Skip to content

तुमचा ‘self respect’ हा तुमच्यातल्या फीलिंगपेक्षाही स्ट्रॉंग असू द्या.

तुमचा ‘self respect’ हा तुमच्यातल्या फीलिंगपेक्षाही स्ट्रॉंग असू द्या.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


प्रत्येक माणसामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असणं महत्वाचं असत. कारण जो माणूस स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही त्याचा रिस्पेक्ट इतर कोणीही करत नाही. जसा आदर इतरांनी आपला करावा असं आपल्याला वाटत तसा आदर आपण ही स्वतःचा करायला हवा.

पण काही वेळा आपण एखाद्या माणसाच्या प्रेमात इतके गढून जातो की त्यात आपण स्वतःला विसरून जातो . आणि मग आपल्या स्वतःपुढे त्या व्यक्तीला ठेवू लागतो. आणि आपल्या सेल्फ रिस्पेक्ट पुढे ही त्याच व्यक्तीला महत्वाचं मानू लागतो.

पण ही गोष्ट केल्याने तुमच्या स्वतःसाठी तर ते नुकसानदायक आहेच, पण त्यामुळे तुमचं नातं ही खराब होऊ शकत. कारण जिथे तुम्ही स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा इतर गोष्टींना महत्व देताय तिथे समोरचा माणूस ही तुमच्या रिस्पेक्टला दुय्यम स्थानच देणार.

आणि मग तेव्हा आपल्याला वाटायला लागत की मी याच्यासाठी/ हिच्यासाठी माझी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवते, किमान याने तरी माझ्याशी वागताना मला फर्स्ट प्रायोरिटी द्यावी, मला रिस्पेक्ट द्यावी.

पण तसं घडत नाही, कारण आपणच त्या माणसाला ते दार उघडून देत असतो. आणि मग नंतर वाईट वाटून घेण्यात काही अर्थच उरत नाही.
कधी आपल्याकडून झालेल्या चुकांमुळे आपण स्वतःला रिस्पेक्टच्या लायकीच समजत नाही आणि स्वतःला दोषी मानत बसतो. चूक झाल्यावर दोष आपला आहे असं वाटण साहजिकच आहे, पण आपण कोणत्याच रिस्पेक्टच्या काबील नाही असं समजणं म्हणजे अति होतं .

कारण स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची रिस्पेक्ट करणं या गोष्टी खूप बेसिक आहेत, आणि आपल्या आत्मविश्वासाचा पाया आहेत. जर आपण आपल्या सेल्फ रिस्पेक्टचा त्याग करत असू तर ती गोष्ट आपल्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकते. आणि आत्मविश्वास असेल तरच आपण बेधडकपणे आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो.

सेल्फ रिस्पेक्ट हा कोणत्याही फीलिंग पेक्षा जास्त महत्वाचा असतो. कारण तुमच्यात सेल्फ रिस्पेक्ट असेल तर कोणतीही परिस्थिती असेल तिथे तुम्ही कॉन्फिडन्सने उभे असता, भले तुमच्यासोबत कोणी नसेल पण तुम्ही तुमच्या सोबत असता.

इतर कोणी सोबत असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याहीपेक्षा आपण स्वतःसोबत असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या निर्णयांमध्ये आपलं मन पूर्ण विश्वासाने आपली साथ देत असेल तरच आपण त्या गोष्टी पार पडू शकतो.

आणि जेव्हा आपण आपली रिस्पेक्ट करत असतो तेव्हा इतर लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात , ती आपली रिस्पेक्ट करतात का नाही या सर्व गोष्टींनी आपल्याला फारसा फरक पडत नाही. कारण आपल्या विचारांवर, मतांवर, आणि आपण घेतलेल्या निर्णयांवर आपण ठाम असतो.

ते चुकले तरी परिणाम भोगायची आपली तयारी असते, कारण एक “माणूस” म्हणून आपल्याला स्वतःचा आदर वाटत असतो. माणूस आहोत म्हणजेच कधीतरी चुकणार आणि कधीतरी बरोबर असणार हे आपल्याला माहित असत. आणि तीच सूट आपण स्वतःला देत असतो. आणि चूक झाली म्हणजे आपण आदराच्या लायकीचे नाही आहोत असं आपण कधीही समजत नाही.

स्वाभिमान म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट असल्‍याने इतरांना तुमच्‍याशी सन्मानाने वागण्‍यास मदत होते. स्वाभिमान असणं म्हणजे तुम्हाला तुमची स्वतःची किंमत माहित आहे आणि परिणामी तुम्हाला चांगली आणि आदराने वागणूक मिळेल अशी अपेक्षा आहे. सेल्फ रिस्पेक्ट असणे म्हणजेच स्वतःची तत्व, विचार माहित असणे, आणि ते जपणे. आपल्या तत्वांसाठी उभे राहणे आणि वेळ पडलीच तर त्यांच्यासाठी फाईट करणे.

जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही स्वतःला इतरांसोबत समान पातळीवर ठेवता, त्यामुळे तुम्ही कोणाचं गैरवर्तन सहन करत नाही किंवा तुम्ही देखील इतरांशी गैरवर्तन करत नाही. परिणामी, तुमचे चांगले नातेसंबंध प्रस्थापित होतात, आणि तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच पण तुमच्या सानिध्यात इतरांना ही छान वाटत.

इतर कोणत्याही फीलिंग पेक्षा सेल्फ रिस्पेक्टला महत्व देण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो, त्या पुढीलप्रमाणे:

१.ठामपणा: जेव्हा लोक तुमचा अनादर करतात तेव्हा ते ओळखा आणि ते थांबवण्यासाठी पावले उचला.

२.स्वत:ची स्वीकृती: स्वतःला जाणून घ्या. आणि आपल्या गुण-दोषांसहित त्याचा स्वीकार करा. कोणताही माणूस हा परफेक्ट नसतो. पण आपल्याला आपल्या काही गोष्टी आवडत नसतील तर त्या बदलायचा प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारायचा प्रयत्न करा. शेवटी जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत आपण स्वतःचा आदर करणं अवघड आहे.

३.खरा स्वाभिमान आंतरिक शांती आणतो. आपण स्वतःचा आदर कण्यासाठी मनातली वादळं शांत होणं ही खूप महत्वाचं आहे.

४.वास्तववाद: टीका हाताळण्यास शिका. काही वेळा टीकेला सकारात्मक रित्या घेऊन आपल्यात काही बदल करावे लागतात , तर काही वेळा काही टीका दुर्लक्षित कराव्या लागतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “तुमचा ‘self respect’ हा तुमच्यातल्या फीलिंगपेक्षाही स्ट्रॉंग असू द्या.”

  1. Shivshankar babanrao kunde (psychology student)

    अतिशय छान लेख आहे .

  2. Dhananjay sevekar

    अतिशय सुंदर असा लेख आहे . या लेखाच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे हे दिसून येते आणि ते अगदी योग्य आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!