जी माणसं स्वतःला तऱ्हेतऱ्हेच्या कामांत झोकून देतात, त्यांची दुःखे मोठ्या फरकाने कमी झालेली असतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
या जगात असा एकही माणूस नाही जो कोणत्याही कामाशिवाय राहिलेला असेल. अगदी गरीब असो की श्रीमंत, निरोगी असो वा आजारी प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात त्याच्या त्याच्या परीने काम करत जगत असतो. कोणाच्या आयुष्याचं ते भाग असत, कोण अर्थार्थाजनसाठी कर तर कोण मन रमवायला. काम हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकत व त्याचा हेतू पण व्यक्तीपरत्त्वे बदलत जातो. गृहिणीच काम वेगळं, बाहेर नोकरी करण्याऱ्या व्यक्तीचं काम वेगळं, एखादी संस्था असेल तर तिचं काम वेगळं तर एखादा माणूस छंद जोपासत असेल त्याच काम वेगळं. कामाची व्याप्ती खूप मोठी आहे.
कारण व्यक्ती वेगवेगळ्या आहेत त्यांना ते जे काही करत आहेत त्यातून मिळणाऱ्या गोष्टींवर ते काम अवलंबून असत. पण पैसे मिळवणं, जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून करण, वेळ घालवायला काहीतरी करण यापलीकडे पण कामातून आपल्याला अस काही मिळत का जे खूप बहुमोल आहे? खरच अस काही असत का? तर हो! आपल्याला कामातून या सर्व गोष्टी मिळतातच. पण त्याहूनही अधिक काहीतरी मिळत, काहीतरी कमी होत. ते म्हणजे आपलं दुःख.
दुःख कोणालाच चुकल नाही. सर्वांना कमी अधिक प्रमाणात ते असत. ते कसं कोणाला चुकेल? पण दुःखाची तीव्रता पण कधी वाढते? तर त्यामध्ये व्यक्ती कुढत बसते तेव्हा. एकसारखे ते दुःख आठवत बसणे, त्यांचं रवंथ करणे यातून ते दुःख अजून चिघळत. कारण आपण दुःख अनुभवताना आताच्या काळात नसतो. आपण मागेच कुठेतरी थांबलेले असतो. म्हणूनच नैराश्याने घेरलेली व्यक्ती असेल जिच कश्यातच मन लागत नसत, जी एकसारखी उदास असते तिला तिचं रूटीन अस करायला लावलं जातं ज्यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असेल. मग ते व्यायाम असेल किंवा आपलं टीपिकल काम, ते छंद लोकांमध्ये हळू हळू मिसळण. त्यांना बिझी केल जात. का अश्या वेगवेगळ्या कामात माणसाने गुंतायच आहे? यातून दुःख कसं कमी होत?
याच कारण म्हणजे आपण त्या वेळी ते काम करत असताना पूर्णपणे त्यात गुंतेलेले असतो. तात्पुरतं तरी असेना आपण आपलं दुःख बाजूला ठेवतो. त्याचा आपल्याला विसर पडतो. आपण आताचा काळ जगतो. आता घडणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे आपलं लक्ष असत. ज्यालाच सजगता अस म्हणतात. त्यामुळे एक काम करत असताना शक्यतो आपण दुसरी गोष्ट मनात आणत नाही. कधी शक्य आहे हे? तर खरच ते काम मन लावून केल तर. आपल्या संपर्कात अशी अनेक लोक असतात ज्यांना स्वतः ला बिझी राहायला आवडत. त्यांना रिकाम बसायला कधीच आवडत नसतं. अगदी रिकाम वेळ मिळाला तरी ते त्यातून काहीतरी शोधून काढतात. आणि या सर्व गोष्टींचा त्यांना त्रास होत नाही तर त्यातून त्यांना समाधान मिळत असत.
गावात जेव्हा बायका एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात हे हमखास असत. एखाद्या बाईला समजा कसला त्रास असेल, कोणत्याही प्रकारचं दुःख असेल आणि कोणी तिला विचारलं की तू हे सर्व कसं सहन करतेस तर अनेकांच्या तोंडी हे असत, “अग या दुःखाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे. ते आहेच नेहमीच. पण कामचं इतकं असत की ह्या सर्व गोष्टींचा विचारच येत नाही.” हे त्यांचं काम त्यांना ताकत देत असत.
जुन्या काळातल्या बायका कामातच आपलं मन रमवायच्या. आणि ते नुसत काम नसायचं तो एक अनुभव बनून जायचा. आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी. कारण ते काम करताना ती स्त्री कधी अभंग म्हणायची, कधी स्वरचित ओव्या म्हणायची. मग ते जात्यावर पीठ दळताना असेल किंवा दुधाची धर काढताना असेल. हे एक प्रकारचं भाव विरेचन असायचं. आपले भाव, आपलं मन एक स्त्री अश्या माध्यमातून मोकळं करत होती. आणि अश्याच पद्धतीने बहिणाबाई सारख्या कवियित्री आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या काव्यासाठी वेगळा वेळ काढला नव्हता. ते पण अस एकसारख्या केलेल्या कामातून आलेल होत.
त्यामुळे काम फक्त आपल्याला कष्ट करायला लावत, फक्त पैसा मिळवून देत, अस नाही, फक्त थकवत अस नाही. तर कोणत्याही प्रकारचं काम जे आपल्याला आताच क्षण जगायला लावत आहे ते काम आपलं दुःख कमी करत, आपलं मन मोकळं करायला आपली मदत करत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
