शांत राहणे ही एक जबरदस्त प्रतिक्रिया आहे, ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नसते.
हर्षदा पिंपळे
प्रत्येकालाच आपल्या शब्दांची किंमत असते का ? तर.हल्लीच्या काळात तर याचं उत्तर देणं जरा कठीणच जाईल.तर प्रत्येकालाच आपल्या शब्दांची किंमत असते असं नाही. ती काहींना असते तर काहींना नाही.आयुष्य आहे म्हंटल्यावर वादविवाद, वेगवेगळे कलह हे होणारच. आयुष्यात जसा आनंद तसच रडगाणं सुद्धा असतं.त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही.
आयुष्यात इतकी माणसं असतात की प्रत्येकाशी जुळवून घ्यायचं म्हणजे एकप्रकारे दिव्यच असतं.प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाच्या दृष्टीने विचार करावा लागतो.खरं तर प्रत्येकाला समजून घेणं काही नेहमीच शक्य होत नाही.आणि घेतलं तरी समोरच्याला ते समजत नाही. अनेकदा वादविवाद होतात.कधी कधी आपली चूक नसते.अशावेळेस आपण जीव तोडून एखादी गोष्ट त्या त्या व्यक्तीला सांगत असतो.परंतु समोरची व्यक्ती ते समजून घ्यायला तयारच नसते.
आपण चार गोष्टी व्यवस्थित समजून सांगताना ते आपल्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. इतकं करूनही आपण घशाला कोरड पडेपर्यंत समोरच्याला तेच तेच पुन्हा समजावत असतो.पण त्याचा काही उपयोग होत नाही. आपण आपली ऊर्जा आणि आपला वेळ अक्षरशः वाया घालवत असतो.
याचाच अर्थ काय तर…आपल्या शब्दाला त्यावेळेस काहीही किंमत दिली जात नाही.आपलं बोलणं व्यर्थ ठरतं.कधी कधी या गोष्टीचा आपल्याला त्रासही होतो.
अर्थात आपण इतकं जीव तोडून कुणाला काही सांगत असू आणि समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दांची काही किंमत नसेल तर आपल्याला त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे.
तर मग मित्रांनो अशावेळेस,आपणच आपल्या शब्दांना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न करायला हवा.अशावेळेस शांत राहीलेलं केव्हाही चांगलं.शांत राहणं हीसुद्धा एक प्रकारची प्रतिक्रियाच आहे.कधी कधी शब्दांची किंमत कळत नाही परंतु मौनाची भाषा कळते.मौनाची किंमत त्या व्यक्तीला कळते.
माणूस हा संवादाशिवाय आयुष्य कसं जगत असेल हे ज्याचं त्यालाच माहीत.दिवसभरात एखाद्याशी बोलणं झालं नाही तरी मनाला चुटपुट लागून राहते.
तर मग विचार करा…ज्यावेळेस आपल्या शब्दांना किंमत दिली जात नाही त्यावेळेस आपण शांत राहणं प्रेफर केलं तर ?
शांत राहणे ही एक जबरदस्त प्रतिक्रिया आहे. आणि नक्कीच त्यामुळे एखादी गोष्ट वाढत जाण्याऐवजी ती मर्यादित राहू शकते.किमान दगडाचा डोंगर तरी यामुळे होणार नाही.आणि शब्दांमध्ये जशी ताकद असते तीच ताकद कधी कधी शांततेतही असते.
नेहमीच आपल्या शब्दांची किंमत समोरच्याला कळेल असं नाही. कदाचित कधी कधी आपल्या शांत राहण्याची किंमत त्या व्यक्तीला समजू शकते. आपल्या शांत राहण्यामागचं कारण शोधण्यासाठी किमान समोरची व्यक्ती धडपड तरी करू शकते.
एखादी गोष्ट योग्य असुद्या,अयोग्य असुद्या…. आपण बोलायला जातो आणि शब्दाने शब्द मात्र वाढत राहतो.या सगळ्यामध्ये समजून घेणं बाजूलाच राहतं.
मित्रांनो,शब्दाने शब्द वाढत राहणार,वातावरण गढूळ होत जाणार,मानसिक, शारिरीक ऊर्जा खर्च होणार…मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर शांत राहण्याची प्रतिक्रिया उत्तम आहे.म्हणून अशावेळेस शांत राहून नीट विचार करा आणि काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवून घ्या.
शब्दाने शब्द वाढवायचे ?की शांत राहून वातावरण निवळायला थोडा वेळ द्यायचा?हे प्रत्येकाने ठरवून घ्यायला हवं.
स्वतःला कितपत त्रास करून घ्यायचा हे स्वतःवरच अवलंबून असतं.आपण बोलून काही उपयोग होणार नाही हे माहीत असेल तर जरूर बोलणं टाळावं.किमान अशावेळेस तरी शांत राहणं प्रेफर करावं.
यामुळे शारीरिक, मानसिक त्रासाचं प्रमाण कमी होईल.वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाणार नाही. आपल्या शब्दांना काही किंमत नाही…. हे असं गिल्ट तरी मनाला त्रास देणार नाही.
एकदा तरी ही शांत राहण्याची प्रतिक्रिया ट्राय करून पहा.अनुभव कसा येतोय याचा एक अंदाज घेऊन पहा.युजफुल ठरला तर चांगलच आहे.
तसं शांत राहणं सर्वांनाच जमत नाही.बोललं की कित्येकांना बरं वाटतं. पण जमत नसेल तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
कदाचित, तुम्ही शांत राहिल्यावर तुमच्या शब्दांची किंमत समोरच्याला कळेल.
सो…जस्ट ट्राय इट.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Nice 🙏🏼💯💯💯💯
Very nice👌
Kupach chaan