Skip to content

शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात सकारात्मकता दाटून येते.

शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात सकारात्मकता दाटून येते.


सोनाली जे.


शरीर मिलन ही खरेच खूप सुखद भावना आहे. पण ती जर नीट समजली तरच.

आपण भारता सारख्या देशात राहतो जिथे आपल्यावर खूप बंधने , मर्यादा , वडीलधारी मंडळींचा मान राखणे आणि संस्कार यांचा पगडा प्रचंड मोठा आहे. त्याचमुळे अन्न , पाणी यांची गरज जसे मोकळेपणाने मांडू शकतो. तसे आपल्या शरीराच्या काही गरजा असतात ..मन आणि शरीर हे एकमेकांशी निगडित असते. त्या गरजा अजूनही मोकळे पणाने भारतात मांडू शकत नाही. आता थोड्या सुधारणा होत आहेत. बरोबरीचे मित्र मैत्रीण यांच्या सोबत बऱ्याच गोष्टी शेअर करता येतात. पण तरी ही बरेचवेळा त्यांच्याकडून चुकीचे सल्ले ही मिळण्याची शक्यता असते.

साधारणपणे भारतात शरीर मिलन ही संकल्पना विवाह या सारख्या सामाजिक , कायदेशीर बंधनातून पुढे जाणारी एक सुखद भावना आहे. शरीर मिलन होण्याकरिता खरे तर भावना समजून घेणे , एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणे गरजेचे असते. एकमेकांच्या विषयी विश्वास , आदर तर असावा लागतोच. पण दोघानाही नाविन्याची आवड लागते.

शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात सकारात्मकता दाटून येते.हे खरेच आहे. शरीर मिलन होताना एकमेकांनी एकमेकांना काय आवडते ते समजून घ्यावे . काही वेळेस काही क्रिया त्रासदायक होत असतात तेव्हा ते हावभाव , चेहऱ्यावरून , expressions वरून समजत असते. ते टाळावे.

अर्थात हे दोघांच्या मधल्या understanding वरून जास्त चांगले समजते. आणि दोघांच्या मधले जास्तीत जास्त interaction, bounding, नेहमी करत असल्यास आवड निर्माण होत असते. एकमेकांना वेळ भरपूर पाहिजे असतो. त्यातून आधी एकमेकांना खुलवत , फुलवत जावून , जसे स्त्रियांना रोमान्स मध्ये जास्त वेळ देणे आवडते. त्यांना शरीर मिलन होण्यापूर्वी दोघांमधले होणारे लाडिक संवाद , हळुवार स्पर्श , रोमांचित , उत्तेजीत करणारे स्पर्श, क्रिया या आवडत असतात.

स्त्री ही पहिल्यापासून मर्यादा ,संस्कार , वडीलधाऱ्या मंडळींचा धाक यातून पटकन मोकळेपणे व्यक्त होत नाही. बरं या गोष्टींचा अनुभव काहीच नसतो. स्त्री असो वां पुरुष दोघेही यात नवीन च असतात. त्यामुळे दोघांची सुरुवातीला अशीच अवस्था असते जसे पोहता येत नाही पण नव शिकाऊ व्यक्तींना पाण्यात ढकलून दिले तर ते सुरुवातीला गटांगळ्या खात असतात. जसे त्यांना पाण्याची भीती असते. ती हळूहळू सरावाने कमी होते.

हात पाय मारल्यावर , श्वास यावर नियंत्रण आल्यावर मग पाण्यावर तरंगताना ..पोहताना त्यांना खूप मजा येते. उत्साह वाढतो. मग थोडे चांगले पोहता येवू लागले की पाण्या खालून पोहत जाण्याचे प्रयोग , तर कधी उलटे पोहण्याचे बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय , फ्री स्ट्रोक, ब्रेस्ट स्त्रोक असे विविध प्रकार शिकले जातात केले जातात. आणि नवीन शिकण्याची आवड निर्माण होतेच पण उत्साह निर्माण होतो.

तसेच शरीर मिलन होताना सुरुवातीला किंवा प्रत्येक वेळी थोडा पुरुषाला पुढाकार घ्यावा लागतो. आणि पुरुष कसे मित्र मित्र थोडे मोकळेपणाने यावर आधी चर्चा करत असतात. किंवा मीडिया , सोशल मीडिया वरून काही माहिती मिळवत असतात. त्यातून त्यांना काय कसे करावे आणि कसे आवडेल किंवा नवीन काय प्रयोग करता येतील . एकमेकांना नक्की कोणत्या क्रिया आवडतात याची हळूहळू मानसिकता पक्की होत जाते. त्यातून आनंद ,सुख , विश्वास , आपुलकी, प्रेम , एकमेकांची ओढ वाढते आणि या सगळ्या सकारात्मक घटना आणि भावना वाढीस लागतात.

शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात सकारात्मकता दाटून येते.याचे कारण म्हणजे..

१. एकमेक एकमेकांची काळजी घेत आहेत .आवडी निवडी चे विचार करत आहेत हा ठाम विश्वास निर्माण होतो.

२. स्त्री असो किंवा पुरुष दोघेही एकमेकांना समजून घेवून एकमेकांना अजून आनंद आणि सुख कसे देता येईल याचा विचार करतात आणि तसे प्रयत्न करतात. त्यामुळे दोघांच्यात एक आपुलकीचे , आपलेपणा चे bounding निर्माण होते. त्यातून सुखाच्या परमोच्च बिंदू चा त्या दोघांना ही आनंद मिळतो..

३.शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने कामाचा ताण तणाव असेल ,किंवा इतर कोणत्या गोष्टी मधले काही मानसिक ताण असतील. शारीरिक धावपळ , कष्ट असतील.काही समस्या खूप त्रासदायक असतील . या सगळ्याचा विसर पडून एकदम रिलॅक्स व्हायला होते. ताण तणाव कमी होतो. आणि मन आनंदी , उत्साही होते.

४. शरीर मिलन होताना स्त्री पुरुष हे भेदभाव विसरून केवळ एकमेकांच्या मध्ये पूर्ण involve होवून दोन शरीर आणि दोन मन एकत्र येवून केवळ एकमेकांच्या सुखाचा विचार करतात. याचे समाधान, आनंद दोघांची नाती दृढ होण्यासाठी , फुलवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यास मदत करतात. आणि अजून एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तसे प्रयत्न केले जातात.

५. शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात आपलेपणाची भावना वाढीस लागते. एकमेकांची ओढ वाढते. प्रेम ही वाढते आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या आवडत्या गोष्टी तेही समजून घेवून करणारी , आपल्याला कायम साथ देणारी आपली व्यक्ती , आपली काळजी घेणारी , आपल्याला साथ देणारी आणि सगळ्यात महत्वाचे वाटणारे secure फील यातून मनात सकारात्मकता दाटून येते.

६. एखाद्या वेळीं जरी नात्यात वाद , विवाद झाले , त्यासाठी अनेक कारणे असतात मुले , नातेवाईक , जवळचे घरातले किंवा एकमेकांच्या मधले understanding कमी होणे, गैरसमज , अविश्वास, सभोवतालचे वातावरण .miscommunication, यातून बरेचवेळा वाद ही होतात. पण शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने या सगळ्या वाद विवाद , गैरसमज मिटून सुसंवाद साधला जातो. शारीरिक मिलन आपल्या आवडत्या पद्धतीने केले जाते. त्यातून सगळ्या गोष्टीतून रिलॅक्स , स्ट्रेस फ्री होवून ,मोकळेपणा निर्माण होतो त्यातून बोलण्यातून , कृतीतून अनेक समस्या सोडविण्यासाठी मदत होते.सगळ्यात आपले एक हक्काचे स्थान आहे याची खात्री पटते. आणि ती मनाला secure feel देण्यास मदत करते. त्यातून दोघांच्या ही मनात सकारात्मकता दाटून येते.

आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घेवून केवळ शरीर च नाही तर मन , भावना , नावीन्य , एकमेकांना प्रोत्साहन देत , एकमेकांना कठीण समयी असो आनंदाच्या समयी असो साथ देत शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या करून सुख , समाधान , शांतता आणि आनंद वाढत जसे . मनात सकारात्मकता दाटून येते.

ज्या गोष्टीतून सकारात्मकता , आपलेपणा , जवळीक वाढतो त्या नक्की करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “शरीर मीलनावेळी दोघांनाही ज्या क्रिया प्रचंड आवडतात त्या केल्याने मनात सकारात्मकता दाटून येते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!