीव ठेवा . बारकाईने बघा .विचार करा. कृती करा. रोज कणभर तरी फरक पडताना नक्की दिसेल. आणि हाच एक कण कण एकत्र येवून एखादी वस्तू तयार होते तसेच तो सूक्ष्म बदल ही थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवण्यास मदत करतो.

कुटुंबात ही बरेचदा असे होते की एखाद्याचा संयम संपतो. निराशा येते. आता थांबू असे वाटते. अशा वेळी ती व्यक्ती तिथेच थांबते. पण त्यामुळे संपूर्ण कुटुंब थांबते हा विचार करून , ही जाणीव ठेवून इतरांनी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्याची सुरुवात तुम्ही तुमच्यापासून च जर केली तर आणि त्या दृष्टीने वाटचाल करत गेलात. आपल्याला ही संधी मिळाली आहे किंवा आपण ती संधी उचलली आहे आणि त्यात शेवटपर्यंत प्रयत्नांची जोड देणारच. असे ध्येय ठेवले तर तुम्ही ठेवलेला संयम , सातत्य आणि प्रयत्न यातून थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवता येत.

४. जिद्द : अनुभवाचा वापर :

एखाद्या युद्धात सैनिक पराभूत झाले म्हणून ते खचून जावून पुढच्या युद्धातून पळ काढत नाहीत . तर ते मागच्या युद्धात का पराभूत झालो याची कारणे शोधतात. तो जो अनुभव आला होता त्याचा अनुभव सकारात्मक दृष्टीने घेवून मागच्या वेळी झालेल्या चुका बदलण्याचा प्रयत्न करतात. आणि अजून जास्त जिद्दीनं पुढच्या युद्धात सहभागी होवून अतिशय विश्वासाने युद्ध लढतात. आणि यशस्वी वाटचाल करतात.

तसेच आहे तुम्ही स्वतः पासून सुरुवात करा आणि मागच्या अनुभवाचा वापर सकारात्मक दृष्टीने घेवून थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवा.

दुसऱ्या कोणी काही करेल , प्रयत्न करतील. याची वाट बघून वेळ घालवण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा. मग ते आर्थिक बदल घडविणे असेल ,मुलांच्यात आत्मविश्वास आणणे किंवा त्यांचा स्वभाव बदलणे असेल , त्यांच्यात स्वाभिमान जागा करणे असेल. तर नात्यात अंतर असेल. सगळे गप्प बसले तर पुढे अजून जास्त बिघडत जाईल .किंवा काहीच घडणार नाही आहे तिथेच गाडी म्हणा किंवा कुटुंब थांबेल त्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा आणि थांबलेलं कुटुंब हळूहळू चालत ठेवा.

मग मी का ? हा विचार करण्यापेक्षा अरे वा मी का , हो हो नक्की मी च हे करू शकतो / शकते असा विचार करून पुढे चालत रहा आणि कुटुंबाला, नात्याना योग्य दिशा देत रहा.

आयुष्य सुंदर आहे.

या दूनिये मध्ये थांबायाला वेळ कोणाला ! हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अगदी कायम सिक्सर मारली पाहिजे असे ही नाही पण या जीवनाच्या , कुटुंबाच्या खेळपट्टीवर सतत टूकुटुकु का होईना खेळत राहिले पाहिजे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!