शुभ आणि अशुभ वेळ असं काही नसतं, तुमचा पराक्रम त्या वेळेचं महत्त्व वाढवतं.
हर्षदा पिंपळे
आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला महत्त्व नाही असं नाही… अगदी चहापासून ते सूपपर्यंत सगळ्यालाच महत्त्व आहे.चहाशिवाय आपली सकाळसुद्धा अपूर्णच असते.अगदी तसच आपल्या सर्वांच्या आयुष्यात वेळेला पहिलं प्राधान्य दिलं जातं.आयुष्यात वेळेच महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही.पण अनेकदा बोललं जातं की “ही शुभ वेळ नाही, ही अशुभ वेळ आहे वगैरे” तर खरचं असं काही असतं का..?शुभ आणि अशुभ वेळ असते का..?
खरं तर कित्येकजण काही करतानाही वेळ/काळ शुभ आहे की अशुभ आहे हे पाहतात.त्याशिवाय ते कोणत्याही कामाला सुरुवात करत नाही. पण आता खरच शुभ आणि अशुभ असं काही असतं तर कित्येक कामांना बहुधा उशीरच झाला असता.
असो…खरंतर वेळेच सांगायच झालं तर वेळ ही वेळ असते.त्यात शुभ आणि अशुभ असं काही नसतं.आपलं कर्म आपल्या वेळेला शुभ आणि अशुभ ठरवत असतं.आपल्या कर्मानुसार त्या त्या वेळेची किंमत वाढत जाते.आपलं कर्म वाईट असेल तर अनेकदा ती वेळ अशुभच ठरते.आता काही गोष्टी विचारात घेतल्या तर नक्कीच लक्षात येईल की खरच वेळ ही वेळ असते.आणि शुभ आणि अशुभ अशी काही वेळ नसते.आपला पराक्रम, आपलं यश हे त्या वेळेच महत्त्व वाढवतं.
*आता माणसाचा जन्म म्हणाल तर….एखादं बाळ जन्माला आलं तर आपण त्या वेळेला शुभ मानतो.मृत बाळ जन्माला आलं तर त्या वेळेला अशुभ मानतो.तर संपूर्ण बाळाची प्रोसेस काय शुभ वेळ ठरवूनच करायची असते का…?? होणारी गोष्ट होणार असते.बाळ जन्माला आलं यातच सगळं येतं.बाळ जन्माला येणं यासारखी आनंदाची दुसरी गोष्टच नसते.
*विद्यार्थ्यांच्या परिक्षा …आता परिक्षेलाही शुभ अशुभ वेळ असते का हो…? परीक्षेच्या बाबतीत जर या शुभ आणि अशुभ वेळेचा विचार केला असता तर काय घडलं असतं कोण जाणे.एकतर परिक्षा तरी रखडल्या असत्या नाहीतर शुभ वेळ आहे म्हणून वारंवार परिक्षाच घेतल्या गेल्या असत्या.म्हणजे आता शिकण्यासाठी सुद्धा शुभ अशुभ वेळ पहायची हे किती हास्यास्पद असावं…..???
*सीमेवरचे जवान ,पोलीस आपलं रक्षण करत असतात.कधी कुणी जखमी होतं तर कधी कुणी मरण पावतं.आता संपूर्ण देशाच रक्षण करून जेव्हा एखादा जवान शहीद होतो त्यावेळी ती वेळ अशुभ असते का…??? त्याचा पराक्रम त्या वेळेपेक्षा लहान असतो का…??? मान्य आहे की त्याच्या घरच्यांसाठी तो गेल्याच दुःख असेन.. पण संपूर्ण देशाच रक्षण करता करता तो शहीद झाला याचा अभिमानही त्यांना नक्कीच असेल.त्याचा हा पराक्रम, शौर्य नक्कीच वेळेच महत्त्व वाढवणारा असतो.
*एखाद्याला मदत करताना विचार केला की ही वेळ शुभ नाही तर…..तर त्या माणसाच्या असण्याचा उपयोग काय..??याच अशुभ वेळी एखाद्याचा जीव गेला तर….?
त्यापेक्षा केवळ कणभर मदत केली तरी जन्म सार्थकी लागल्यासारखा असतो.वेळेवर उपचार नाही मिळाले तरी माणूस तडफडतो…. तरी आपण मदतीचा हात देताना शुभ – अशुभ वेळ पाहणार का …??
तर खरच एकदा विचार करून पहा.सगळ्यांनीच असा शुभ-अशुभ विचार केला असता तर आज कितीतरी जीव असेच तडफडून तडफडून गेले असते.वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. तसच मग शुभ अशुभ करताना गोष्टी अनेकदा अर्धवट राहिल्या असत्या.वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. पण वेळेअभावी माणसाची प्रगती मात्र थांबू शकते.परीक्षेत वेळ कमी पडला तर एक मार्क कमी होईल म्हणून वाईट वाटतं.पण मग आयुष्यात असच शुभ-अशुभ करताना कितीतरी वेळ असाच जातो . त्या गेलेल्या वेळेचं दुःख वाटत नाही का…?? त्याच वेळेत गोष्टी घडून पुढे जाऊ शकतात हा विचार मनात येत नाही का…??
पहा..नीट विचार करा आणि वेळेला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा.शुभ आणि अशुभ अशी वेळ नसते हो.सगळं काही आपल्यावर अवलंबून असतं.आपण वेळेचा सदुपयोग कसा करतो यावर सगळं ठरतं.एखादी पराक्रमी घटना आठवून आपण सहज बोलतोही की…” काय वेळ होती हं ती….!.”
म्हणूनच तुम्ही वेळेचा वापर आयुष्यात योग्य प्रकारे करा.अशा गोष्टी करा ती वेळ लक्षात राहिली पाहिजे. वेळेच महत्व तुमच्या यशाने ,पराक्रमाने उंचावलं पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Nice खुपच छान.