ताण आणि एकमेकांविषयी अविश्वास असणारी कुटुंबे कायम विस्कळितच राहतात.
मधुरा धायगुडे
This is our extended family एकत्र विभक्त आणि आता extended कुटुंबाची नवीन जाणीव बघायला मिळते.सहजच मनात विचार आला extended कुटुंब …आपल्या निर्धारित कुटुंबातला विसंवाद ….अहंकार..स्वार्थ .कि अजून …कुटुंब जीवनाचा खरा आधार म्हणत म्हणत आज extended चा विचार …का होतात विभक्त कुटुंबे विस्कळित कुटुंब काय असेल त्याचीही कारणं …..सहजच लिहावसं वाटलं …
कुठलंच कुटुंब अगदी सर्वतऱ्हेने योग्य नसते. तसेच आपला जन्म कुठल्या कुटुंबात व्हावा हे सुद्धा आपल्या हातात नसते
प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढते, ज्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. मुलांच्या आयुष्यातली वाढीची सुरुवातीची काही वर्षे, आणि ज्या वातावरणात मुले वाढतात, त्याचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून ही मुले समाजात कशी कार्यरत होतात, हे सुद्धा त्यावर अवलंबून असते.
विस्कळित कुटुंब म्हणजे …..?!
ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि वाईट वर्तणूक असते अशी . कुटुंबांमध्ये भावनिक पातळीवर भरपूर प्रमाणात उलथापालथ असते. मुलांकडे दुर्लक्ष तसेच त्यांच्याशी गैरवर्तन सुद्धा पाहायला मिळते. विस्कळीत कुटुंबातील मुलांना असे वाटते सगळयांच्याकडे असेच असते. आणि त्यामुळे त्यांना ह्या विस्कळीत कुटुंबातील वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सामोरे जावे कळत नाही. ह्याउलट सुदृढ कुटुंबांमध्ये, कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्यांचा विकास होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आणि भावनिकदृष्या सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी मदत केली जाते.
विस्कळीत कुटुंबांमध्ये नात्यात कायम उदासीनता असते, तिथे काही प्रमाणात सदस्यांमधे दुर्लक्ष आणि वाईट वर्तणूक असते. अशा कुटुंबांमध्ये वाढलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मप्रशंसेचा अभाव असतो. सर्वांच्या घरी असेच वातावरण असते असे ह्या मुलांना वाटते. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर ह्याचा परिणाम होतो.
सुदृढ कुटुंबांमध्ये, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी आदर असतो. जिव्हाळा असतो.
विस्कळीत कुटुंबांमध्ये ताण आणि अविश्वास असतो. तसेच मोठ्या माणसांमध्ये सुद्धा अविश्वास आणि रुसवेफुगवे असतात. अशा घरातील सदस्य सुरक्षित वातावरण तयार करत नाहीत. अशा घरात वाढताना सतत अनामिक भीती बाळगून असतात. अशा कुटुंबांमध्ये क्षमेला किंमत नसते आणि भावनांना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाही.अहंकार मीपणा स्वार्थ आणि बरच काही….
जर एखाद्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या निष्क्रियता असेल तर हे चक्र थांबत नाही. मोठ्यांना मोठ्यांच मोठेपण वापरता येत नाही घराला बांधून ठेवणे ही जबाबदारी त्यांचीच पण दुजाभाव स्वमग्नता असे … कुटूंबातील सगळ्या सदस्यांचे गुण विस्कळीत कुटुंब असण्यासाठी कारणीभूत असतात.
जर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असेल तर त्याचा परिणाम म्हणून कुटुंब विस्कळीत बनू शकते. कुटुंबात काही प्रश्न निर्माण झाले तर पालक चिंताग्रस्त होतात. त्यामुळे मग कुटुंबातील सदस्यांमध्ये दरी निर्माण होते आणि त्यामुळे भांडणे होतात आणि घराची शांतता नष्ट होते.
मोठ्या व्यक्ती इतरांशी सतत अधिकारवाणीने बोलत असतील तसेच त्यांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर . त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी अधिकार निर्माण होतो अनादर बळावतो आणि नावड निर्माण होते.
जर एखाद्या कुटुंबामध्ये संवाद, वादविवाद आणि स्पष्टीकरण यासाठी वेळ नसेल तर सुद्धा कुटुंबामध्ये विस्कळीतपणा येतो विचारांचा चुकीचा प्रभाव यामुळे विस्कळितपणा येतो.इतरांची लुडबुडही यास कारणीभूत ठरु शकते.
अशी बरीच लक्षणे दिसतात मग शोध होतो नवीनच extended family या सदरात आपल्याला आधार देणाऱ्या प्रशंसा करणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या extended famiky चा हे ही उत्तम च .असे हवेच……
सर्वसमान ही शिकवण असते शेवटी व्यक्ती आपापल्या मनाला जिथे समाधान मिळेल आनंद मिळेल तिकडे शोधत राहतो धावत राहतो अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नव्हते हरवलेली ती कुटुंबे ही अशीच रस्ता विसरलेली विस्कळीत …
.भेटतात त्या शेवटच्या क्षणी .फक्त मधला काळ हरवलेला असतो ..”दुरावलेले जवळचे नातेवाईक या नव्या ओळखीने..”…!!
तुम्हाला काय वाटत?? व्यक्ती सापेक्षता आदरच.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
