टेन्शन मधून बाहेर पडायचंय, पण ते टेन्शन देणारे प्रसंग, व्यक्तीच पिच्छा सोडत नाहीये, हे कसं हॅण्डल करावे?
सोनाली जे.
कोणत्याही गोष्टीचा ताण म्हणजे टेन्शन जर आले तर कोणतीच गोष्ट धड घडत नाही. जसे टेन्शन असेल तर मन शांत नसते. अनेक विचार मनात येत असतात. त्यामुळे काम असेल किंवा अभ्यास किंवा गृहिणी चे घरकाम असेल तरी ही मन एकाग्र होवू शकत नाही. आणि मग त्या टेन्शन मधून बाहेर पडायची खूप इच्छा असते पण तरी ही बाहेर पडणे शक्य होत नाही. कारण सतत तेच टेन्शन देणारे प्रसंग घडत असतात. किंवा सासू सतत काही ना काही खुसपट काढत असते . कोणतीच गोष्ट तिच्या मनाला पटत नसते. अशा वेळी घरी वावरताना , सगळे काम करून ही सुनेला सासूचे टेन्शन असते. ती व्यक्ती पिच्छा सोडत नाहीत.
आपण सतत तेच प्रसंग आणि त्याच व्यक्ती त्यांची ती टेन्शन यात अडकून पडत जातो. कारण आपण ते घडून गेलेले प्रसांग, घटना याचा विचार च करत राहतो. त्यामुळे सतत तेच समोर येते, डोक्यात तेच विचार असतात .
टेन्शन मधून बाहेर पडायचंय, पण ते टेन्शन देणारे प्रसंग, व्यक्तीच पिच्छा सोडत नाहीये, हे कसं हॅण्डल करावे?
१. टेन्शन देणाऱ्या विचारांचे , व्यक्तींचे सतत विचार करू नका :-
नैसर्गिक रीत्या आपण जे घडून गेले ते किंवा जे टेन्शन देणारे प्रसंग आहेत , व्यक्ती आहेत त्यांचा विचार जास्त करत असतो. राहून राहून , परत परत त्यात गुंतत असतो.
म्हणून ते विचार सोडून द्या, त्या व्यक्तींचे विचार सोडून द्या. त्यांच्या पासून दूर राहा. अंतर ठेवून रहा.
२.. टेन्शन देणाऱ्या घटना , व्यक्ती यांच्यापासून मुक्तता किंवा दूर राहण्याकरिता काय करावे लागेल ?
तर चांगल्या गोष्टींचे विचार , टेन्शन कमी होणारे motivational video’s बघा, ज्या व्यक्ती सकारात्मक आहेत त्या , ज्या विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यांच्या संपर्कात रहा, मोठ्या लोकांची चरित्र वाचा. त्यांचे अनुभव याचा उपयोग तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा तुमचे ध्येय गाठताना उपयोगी पडतील आणि टेन्शन ही कमी होईल.
३. भूतकाळात राहू नका आणि भविष्यकाळात काय होईल याचे विचार करू नका. : –
बरेचवेळा घटना घडून गेली तरी त्याचे पडसाद वर्तमान आणि भविष्य या दोन्ही वर करतात. तसेच प्रसंग पुढे ही घडतील म्हणून ते टेन्शन आपण carry करत असतो.
तसेच भूतकाळात एखादी व्यक्ती जशी वागली त्याचे त्रास आठवून आपण वर्तमान खराब करतो. आणि भविष्यात ही ती व्यक्ती तशीच वागेल म्हणून टेन्शन मध्ये असतो.
म्हणून ती व्यक्ती तेव्हा तशी का वागली याची कारणे तपासून पहा. वर्तमान आणि भूतकाळात त्याच्यात बदल घडून येतील किंवा तो बदलेल अशा विचाराने पुढे जा. प्रसंगी त्याचे वर्तन तेव्हा तसे का घडले याची जाणीव करून द्या त्या व्यक्तीला म्हणजे तो पुढे त्याच चुका करणार नाही आणि टेन्शन ही वाढणार नाही.
बदल घडवून आणण्याची क्षमता वाढवा. तर टेन्शन मधून आपोआप बाहेर पडाल.
म्हणून भूतकाळ विसरून जा. तेव्हाचे क्षण विसरून जा.
जसे तेव्हा एखाद्या कामात अपयश आले असेल तर आता ही तसे काम करताना अपयश येईल हे विचार डोक्यात येतात. त्याच गोष्टी आपण कुरवाळत बसतो. त्याच व्यक्ती आपल्याला पाहिजे असतात. त्यांच्या शिवाय आपलं पान ही हलू शकत नाही ही मनोधारणा झालेली असते. ही आपण त्यांच्या सोबत परत त्याच टेन्शन मध्ये येतो. म्हणून अशा वेळी दुसऱ्या व्यक्तींना आपल्या सोबत काम करण्याची संधी द्या. त्यांना मिळालेली संधी साधून ते खूप जास्त efforts घेतली आणि धडपड ही जास्त करून त्यात यश मिळवितील.
निराश , हताश होवुन टेन्शन मध्ये जगण्यापेक्षा
भूतकाळात ते काम करताना काय चूक झाली आणि ती आता सुधारण्याची संधी मिळाली आहे हा विचार करून पुढे जा. आणि टेन्शन न घेता त्या पूर्वानुभवावर विश्वासाने पुढे जा.
४. त्या क्षणी hyper होवू नये. शांत राहावे :-
टेन्शन आले की मला टेन्शन आले .. ती व्यक्ती समोर दिसली तरी टेन्शन येते. तिडीक येते. असे प्रकार घडत असतात. त्यातून आहे ते टेन्शन जप करून अधिक वाढवून अजून जास्त आपण भरकटत जातो. त्या क्षणी निर्णय क्षमता संपते. आणि अजून चुका घडत जातात.
म्हणून अशा वेळी हायपर न होता शांत राहावे . वेळ हे सगळ्या वरील उत्तम औषध आहे. वेळ जाईल तसे त्या टेन्शन च्या प्रसंगाची तीव्रता कमी होते.
तसेच व्यक्ती बाबत ही असते. टेन्शन देणारी व्यक्ती. किंवा जिच्या मुळे टेन्शन आले तो प्रसंग , घटना हळूहळू काळा मागे जाते तसे त्या व्यक्तीमुळे टेन्शन येणे कमी होते किंवा थांबते.
साधारण टेन्शन किंवा ताण का येतो ? तर आपल्या मनाची तशी तयारी नसते. आपण एक गृहीत धरून जात असतो. आणि तेच बरोबर असे आपले मत असते. पण अचानक तसे आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. आणि मग जे समोर आहे त्याला तोंड देताना किंवा ते त्या पद्धतीने काम करताना अनुभव नसल्याने ही टेन्शन येते.
तसे काही व्यक्ती कशा वागणार , त्यांची मानसिकता कशी याचे आपण काही आडाखे लावतो. किंवा गृहीत धरतो. आणि ते तसे वागले नाहीत की आपल्याला टेन्शन येते.
थोडक्यात मनाविरुद्ध आणि मनाची तयारी नसताना जे प्रसंग किंवा घटना घडतात तेव्हा त्याचे टेन्शन येणे साहजिक असते कारण ते प्रसंग आणि ते व्यक्तीचे वागणे नवीन असते. वेगळे असते. त्याच्याशी आपण used to नसतो. त्यामुळे टेन्शन येते. आणि त्या व्यक्ती बघितल्या तरी टेन्शन येते.
म्हणून सगळ्यात कोणताही पूर्वग्रह , पूर्वानुभव लक्षात न घेता प्रत्येक वेळी mind clear करून पुढे जावे. Delete बटन दाबून सगळे पुसून टाकतो तसे करा. प्रत्येक वेळी फ्रेश गोष्ट. व्यक्ती तीच असेल तरी तिच्याशी फ्रेश व्यवहार.
म्हणजे टेन्शन घेणे ही बंद होईल. योग्य प्रकारे हॅण्डल होईल आणि टेन्शन मधून आपला बिघडणारा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचेल. जसे हृदयाचे ठोके वाढणे, बीपी वाढणे, निराशा, भीती , एकाग्रता कमी होणे, निद्रानाश या सारख्या त्रासाची शक्यता ही राहणार नाही. आणि असतील तर त्यातून मुक्तता होईल.
आयुष्य सुंदर आहे. टेन्शन मधून बाहेर पडायचंय, पण ते टेन्शन देणारे प्रसंग, व्यक्तीच पिच्छा सोडत नाहीये तर एक लक्षात घ्या हे क्षणिक आहे. बदलणारे आहे. हे ही दिवस जातील. हे लक्षात घ्या.हेही क्षण जातील असा सकारात्मक विचार करून बिनधास्त पुढे जात राहा. आणि कधी खूप ताण वाटला आणि काहीच निर्णय घेवू शकत नसाल. किंवा व्यक्ती अजून टेन्शन वाढवत असतील तर थोडा pause घ्या. विसावा घ्या. त्या व्यक्ती पासून थोडे काळ दूर रहा.
आयुष्य पुढे जात राहणारे आहे. काळा सोबत आपण ही पुढे जात असतो. ज्याची जेवढी धाव तो त्याच्या स्पीड ने जात राहतो. इतरांशी तुलना करून किंवा आपण कमी आहोत हे नकारात्मक विचार न करता ससा कासव यांच्यातल्या कासवा सारखे सातत्य ठेवा. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचणे , ते साध्य करणे सहज शक्य होईल. तेही टेन्शन फ्री.
ससा जसा ओव्हर कॉन्फिडन्स , बिनधास्त पणे मी खूप जोरात धावतो या आपल्या फुशारकी ने चढला होता. आणि मध्ये खावू , थोडी विश्रांती घेवू असे करत त्याला झोप लागते आणि जाग येते तेव्हा कासव खूप पुढे गेलेले असते. किती जरी जोरात पळत गेला ससा नंतर तरी शर्यंत जिंकू शकत नाही.
हेच कासवाने ससा माझ्या पेक्षा सरस आहे. चपळ आहे असा विचार करून टेन्शन घेतले असते तर नकारात्मकता वाढत गेली असती. आणि तो कदाचित शर्यत पूर्ण करू शकला नसता. कासवाने स्पर्धक कितीही ताकदीचा असला तरी टेन्शन घेतले नाही. त्यामुळे जो शर्यत तर जिंकला च पण नवीन रेकॉर्ड केले.
तसेच आपले आयुष्य टेन्शन चे प्रसंग आणि टेन्शन देणाऱ्या व्यक्ती यांना व्यवस्थित हाताळा ..नेटाने सामना करा. तर त्या गोष्टी खूप छान हाताळल्या जातील.
All the best.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख आवडला