Skip to content

भले शहरात पैसा जास्त आहे, पण सुख समाधान गावातंच मिळतं.

भले शहरात पैसा जास्त आहे, पण सुख समाधान गावातंच मिळतं.


सोनाली जे.


आजकाल शिक्षण पूर्ण करण्याकरिता ही शहरात जावून शिक्षण घ्यायचे . का ? तर चांगले शिक्षण मिळते. मोठ्या पगाराची नोकरी मिळते. आपले गाव सोडून , घर सोडून माणूस जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याची धडपड ही त्या शहरात टिकण्यासाठी सुरू होते. कारण गावाकडून आलेला आणि शहरात वाढलेला यात जमीन अस्मानाचा फरक असतो. त्या व्यक्तीचे राहणीमान , कपडे , भाषा , बोलणे , ही शहरी भागात स्वीकारत च नाहीत. त्यामुळे किती ही हुशार असेल तरी त्याला किंवा तिला शहरात सुरुवातीला वाळीत टाकल्याचा भास होतो.पण यातून त्याला किंवा तिला हळूहळू शहरातले तोर तरीके , बोलण्याची ढब , इथले पोशाख पद्धती आत्मसात करावी लागते. आणि त्याच बरोबर तुमच्यात काही तरी खास आहे. हुशारी , स्किल हे सिद्ध करावे लागते.

जेव्हा शहरात मोठ्या पगाराची नोकरी मिळते तेव्हा वाटते अरे वाह आता आपल्याला भरपूर पैसा मिळणार. आणि खरेच आहे गावाकडच्या पेक्षा शहरात जास्त पगार आहेत. पैसा जास्त मिळतो. पण काहीच दिवसात फुग्यातली हवा जावी तसे आपल्याला एक एक अनुभव येवू लागतात. कारण बाहेरून आल्यामुळे राहण्याचा खर्च , घरभाडे ,ऑफिस ला जाणे येणे बस , रिक्षा, ट्रेन किंवा स्वतः ची दुचाकी किंवा चारचाकी घ्यावीच लागते .त्याच्याकरिता सुरुवातीला कर्ज , घरच्यांनी पैसे दिले तर पेट्रोलच्या वाढत्या दराचा सामना करत तो पेट्रोल खर्च, जेवण , कपडे , गावांसारखे एकच ड्रेस चार दिवस वापरून ही चालत नाही इथे लगेच लोक ही नावे ठेवतात. आणि रोजचे धूर , धूळ घाम यामुळे तेच कपडे धुतल्या शिवाय परत वापरू ही शकत नाही.

हळूहळू दोनाचे चार हात मग अजून खर्च वाढतात. मग मुले .. त्यांचे खर्च , स्वतचं घर घेण्यासाठी धडपड. त्या करिता कर्ज , मग हप्ते फेडणे , मुलांची शिक्षण , रोजचा भाजीपाला , लाईट बिल , पाणी बिल , गॅस , हे दैनंदिन खर्च तर आहेतच. म्हणजे जितके कमविनार तेवढे खर्च ही आ वासून समोर उभे असतात. त्यात नोकरी कायमस्वरूपी असेल तर ठीक .नाही तर ती एक धाकधूक. यासागल्यातून भविष्याची तरतूद. मेडिकल पॉलिसी , काही saving यात अक्षरशः हातात काही शिल्लक राहत नाही. शहरात आजकाल लाखभर रुपये मिळतात महिन्याला म्हणजे ही कमीच वाटतात. कारण खर्च च खूप. त्यात मुले मोठी होवू लागली की त्यांचे शिक्षण फी लाख लाख रुपये . प्रायव्हेट class fee, transport हेच भरमसाठ खर्च असतात. या शिवाय काही तरी activity. Classes कारण काय तर अभ्यासा व्यतिरिक्त ही अनेक गोष्टी येत असाव्यात. शिवाय त्यांचे कॅन्टीन खाणे पिणे. मोबाईल खर्च असंख्य खर्च असे आ वासून उभे असतात. सतत कामाची चिंता , ताण तणाव , कधी घरात वेळ देवू शकत नाही त्यामुळे नात्यामध्ला तणाव. तर नाती टिकवता टिकवता नाकी नऊ येतात. तरी कसे सगळे वरवरचे ..आपुलकी , ओढ कुठे दिसतच नाही.

शेवटी असे वाटते की आमदनी अठ्ठणी खर्चा रुपय्या. इतके सगळे कमवून , खर्च करून , धावपळ करून , सगळ्यात महत्वाचे पैसा खर्च करूनही सुख , समाधान , शांतता लाभत नाही. किती ही माऊ गादीं , उशी , जाड पांघरून असेल तरी रात्रीची शांत झोप लागत नाही का तर भविष्याची चिंता , insecurity , उद्या काय होईल . कसे होईल याचीच चिंता आणि काळजी. आपली प्रेमाची माणसं सापडत नाही. दमलास रे म्हणणारी ,प्रेमाने मीठ भाकर खावू घालणारी , शाळेतून घरी येताना मित्राकडे जाणार आहे म्हणले की घरी समजायचे की आज आपलं लेकरू जेवाया घरी न्हाय. कधी ही गेलात तर घासातला घास देणारी , भरवणारी आपली माणसे मात्र शोधून सापडणार नाहीत.

भले शहरात पैसा जास्त आहे, पण सुख समाधान गावातंच मिळतं. शेजारी पाजारी कुठे ही जा. आपुलकीने चौकशी करणारे. अगदी अख्खा गाव छोटा घरातला व्यक्ती न व्यक्ती माहिती प्रत्येकाला. त्यातून कुणी वाईट वागण्याचा प्रश्न येत नसे. कारण प्रत्येकाला ती आपली व्यक्ती वाटत असते. मुलांचं वागणे कधी बिघडू लागले की लगेच शेजार पाजार चे ही कानउघाडणी करत. हे का तर आपलीच पोरे आहेत बिघडू नयेत याची काळजी वाटत असे त्यांना. माणुसकी सापडेल ती गावात च. एखादा नवीन कोणी गावात आला की आपणहून विचारणार काय पाव्हणं कंच्या गावच? कुणाकडं आलाय म्हणायचं ? मग एकदा ओळख झाली की भरपूर मोकळेपणाने गप्पा. चौकशी आणि तरी त्यात कोणाला गैर ही वाटत नसे. किंवा मी का सांगू असे आखडू ही नसतं गावाकडे. शेजारी पाजारी शेतातून येताना ताजी ताजी भाजी खुडून एकमेकाला आणून देणार. बरं सगळे मेहनती. काबाड कष्ट करणारे. पैसा कमी मिळाला तरी सुखाने चार घास खाणारे . आणि अगदी डणलोप ची गादी किंवा डब्बल बेड नसेल पण अगदी साध्या गोधडीवर आकाशाचे छप्पर यावर सुधा गाढ झोपी जात.

गावाकड खर्च ही उगीच उधळपट्टी सारखा नाही . घाम गाळून , कष्ट करून पोट भरणारे म्हणत नाहीत चांगला deo मारू. तर घाम. म्हणजे कष्टाचे चिन्ह .. तब्येत maintain करण्याकरिता कोणत्या जिम ला नाही जावे लागत यांना. सूट बूट ची. ही गरज नसते यांना साधे धोतर टोपी सुधा त्या माणसाची शान असते. साधी राहणी त्यामुळे खर्च ही कमी. शाळा एकच सरकारी त्यामुळे शिक्षण जवळजवळ फुकट च. लाखो रुपये फी वाचते .. शिवाय मुक्तपणे शिकण्याची संधी मिळते. कोणत्या घरी मयत झाली तरी घरटी एक दोन जण तर जातात च. त्या घरी. चूल पेटवली जात नाही . शेजरपजारचे आपलेपणाने आम्ही आहोत पाठीशी हा दिलासा देत जेवण , चहा पाणी आणून देतात तेही प्रेमाने. नाही तर शहरात कधी कोणी शेजारी गेले तरी आठ दहा दिवसांनी formality म्हणून भेटून यायचे .किंवा वाटेत त्यांच्या घरातले कोणी भेटले तर वाईट झाले हुं असे म्हणायचे. तेही पुढे काय बोलायचे हे प्रश्न पडतात. कधी एकदा तिथून बाहेर पडू असे होते. मात्र गावाकडे अख्खे गाव सोबत असते. एकटे वाटणारच नाही कोणाला.

आनंदाची गोष्ट असेल , लग्न असेल तर five star मधल्या सारखे लाखो खर्च करून ही मोजकी माणसं नसतात तर अख्ख्या गावाला बुंदीचे जेवण असतें . आणि तेही त्या five star हॉटेलच्या निम्म्या खर्चात. गावाकडच्या मातीत अनवाणी चालत जा, किंवा बैलगाडी मधून तो एक आगळा वेगळा आनंद असतो. शहरसारखे मोठ्या शाळा कॉलेज नसतात ..भरमसाठ फी द्यावी लागत नाही. तर गरीब असो .अथवा श्रीमंत त्या एकाच शाळेत सगळ्यांची पोरे शिकतील. तरी ही चांगला अभ्यास करून पुढे हीच मुले तर शहरात चांगल्या नोकऱ्या ही मिळवतात की.

गावाकड स्वच्छ हवा , कायम खेळते पाणी , pollution नाही. ताजी भाजी , रोजचा सकाळ संध्याकाळ भरपूर नाश्ता , जेवण खाण. जवळच्या जवळ असो .शेतात जाताना ही गाडी नसेल तरी पायी चालत जावून शेतात कष्ट करण्याची तयारी आणि ताकद , दिवसभर दमणूक होवून घरी आल्यावर रात्री पडल्या पडल्या लागणारी सुखाची झोप.

शहरात उद्याची चिंता .. पैसे कमवून समाधान मिळत नाही शहरात ..सुखाची झोप ही लागत नाही का तर सतत भविष्याची चिंता. पैसा अजून कसा कमविता येईल .वाढत जाणाऱ्या गरजा , मग maslo यांच्या नियमानुसार सेल्फ esteem म्हणजे ब्रँडेड वस्तू घेणे जसे ब्रँडेड घड्याळ , गाडी , मोबाईल असे यातून दिखवा आणि स्वतः चे समाधान. या शिवाय बचत करता येईल हीच गणिते डोक्यात त्यामुळे झोप ही लागत नाही. जीव सतत अस्वस्थ. गावाकडे घरे आपली स्वतः ची. फार काही आधुनिक , attractive नसतील पण पूर्वीचे तर चौसुपे वाडे. झोपाळा , मध्ये अंगण , माजघर, स्वयंपाकघर , झोपण्याची खोली. तर लहान घर ही असतातच की. अजून शेणाने सारवयची घरे आहेत. त्यामुळे घरातल्या व्यक्ती अजून active राहतात. आणि निरोगी ही.

गावाकडे बऱ्याच गोष्टी विनामूल्य करता येतात. पोहायला जायचे तर मस्त विहीर , तलाव , नदी मध्ये मनसोक्त पोहून येतात. आणि एकमेकांच्या मुळे सहज शिकणे शक्य होते. तर शहरात पोहायला जायचे तर स्विमिंग पुल वरच .आणि त्याकरिता तासाचे पैसे द्यायचे. शिवाय तिथे जाण्याकरिता swimming costume चे खर्च वेगळेच. निसर्गातल्या सहज उपलब्ध गोष्टी करिता आपल्याला बरेचवेळा शहरात पैसा खर्च करावा लागतो . तर गावाकडे या सगळ्या गोष्टी फुकटात करता येतात आणि आनंद ही मिळतो त्यातून.

पैसा ही अशी गोष्ट आहे की जी मिळविण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालतो, परंतु तो कितीही कमावला तरी बरेचवेळा आणि बहुतेकांना समाधान मिळत नाही. आज एव्हढे आहे की basic गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. पण असे नाही की जास्त पैसा मिळत असेल तर तुमच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण होतीलच. कारण पैसा मिळत गेला की तुमची गरजांची लिस्ट आणि hiererchy ही बदलत जाते. सुरुवातीला टू व्हीलर असते पण नंतर मात्र four wheeler ची गरज पडते कारण कुठे जायचे तर मोठे कुटुंब एकत्र जाण्यासाठी. पण मग ही न संपणारी लिस्ट असते. जसे तुम्ही नंतर स्टेटस वाढवत जाता. लहान घर असते. मग मोठ्या घराचा हव्यास .. शहरात या गोष्टींची जास्त स्पर्धा असते किंवा त्याला हे शहरी लोक गरजा समजतात. नुसते घर नाही मग फर्निचर , interior ,दिखव्याच्या वस्तू सगळे पाहिजे. नवीन घरी लगेच मोठा टीव्ही पाहिजे , मोठा फ्र्रिज ,वॉशिंग मशीन हे सगळे नवीन ..म्हणजे केवळ घर घेतले यातले समाधान दूरच राहते ज्या वस्तू नाहीत किंवा त्या जुन्या झाल्या आता त्या नवीन घरात कशा शोभतील . तर त्या घेण्या मागे सतत धडपडत असते व्यक्ती. म्हणजे किती. ही पैसा मिळविला तरी गरजा या वाढत असतात आणि समाधान हे दूर पळत असते.

याउलट गावाकडे कायम दारे उघडी ..खेळते वारे , हवा यातून ac काय बरेचदा या लोकांना पंख्याची सुधा सवय नसते. भले शहरात पैसा जास्त आहे, पण सुख समाधान गावातंच मिळतं. कारण गावाकडे अजून साधे राहणीमान ,तिथले लोक त्यांच्यातली आपुलकी , एकमेकांची काळजी , एकमेकांची नुसती विचारपूस नसते तर कृती ही असते. जुने मित्र मैत्रिणी , आठवणी , तिथे transport चे फारसे खर्च नाहीत. निसर्ग ..शेती यातून मिळणारी स्वच्छ खेळती हवा , पोल्युशन नाही . आणि सगळ्यात महत्वाचे माणुसकी ती अजून ही गावाकडचं मिळते आणि हे सुख समाधान भरपूर पैसे कमवून ही शहरात मिळत नाही कारण तुमच्याकडून रोज अपेक्षा वाढत जातात. बरेचवेळा वाटते की तुम्ही कामाचे , पैसे कमावण्याचे मशीन च आहात. कारण एक झाले की एक डिमांड पुढे येतच राहते. आणि ती पूर्ण केली तरी त्यात काय कर्तव्य आहे तुमचे असेच तर असते. आणि ती डिमांड पुरी होईपर्यंत त्याची value पण पूर्ण झाली की त्या गोष्टीची value रहात नाही कारण ती मिळेपर्यंत त्यात उत्साह जास्त एकदा मिळाली की ती आपलीच असते की मग त्यात काय असा attitude. आपल्या लोकांनी आपल्या करिता गोष्टी करतच राहायचे हे त्यांचे कर्तव्यच असते असे भाव .केल्या नाहीत तर मात्र ती व्यक्ती काहीच करत नाही आपल्या करिता हे उलट ऐकून घ्यायचे.

गावाकडे चार पैसे कमी मिळतील पण जगण्यातला खरा आनंद , सुख ,समाधान हे गावातच. सतत चे खर्च नाहीत ,घरात दगड विटांच्या भिंती असतील तरी घराला घरपण असते. एकमेकांची काळजी असते. आपुलकी असते. प्रेम असते. कपड्ये , पोशाख कसे करावेत याला मर्यादा असते. शहरात कसेही कपडे घालून मग मुलींच्या मागे मुले लागतात. त्यातून मुली बरेचवेळा स्वतः वर अनेक संकटे ओढवून घेतात. ते त्रास वेगळे. गावात अजून सगळ्या वर वागणे , बोलणे , पोशाख याबर मर्यादा ही असतात आणि मोठ्यांचा मान ही राखला जातो.
हे बिन पैशाचे सुखच की.. अर्थात काही सुख सोइंच्य्या मर्यादा ही असतात गावात. मोठी किंवा चांगली हॉस्पिटल नसतात. मोठ्या कंपनी नसतात जिथे तुमची हुशारी किंवा भरपूर पगार मिळत नाही.

पण गावात एकत्र कुटुंब पद्धती ,त्यात एक कुटुंब प्रमुख निर्णय घेण्यास सक्षम असतो . वंशपरंपरागत व्यवसाय यामुळे बरेचवेळा काय करायचे किंवा नोकरी याचं प्रश्न सतावत नाहीत. ते आपसूकच शिकले जातात आणि त्यात मदत ही केली जाते. मल्टिप्लेक्स नसेल पण संस्कार , रोजची घरातली स्तोत्र पठण यातूनंघरात एक शांतता आणि चांगल्या vibes राहतात. गावात लोक छोट्या छोट्या गोष्टी मध्ये समाधानी असतात तर शहरात भरपूर पैसा कमावून ही त्यातले सुख नाहीच . तो कमीच पडतो म्हणून असमाधान च जाणवते. आणि खरेच आहे शहरात जगताना गरजा या वाढत्या च असतात. त्या मानाने पैसा कमीच पडतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!