Skip to content

Struggle करताना आपण किती लोकांना नकळत प्रेरणा देतोय हे आपल्या लक्षात येत नाही.

Struggle करताना आपण किती लोकांना नकळत प्रेरणा देतोय हे आपल्या लक्षात येत नाही.


मेराज बागवान


Struggle म्हणजेच संघर्ष ;जीवनाचा अविभाज्य भाग.Struggle आहे म्हणूनच जीवनाला खरा अर्थ आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात struggle हा असतोच. कुणाच्या वैयक्तिक तर कुणाच्या व्यावसायिक जीवनात.कुणाच्या करिअर मध्ये तर कुणाचा नातेसंबंधात.कुणा कुणाच्या आयुष्यात तर प्रत्येक ठिकाणी पावलोपावली संघर्ष असतो.ह्या संघर्षाला अनेक गोष्टी कारणीभूत असतात , जसे की कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती ,माणसाचा दृष्टिकोन आणि मानसिकता.Struggle त्या व्यक्तीला खूप काही शिकवत असतो आणि शिकवून जातो.पण इतकेच नाही तर , Struggle करताना आपण किती लोकांना नकळत प्रेरणा देतोय हे आपल्या लक्षात देखील येत नाही.

‘वर्षा’ एक सुशिक्षित मुलगी.कॉलेज जीवन संपले की तिला नोकरी लागली.शैक्षणिक जीवनात नेहमी प्रथम क्रमांक असे तिचा.त्यामुळे ती हुशार होती.तशी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सुस्थितीत होती.सगळे कसे जागच्या जागी.अगदी ‘कम्फर्ट झोन’ म्हणायला हरकत नाही.मात्र तिला जी नोकरी मिळाली , त्या नोकरीने तिचे आयुष्यच पालटून गेले.तिचे ऑफिस अगदी नवीन होते, व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था देखील नव्हती.आणि ऑफिस स्टाफ मध्ये ती एकटिच होती.बाकी सर्व फिरतीच्या कामात असत. त्यामुळे दिवसभर ती एकटीच ऑफिस मध्ये असत.ऑफिस नवीन होते , त्यामुळे कसलाच जम बसलेला नव्हता.शून्यापासून सुरवात करायची होती.

सुरवातीला वर्षा ह्या परिस्थितीमुळे खूप घाबरली होती.संध्याकाळी घरी जायला अनेकदा उशीर होत असे.आई-वडील तिच्या पाठीशी होते .तसेच ऑफिस चे इतर कर्मचारी देखील सदैव तिची मदत करीत असत.पण तरी देखील ऑफिस चा सेट अप बसविण्याची जबाबदारी तिचीच होती.एक महिला सर्व काही पाहत होती.

तिला सुरवातीच्या काळात अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.अनेकवेळा अपमान सहन करावे लागले.विनाकारण बोलणी देखील खावी लागली.ती अनेकदा यामुळे रडत देखील असे , पण ‘काहीही झाले तरी जबाबदारी पार पडायचीच’ हा तिचा स्वभाव होता.आणि त्यामुळे ती ह्या सगळ्या अडचणींमधून देखील मार्ग काढत ऑफिस चा जम बसवत होती.

५-६ वर्षे निघून गेली. वर्षा अजूनही त्याच ऑफिस मध्ये नोकरी करते.पण ते ऑफिस आता त्यावेळेस चे छोटेसे ऑफिस न राहता, एक बलाढ्य ऑफिस झाले आहे.आज कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनर्यंत वर्षा चे नाव पोहचले आहे. अनेक वरिष्ठ मंडळी तिला वैयक्तिक रित्या ओळखतात.तिने केलेल्या कामाचे कौतुक करतात.तसेच इतर नवीन लोकांना काही अडचण आल्यास विश्वासाने वर्षाचाच नंबर देतात.अनेक जणांच्या तोंडातुन शब्द निघतात, ‘वर्षा मॅडम ने कंपनीसाठी, ऑफिस साठी खूप काही केले आहे. त्यांचा सहाभाग खूप अमूल्य आहे. त्या ऑफिस ची शान आणि जान आहेत’.

‘एक महिला कशी यशस्वीरीत्या ऑफिस सांभाळू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे वर्षा’. असे उदगार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी असतात.तीने एक ‘विश्वासार्ह कर्मचारी’ म्हणून नावलौकिक मिळविला आहे.’तुम्ही वर्षावर ब्लाइंड फेत ठेवू शकता’ असे नवीन रुजू झालेल्या लोकांना वरिष्ठांकडून सांगितले जाते.आणि अनेकजण वर्षा चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कंपनीत काम करीत आहेत.

वरील उदाहरणातून वर्षाने तिच्या struggle मधून इतरांना प्रेरणा दिली आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी देखील सहकार्य केले. अशी बरीच उदाहरणे आहेत जिथे ती व्यक्ती struggle करीत असते, पण त्याची प्रेरणा इतर अनेक जणांना नकळत मिळत असते.कुणी बिकट आर्थिक परिस्थीतून बाहेर निघून दाखवितो आणि स्वबळावर स्वतःचे असे स्थान निर्माण करतो.

कुणी तुटलेली नाती पुन्हा सकारात्मक रित्या जुळवितो तर कुणी कठोर परिश्रमांनातर शैक्षणिक यश संपादन करतो.आणि त्या struggle च्या काळात, नकळत इतरजण त्या व्यक्तीचे निरीक्षण करीत असतात आणि त्याचे उदाहरण देत असतात. Struggle करणारा व्यक्ती त्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतो, पण दुसरीकडे अनेकजण त्याच्याकडून प्रेरणा घेत आहेत हे त्याच्या लक्षात येत नाही.

Struggle फक्त त्या माणसाला घडवत नाही तर इतर अनेक जणांना सकारात्मक गोष्टी शिकवत असतो.आयुष्यात पुढे कसे केले पाहिजे, किंबहुना आयुष्य कसे जगले पाहिजे हे त्या व्यक्तीचा संघर्ष इतरांना सांगत असतो.संघर्ष करायला लावणारा देखील विधाताच असतो आणि त्यातून इतरांना प्रेरणा देणारा देखील तोच असतो.कुणा एका struggle करणाऱ्या व्यक्तीच्या रुपात येऊन तो वर बसलेला विधाता सर्वांना एक प्रकारची अदृश्य ऊर्जा देऊन जातो.

म्हणूनच जेव्हा आयुष्य तुम्हाला struggle करायला भाग पाडेल तेव्हा लक्षात असू द्या, ‘तुमच्या हातून खूप मोठे महान कार्य घडणार आहे. जे तुम्हाला तर उपयोगी पडणार आहेच पण त्यापेक्षा जास्त इतरांना देखील ते आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.म्हणून संघर्ष काळात कायम अंगी संयम बाळगा.

‘संघर्ष करा आणि आयुष्य फुलवा’.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!