स्वतःच्या परिस्थितीबद्दल दुसऱ्यांना दोष देऊन तुम्ही तुमचं दुःख आणखीन घट्ट करताय..
पुजा सातपुते
आयुष्यात बरेचदा आपले निर्णय चुकतात. काही वेळेस आपण इतरांचं ऐकून आपल्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेतो किव्हा हट्टाहासाने सर्वांना मनवून आपल्या निर्णयात सामील करतो आणि काही प्रॉब्लेम झाला की स्वतःच्या परिस्थितीबद्दल पचतावा करत बसतो.
यामध्ये कधी आपली चूक असते तर कधी आपला साथ देणाऱ्यांची पण स्वतःची चूक विसरून आपण दुसऱ्यांना दोषी ठरवतो. आपलं आयुष्य हे आपलं असतं आणि आपल्याला निर्णयक्षमता असली पाहिजे. स्वतः साठी काय चांगलं आणि काय वाईट आहे हे कळलं पाहिजे.
इतरांचं, मोठ्या लोकांचं नक्कीच ऐकायला पाहिजे कारण शेवटी त्यांचा एक्सपेरियन्स हा खूप महत्वाचा असतो पण कधी कधी त्यांचेही निर्णय चुकू शकतात कारण कालचकरं हे सारखं बदलत असतं, नवीन गोष्टींचं संशोधन होत राहतं, बदल घडत राहतात म्हणून स्वतः साठी काय हितकारक आहे हा जर विचार करून निर्णय घेतला तर आपल्याला दुसऱ्यांना दोष द्यायची वेळच येत नाही.
खूपदा असं होतं आपल्या घरातले मोठे लोकं आपल्याला वाईट सवयीपासून लांब राहायचा सल्ला देतात पण आपण त्यांचं ऐकण्याच्या मूड मध्ये नसतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपण त्यांना दोष देतो. आपल्याला वाटतं त्यांना एवढं माहित असून सुद्धा आपल्याला वेळेत सावरलं का नाही? यात आपल्याला स्वतःची चूक दिसत नाही.
कितीही जवळचे असले तरी ते आपल्याला फक्त सल्ला देऊ शकतात. त्याचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. बरेचदा असंही होतं, आपली काही स्वप्न असतात पण इतरांच्या सांगण्यावरून आपण ती बाजूला ठेवतो आणि वेगळंच आयुष्य जगायला लागतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला काही अचिव्ह केल्यासारखं वाटत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देत राहतो आणि आपलं दुःख आणखी घट्ट करतो.
आपल्याला वाटतं त्या वेळेस आपण हे केलं असतं तर आज आपलं आयुष्य वेगळं असतं. मागचं आठवून विनाकारण सगळ्यांना दोष देत राहतो आणि त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. निसर्गाने प्रत्येकाला एक सुंदर आयुष्य जगण्याची संधी दिली आहे आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे.
तुमच्या डोक्यात ज्या काही आयडियास आहेत त्या अमलात आण्याचा प्रयत्न करा. सल्ला जरूर घ्या पण तुम्हाला मनापासून त्या गोष्टी विषयी जर कॉन्फिडन्स वाटत असेल तर ती नक्की करून बघा. फक्त एवढच द्यानात ठेवा की त्यामुळे स्वतःचं किव्हा कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. उदाहरणार्थ कोणी जर तुम्हाला वाईट काम, घातक गोष्टी करण्यापासून थांबवत असेल तर त्यांचं नक्की ऐका कारण त्यात तुमचं भलं आहे.
पण जर तुमच्यात क्रीएटीव्हिटी असेल, तुमच्या कामाविषयी किव्हा एखाद्या प्रोजेक्ट विषयी नवीन आयडियास असतील आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं रोजचं रुटीन बदलावं लागत असेल, त्यासाठी कोणी तुम्हाला थांबवत असेल तर मग ऐकायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. निसर्ग त्यालाच क्रीएटिव्हिटी देतो जो काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकतो आणि जर तुमच्या डोक्यात असे आयडियास आले असतील तर नक्की ते अमलात आण्याचा प्रयत्न करा.
आयुष्य हे regret करण्यासाठी नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी आहे आणि वेळेत जर संधीचा फायदा घेतला नाही तर मग नंतर कोणालाही दोष देण्यात अर्थ नसतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता काय उपयोग, वेळ निघून गेली, त्यावेळी जर आपली इच्छा पूर्ण केली असती तर बरं झालं असतं, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. इच्छा असेल तर वेळ कधीच निघून जात नसते. एक संधी हुकली तर दुसरी संधी निर्माण होते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं.
स्वतःच्या परिस्थितीबद्दल स्वतःला किव्हा दुसऱ्यांना दोष देऊन तुम्ही तुमचं दुःख आणखीन घट्ट करताय. त्यापेक्षा तुमच्या आयुष्याची जवाबदारी घ्या आणि स्वतःच्या परिस्थितीत काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. नुसतं दुःख मनात ठेवून तुम्ही तुमचं आयुष्य कधीच बदलू शकणार नाही. रोज आपल्याला निसर्ग आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देत असतो. त्याचा फायदा घ्या. कधी कधी थोडा वेळ लागतो पण आयुष्यात regret करण्यापेक्षा किव्हा दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा प्रयत्न केलेला कधीही चांगला, नाही का?
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. कधी कधी आपल्या मनासारखं होत नाही पण योग्य वेळी योग्य त्या गोष्टी होत राहतात फक्त वेळ यावी लागते. म्हणून निराश होऊन प्रयत्न सोडू नका, दुसऱ्यांना दोष देऊन स्वतःचं दुःख घट्ट करत बसू नका. पॉसिटीव्ह अटीट्युड ठेवून पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा. खरं म्हंटलं तर आपलं आयुष्य खूप रहस्यमय आहे, कधी, कुठे आणि केव्हा आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल काही सांगता येत नाही म्हणून होप्स ठेवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Very nice and beautiful
अगदी बरोबर.
It’s true very nice